अंगदुखी ते ॲसिडीटी कोणताही त्रास लवकर बरा करतो हा एक आयुर्वेदीक औषधी लेप.

ओवा भारतीय स्वयंपाकघरात मसाल्याच्या स्वरूपात आपण वापरतो. ओवा आयुर्वेदात औषध म्हणून देखील वापरला जातो. भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी वापरला जाणारा ओवा भरपूर ऊर्जा, प्रोटीन्स, फायबर, कर्बोदक, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम ह्याने भरलेला आहे.

ओवा खाण्याचे बरेच फायदे आहेत. ओवा फक्त पाचकच नाही, तर उच्च रक्तदाबाची समस्या, किडनी स्टोनची समस्या, लठ्ठपणा, वाढत्या कोलेस्टेरॉलची समस्या, सांधेदुखी, अतिसाराची समस्या, दमा, गॅस आणि बद्धकोष्ठता समस्या, व्हायरल इन्फेक्शन वगैरे आजारातही औषधी आहे.

आज आपण ह्या लेखातून पाहूया की ओव्याची पेस्ट किंवा ओव्याचा लेप लावून कोणत्या आजारांपासून घरच्या घरी औषध करता येते. आपण ओव्याचा लेप कसा तयार करायचा हे पाहू.

ॲसिडिटी गायब होईल

5 50

ॲसिडिटीचा/ पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी उपयुक्त आहे. तुम्ही जर ओव्याची पेस्ट किंवा ओव्याचा लेप लावला तर ॲसिडिटी कमी होऊ शकते. पेस्ट बनवण्यासाठी ओवा आ,णि हिंग घ्या. ओव्याच्या पाण्यात बारीक करून हिंग मिसळा.

तयार मिश्रण पोटावर म्हणजेच नाभीभोवती लावा. ह्या उपायाने आम्लपित्तच नाही तर पोटातील गॅस किंवा पोट फुगले असेल तर आराम पडेल. ओव्यामध्ये अँटिस्पास्मोडिक आणि कार्मिनेटिव्ह गुणधर्म आहेत, जे गॅसचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

अंगदुखी

6 47

जर तुम्हाला तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असेल तर ही वेदना दूर करण्यासाठी, ओवा पाण्यासोबत वाटून घट्ट पेस्ट बनवा.आता दुखणाऱ्या भागावर बनवलेला हा लेप लावा. ह्याने शरीरातील वेदना कमी होतील.

याव्यतिरिक्त, ओव्याचा शेक म्हणजे कॉम्प्रेस शरीरातील वेदना दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. ओवा कापडात भरून गॅसवर चांगला भाजून घ्या आणि अंग शेकवा. ह्या उपायाने शरीरातील वेदनाही दूर होतात.

सूज आली असेल तर लावा ओव्याचा लेप

7 44

सांध्यातील दुखापतीनंतर सूज येते. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला डोकेदुखी, भूक न लागणे, ताप, थंडी वाजून येणे, मसल ब्लॉक होणे, उर्जेचा अभाव इत्यादी लक्षणं दिसू शकतात. अशा परिस्थितीत ओव्याचा लेप ह्या समस्येपासून आराम देऊ शकतो.

ओव्यामध्ये सूज कमी करणारे गुणधर्म आहेत. अंगावर सूज आली असेल तर पाण्यासोबत ओवा वाटून घट्ट पेस्ट तयार करा आणि सूज आलेल्या भागात लावा. ह्याने सूज उतरेल.

खरूज आणि खाज सुटणे

8 34

खरूज आणि खाज येण्याचा त्रास कमी करण्यासाठी ओव्याचा लेप देखील खूप उपयुक्त ठरू शकतो. ह्यासाठी पाण्यासोबत ओवा वाटून घट्ट पेस्ट तयार करा आणि खरूज आणि खाज सुटणाऱ्या जागी लावा.

ओव्यामध्ये अँटीव्हायरल, दाहक-विरोधी, अँटीफंगल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहेत, जे खरूज आणि खाज कमी करायला मदत करू शकतात. याशिवाय, जर तो भाग ओव्याच्या पाण्याने धुतला गेला तर सारखी सुटणारी खाज कमी होते.

जखमांच्या खुणा भरतात

9 21

ओव्यापासून बनवलेला लेप जखमांचे डाग काढून टाकण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. जर तुम्हाला जखमांवर लाल खुणा दिसल्या तर तुम्ही हळदीमध्ये ओवा मिसळून त्यावर लावू शकता. ओव्याची पेस्ट बनवा आणि ती हलके एकत्र मिसळा आणि जखमेवर लावा.

याशिवाय, जर तुमची जखम बरी होत नसेल किंवा तुम्हाला जखम भरण्यात अडचण वाटत असेल तर तुम्ही ओवा वाटून लेप तयार करून त्या जागी लावू शकता