वजन वाढवणाऱ्या भात आणि गव्हाच्या पोळीला उत्तम पर्याय आहे हि भाकरी – Health Benefits Of Sorghum In Marathi

आजच्या लेखात भात आणि पोळीला उत्तम पर्याय असणाऱ्या ज्वारीबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
(health benefits of sorghum in marathi)

बहुतेक लोक आजकाल कोरोनाच्या परीस्थितीमुळे घरून काम करत आहेत. किंवा बाहेर जाण्यासाठी होणारा व्यायाम थांबला आहे.घरबसल्या बऱ्याच लोकांचं वजन वाढत आहे. आपण आपल्या आधीच्या लेखात वाचलं आहेच की वजन वाढलं की काय होतं आणि वजन कमी करून निरोगी कसं रहावं. अशा परिस्थितीत बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी कार्बचे सेवन कमी करतात.

4 22

म्हणजेच आहारातून भात खाणे बंद करतात. तसेच लोक गव्हाच्या पीठाची चपाती पोळी खाणे बंद करतात. हे पीठ कर्बोदकांनी भरपूर आहे. गव्हाच्या पिठामध्ये रिफाईंड कार्ब असतात, ज्यामुळे वजन वाढते. मात्र, पोळी खायची नाही भात खायचा नाही तर खावं काय असा अनेकांना प्रश्न पडतो. (What is beneficial for health) असा आहार सांगा ज्याने पोट भरलेलं राहिलं तसच पौष्टिक पण असेल.

पण आता तुमची चिंता मिटली आहे. वजन कमी करण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ज्वारीची भाकरी खाणे खूपच फायदेशीर आहे. (health benefits of sorghum)

3 25

ज्वारीच्या भाकरीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे आपले पोट बर्‍याच काळासाठी भरलेले राहते. याशिवाय यात मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. ज्वारीचे पीठ पाचन शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात. ज्वारी (sorghum) व्हिटामिन C चा मुख्य स्रोत आहे.

नुसती ज्वारी नाही तर…

नुसती ज्वारी नाही तर वजन कमी करण्यासाठी बाजरीची भाकरी देखील खूप फायदेशीर आहे. बाजरीमध्ये फायबर आणि पोटॅशियम भरपूर असतात. जर, आपल्याला आपले वजन नियंत्रित करायचे असेल, तर बाजरीचे पीठ आपल्यासाठी उपयुक्त आहे. बाजरी पचनास जड असल्याने, खाल्ल्यानंतर फार काळ भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते. बाजरीची भाकरी खाणे शक्य नसेल तर आपण बाजरीची खिचडी भात देखील तयार करून खाऊ शकतो. आणि बरं का जर तुम्हाला गोड खायला आवडत असेल, तर आपण बाजरीची खीर बनवून देखील खाऊ शकता.

5 20

ताजी फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. पण, फळांचा उपयोग करुन बनवलेले अनेक पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असतात. उदाहरणार्थ बनाना ब्रेड. फ्रूट केक, फ्रूट ज्यूस.. ह्यात मोठ्या प्रमाणात साखर, फॅट्स आणि कॅलरिज देखील असतात. हे पदार्थ खूप प्रक्रिया केलेले असतात. त्यामुळे ते आरोग्याला धोकाही पोहचवू शकतात. फळांच्या कृत्रिम पेयांमध्ये फक्त 30 टक्के रस असतो. मात्र, साखरेचं प्रमाण मोठं असतं. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हे पिऊ नका.

त्यामुळे गरमागरम ज्वारीची (sorghum) भाकरी खाऊन तंदुरुस्त राहा.वजन वाढवणाऱ्या भात आणि गव्हाच्या पोळीला उत्तम पर्याय दुसरा नाही.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories