पोटावरील चरबी कमी करायची आहे ? करा हे उपाय – पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय

पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय – आज-काल आरामदायी लाइफस्टाइल मुळे व बैठी काम जास्तीत जास्त करण्याची सवय झाल्यामुळे फिटनेस व शारीरिक तंदुरुस्तीचा ताळमेळ बसताना दिसत नाही. आपल्यातील बरेचसे स्त्री-पुरुष तसेच लहान मुले देखील अगदी कमी वयातच लठ्ठपणाचे शिकार होताना दिसत आहेत.

जंक फूड, फास्ट फूड खाणे किंवा जास्त प्रमाणात सोडियम म्हणजेच मिठाचा वापर केलेले, तळलेले, खारवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठू लागते. ही चरबी गळा, हाताचे दंड, पोट व पोटाच्या खाली कमरेचा भाग, मांड्या यावर जास्त प्रमाणात जमा होऊ लागते. त्यामुळे आपले शरीर अस्तव्यस्त व बेढब दिसू लागते शिवाय चरबीमुळे व्यक्तीला न्युनगंड व वैफल्याची भावना निर्माण होते. तसेच चारचौघांमध्ये वावरताना कॉन्फिडन्सची कमतरता जाणवते.

Image

पोटावर चरबी वाढण्याची अनेक कारणे आहेत. यातील मुख्य कारण म्हणजे बदलेली जीवनशैली, आहार-विहारातील अपथ्य, खाण्याच्या चुकीच्या वेळा, जास्त प्रमाणात खाणे, अतिपोषण, स्ट्रेस आणि हार्मोनल चेंजेस ही मानली जाते.

आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय सांगणार आहोत, ज्यामध्ये काही घरगुती उपाय, योगासने व व्यायाम यांचा देखील समावेश असणार आहे. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुद्द्याकडे वळुया.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय :

image1

पोटावर चरबी वाढल्यामुळे लहान मुले, मोठी माणसे स्त्रिया-पुरुष सर्वच बेढब होतात. बऱ्याच लोकांना या अतिरिक्त चरबीमुळे दम लागणे, धाप लागणे, थोडे जरी चालले तरी पण थकवा येणे, घाम येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच जास्त प्रमाणात चरबी वाढली तर ती आपसूकच वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देते. ज्या मध्ये हाय ब्लड प्रेशर, शुगर, हार्ट अटॅक या रोगांची संभावना जास्त निर्माण होते. महिलांमध्ये चरबीमुळे हार्मोनल चेंजेस होऊन पी.सी.ओ.डी होते तसेच वंध्यत्व देखील येऊ शकते.

आता जाणून घेऊया कोणते आहेत ते घरगुती उपाय ज्यामुळे पोटाची चरबी कमी करता येऊ शकते!

सलाड खाणे :

salad

गाजर -काकडी तत्सम फळभाज्यांमध्ये जास्त प्रमाणात पाण्याचा अंश असतो. या व अशा फळांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश असेल तर या फळांमधील फायबर आपल्याला चरबी घटवण्यामध्ये नक्कीच मदत करतात. काकडी, गाजर, कोबी यांची कोशिंबीर आपल्या आहारात दररोज जर समाविष्ट केली तर त्यामध्ये असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीराला जास्त फायदा होतो. या फळांमध्ये 100% केवळ फायबर असते. वसा किंवा फॅट्स अजिबात नसतात. यामुळे पोट भरलेले राहते. मात्र चरबी वाढत नाही. यामुळेच डायटीशियन रोजच्या आहारामध्ये फायबर युक्त पदार्थ म्हणजे गाजर काकडी कोबी यांची कोशिंबीर खाण्याचा सल्ला देतात.

चौरस आहार :

indian food

पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय मध्ये आहाराचा मोठा वाट असतो. बऱ्याचशा स्त्री-पुरुषांना रोज रोज रिपिटेडली तेच-तेच पदार्थ खाण्यास आवडतात. कारण काय तर ते पदार्थ त्यांच्या आवडीचे व फेवरेट असतात. रोजच्या आहारात जर आपण वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केला तसेच चौरस आहार असला तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये मेटाबोलिजम सुधारतो व शरीराची पचनक्षमता चांगली राहते. कडधान्यांच्या उसळी, सलाड, भाज्यांचे सूप,ज्युस, ताक, दही, लिंबू हे पदार्थ रोजच्या आहारामध्ये असल्यास आपल्या पचनक्षमतेमध्ये सुधारणा होते. ज्यामुळे शरीराला चरबी जमा होण्याऐवजी लाभ होतो.

कोमट पाणी व मध :

honey

बर्‍याच घरगुती उपायांपैकी कोमट-गरम पाणी आणि मध हा चरबी घटवण्याचा सर्वोत्तम उपाय मानला जातो. कोमट-गरम पाण्यामध्ये एक चमचा मध मिसळून रोज सकाळी अनुशापोटी प्यायल्यास चरबी घटवण्यामध्ये मदत होते व व्यक्तीचे वजन देखील नियंत्रणात येते. यासोबतच डेअरी फुड्स व दुग्धजन्य पदार्थांचा आहारातून कमीत कमी समावेश करायला हवा. चरबी वाढवणारे पदार्थ आहारातून कमी केल्यास शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढत नाही व शरीर शेपमध्ये येण्यास सुरुवात होते. जर आपल्याला मध आवडत नसेल तर आपण सकाळी केवळ कोमट- गरम पाणी प्यायले तरी देखील आपल्याला त्याचा फायदा होतो.

अळशी बिया :

flaxseeds

या चरबी घटवण्याचा एक चांगला मार्ग म्हणून निवडला जातो. अळशीच्या बियांमध्ये भरपुर प्रमाणात फायबर असते तसेच ओमेगा 3 विटामिन्स असते. अळशी अनेक उपयुक्त गुणांनी परिपूर्ण असतात. रोज एक चमचा अळशीच्या बिया नियमित खाल्ल्यास पोटावरील चरबी कमी होते. मात्र हा उपाय कायमस्वरूपी न करता लिमिटेड काळाकरता करावा व योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा.

ताक :

buttermilk

रोजच्या आहारामध्ये ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. ताकाचे सेवन केल्यास आपली पचनक्षमता सुधारते व अतिरिक्त चरबी तयार होण्यापासून बचाव होतो. जेवणानंतर ताक पिणे उत्तम मानले जाते मात्र याकरता रोज घरी तयार केलेले ताजे ताकच प्यावे.

मैदायुक्त पदार्थांचे सेवन टाळणे :

bread 1

आज-काल बरेचसे लोक बिस्किटे, बेकरी फुडचा मोठ्या प्रमाणात आपल्या आहारात समावेश करतात. मात्र हे पदार्थ मैद्यापासून तयार केलेले असतात. मैद्यामध्ये कोणतेही जीवनसत्व नसते उलट मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला अपाय होतो. मैदा पचण्यास खूप जड असतो त्यामुळे चरबी वाढण्यास वाव मिळतो. मैद्याचे विघटन शरीरांमध्ये लवकर होत नाही त्यामुळे त्याची चरबी तयार होते व शरीरांमध्ये जागोजागी सर्वत्र चरबी तयार होऊन शरीराची अवस्था बिघडते.

खारवलेले पदार्थ किंवा वेफर्स हे पदार्थ खाणे टाळावे :

potato chips 1

लहान मुलांना तसेच महिला व पुरुषांना देखील प्रवास करताना किंवा फावल्या वेळामध्ये वेफर्स कुरकुरे असे खारवलेले, तिखट केलेले पदार्थ खायला आवडतात. या पदार्थांमध्ये ईडीबल ओईल व सॅच्युरेटेड फॅट्स मोठ्या प्रमाणावर मिसळलेले असते. हे पदार्थ खाल्ल्यामुळे जास्त प्रमाणात चरबी तयार होते. याकरता असे पदार्थ खावु नये.

अपुरी झोप किंवा जास्त झोप घेवु नये :

sleeping 1

जेवणानंतर झोपण्याची वाईट सवय अनेक लोकांना असते त्यामुळे देखील चरबी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. दुपारच्या जेवणानंतर डाव्या कुशीवर 15 ते 20 मिनिटे फक्त वामकुक्षी घ्यावी. जेवणानंतर लगेच झोपल्याने देखील चरबी वाढते व लठ्ठपणा येतो. तसेच अपुरी झोप सुद्धा चरबी वाढण्यासाठी कारणीभूत आहे. रोज रात्री सात ते आठ तास झोप व्यक्तीसाठी आवश्यक असते त्यामुळे व्यक्तीचा मेंदूचा थकवा व शारीरिक श्रम देखील दूर होतात. रात्री जागरण केल्यामुळे देखील हार्मोनल बदल होतात व त्यामुळे चरबी वाढण्यास कारण होते.

गोड पदार्थ व मिठाई जास्त प्रमाणात खाऊ नये :

gulab jamun 1

काही लोकांना गोड पदार्थ खाण्याची सवय असते व जास्त प्रमाणात रोजच्या आहारात गोड पदार्थ सेवन केले जातात. गोड पदार्थांमध्ये वापरली गेलेली साखर देखील आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. अतिप्रमाणात साखरेचा आपल्या शरीरांमध्ये पुरवठा झाल्यामुळे चरबी वाढू लागते व स्वादुपिंड व यकृताच्या कार्यपद्धतीमध्ये अडथळे येतात. याकरता आपण आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे.

पोटाची चरबी करण्यासाठी योगा :

योगासने हा आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. रोज योगासने केल्यास आपल्याला कोणत्याही आजाराची भीती राहत नाही . योगासने केल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे व स्नायु लवचिक आणि बळकट बनतात. ज्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते.

प्राणायाम :

pranayam

योगासनामधील प्राणायाम हा सर्वात प्रसिद्ध प्रकार आहे व व्यक्तीच्या सर्वच आजारांवरती प्राणायामाचा उपयोग होतो. श्वासावर नियंत्रण करत श्वासांच्या वेग नियंत्रण करणे हे प्राणायामात अंतर्भूत असते. प्राणायामाद्वारे आपण आपल्या श्वासांवर नियंत्रण मिळवतो. श्वास व उच्छवास या क्रियांची गति व वेगावर आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवू लागतो. प्राणायामामुळे आपल्याला चरबी कमी करण्यासाठी उपयोग होतो.

कपालभाती प्राणायाम :

kapalbhati 1 1

कपालभाती प्राणायाम हा चरबी घटवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा योगासनाचा प्रकार आहे. दीर्घ श्वास घेऊन पोट पूर्णपणे फुगवून घ्यावे. श्वास सोडताना पूर्ण पोट आतपर्यंत बेंबीमध्ये ओढून केला जाणारा हा कपालभाती प्रयोग चरबी घटवण्यासाठी अतिशय प्रभावीपणे काम करतो. एका मिनिटाला साठ वेळा कपालभाती प्राणायाम करण्याचा सराव केले असता पोटावरील चरबी अतिशय झपाट्याने कमी होते तसेच बऱ्याच आजारांमध्ये कपालभाती प्राणायामाचा उपयोग देखील होतो. कपालभाती केल्यामुळे शुगर, ह्रदयरोग व महिलांचे आजार देखील बरे होतात तसेच पोटाच्या तक्रारी दूर होतात.

बटरफ्लाय आसन :

butterfly yoga

बटरफ्लाय योगासन हे मांड्या आणि पोटाची चरबी करण्यासाठी अतिशय उत्तम आसाम मानले जाते. दोन्ही पायाचे तळवे एकमेकाला चिटकवून पाठीचा कणा ताठ ठेवून दोन्ही हाताची पक करुन फुलपाखराप्रमाणे पायाची हालचाल करणे अशाप्रकारे बटरफ्लाय आसन केले जाते. या आसनामुळे पोटाची चरबी कमी होते तसेच मांड्यांना देखील चांगला शेप येतो.

चक्की चालन आसन :

chakki chalanasana steps and benefits

नावाप्रमाणेच हे आसन आहे म्हणजेच चक्की चालण्यासारखे आहे. दोन्ही पायांमध्ये 45 अंशाचा कोण ठेवून हातांची बोटे एकमेकांत जुळवून डावीकडून उजवीकडे जाते फिरवल्यासारखा व्यायाम करणे म्हणजेच चक्की चालण आसन होय. या आसनामुळे पोटाच्या घेरावर भार पडतो पाणी चरबी कमी होण्यासाठी मदत होते. तसेच पाठदुखीचा त्रास कमी होतो.

पवनमुक्तासन :

pavanamuktasana steps

पवनमुक्तासन हा योगासनाचा चरबी कमी करण्यासाठीचा प्रकार आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवत एकत्र पोटापाशी आणने. दोन्ही हात आणि पायाची घडी पोटावर दाबून हे आसन केले जाते. पाठीवर झोपून दोन्ही पाय हळूहळू गुडघ्यामध्ये वाकवत पोटापाशी आणुन दोन्ही हाताने पायांना कवळीत पकडुन पोटापाशी दाबुन ठेवणे अशी या योगासनाची कृती आहे.

भुजंगासन :

Bhujangasana Steps

पोटावर झोपून नागाप्रमाणे शरीर अर्ध्यामध्ये वर उचलून दीर्घ श्वास घेऊन केले जाणारे आसन म्हणजे भुजंगासन होय.यामुळे पोटावरील स्नायुंना ताण येतो व चरबी देखील कमी होण्यास मदत होते.

धनुरासन :

dhanurasana steps

धनुरासनमध्ये आपले शरीर धनुष्यासारखे करण्याची क्रिया सांगितली आहे. पोटावर झोपून मागील बाजूने पाय वरती उचलून हात पाठीच्या दिशेने मागे करून पाय पकडून शरीर ताणुन धनुष्यासारखा आकार तयार होतो. यामुळे कंबर आणि पोटावर ताण येतो ज्यामुळे चरबीवर प्रभाव पडतो.

पश्चिमोत्तानासन :

paschimottanasana steps

दोन्ही पाय एकमेका जुळवुन दोन्ही हात तोंडाच्या समोरच्या दिशेने पायाच्याअंगठ्या पर्यंत नेत हळूहळू गुडघ्यापर्यंत डोके ठेवावे. हे आसन केल्यामुळे पोटावर ताण येतो व चरबीवर असर पडतो. या आसनामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.

पोटावरील चरबी कमी करण्याकरता व्यायाम :

सूर्यनमस्कार :

suryanamaskar

रोज सकाळी उठल्यानंतर दहा ते पंधरा सूर्यनमस्काराची सवय लावल्यास आपल्याला चरबीमध्ये लवकर घट होताना दिसेल व शरीर देशील चांगले लवचिक बनते. सुर्य नमस्कार करणे हा व्यायामाचा सर्वोत्तम प्रकार मानला जातो. दहा प्रकारच्या योगासनांचा समावेश असलेल्या सूर्यनमस्कार हा सर्वांगासन मानला जातो. सूर्यनमस्कारामध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो. याकरता सूर्यनमस्कार नियमित करणे हे देखील पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात चांगला व्यायाम मानला जातो.

दोर उड्या मारणे :

skipping rope

दोरी उड्या मारणे देखील चरबी कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय मानला जातो. दोरी उड्या मारल्याने देखील पोटावरची चरबी कमी होते सोबतच शरीर देखील लवचिक होते. दोर उडी हा अतिशय श्रम करायला लावणारा व्यायाम असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घाम निघतो व त्यामुळे देखील फॅट्स घामातुन कमी होते व लवकर चरबी कमी होते.

धावणे किंवा जॉगींग :

running 1

रोज सकाळी अर्धा तास जोरात चालणे किंवा सकाळी उठल्यावर जॉगिंग करणे व पळणे हे व्यायाम देखील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. नियमित चालणे,धावणे व जॉगिंगमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

सायकलिंग :

cycling

सायकल चालवण्याचे फायदे अनेक आहेत त्यातील एक म्हणजे सायकल चालवण्यामुळे शरीराच्या संपूर्ण शरीर व अवयवांचा व्यायाम होतो. सायकल चालल्याने देखील पोटावरची चरबी कमी होण्यात लवकर परिणाम होण्यास मदत होते.

आधुनिक व्यायाम प्रकार :

workouts

आधुनिक व्यायाम प्रकारांमध्ये जिममध्ये केली जाणारी कसरत, वर्क आऊट, व्यायामाचे प्रकार तसेच घरामध्ये बसून केलेली वर्कआउट देखील पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. झुम्बा डान्स, एरोबिक्स, क्रंचेस वर्क आउट, पुश अप्स, पुल अप्स, व्यायाम अशा वेगवेगळ्या प्रकारांचा उगम झाला आहे. ज्याद्वारे फिटनेस चांगला ठेवण्याकरता उपयोग केला जातो.

अधिक फिटनेस टिप्स साठी हे आर्टिकल वाचा : 25 Best Fitness Tips In Marathi

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय :

मेदारी चूर्ण :

ayurveda

आयुर्वेदामध्ये मेदारी चूर्ण नावाचे शरीरावरील मेद व चरबी कमी करण्याचे एक जडीबुटीच्या मिश्रणाचे चुर्णाचे नाव आहे. संयुक्त सेवनामुळे देखील पोटावरील चरबी व पूर्ण शरीरातील चरबी हळूहळू कमी होते.पोट साफ करुन जास्तीत जास्त प्रमाणात शरीरातील चरबी वितळवली जाते.

लिंबू पाणी :

lemon juice

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिणे हा चांगला उपाय आहे. लिंबू पाणी प्यायल्याने मलावरोधाची समस्या दूर होते. ब्लोटिंग, बद्धकोष्ठता, अपचन, गॅस या समस्या बर्‍य‍ होतात. चरबी वाढण्याचे कारण अपसेट डायजेशन मानले जाते. अशावेळी लिंबु पाणी बहुगुणी ठरते.

सब्जाचे बी :

Chia seeds

सब्जा बी हे संपूर्ण फायबरयुक्त असते. सब्जा रात्रभर पाण्यात भिजवुन सकाळी ज्युसेस मध्ये मिक्स करुन किंवा असाच सेवन केला तरी पोटाचे आरोग्य सुधारते व पोटावरील चरबी कमी होण्यासाठी मदत होते. सब्जा चे बी पाण्यात फुलुन येते व आकाराने दुप्पट होते. हाय फायबरयुक्त सब्जा आपला मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत करते. ज्यामुळे एक्सट्रा वसा व टॉक्सिन शरीरातुन बाहेर पडते.

दालचिनी :

cinnamon

घरगुती मसाल्याचा पदार्थ असलेले दालचिनी आयुर्वेदिक औषधी आहे. चरबी घटवण्यासाठी दालचिनीचा चहा करुण पिणे किंवा आपल्या रोजच्या जेवनात चिमुटभर दालचिनी पावडर भुरभुरणे देखील उपयुक्त होते. दालचिनी मेद म्हणजेच चरबी वितळवते आणि शरीराचा मेटॅबॉलिझमसुद्धा सुधारते.

मित्रांनो आम्ही आपल्याला या लेखाद्वारे सांगितलेले हे उपाय आपण अंगिकारले तर पोटावरील चरबी लवकर दुर होईल. मात्र सराव व पथ्य यांचे पालन केले तर पुन्हा चरबी होणार नाही. आपल्याला आमचा हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories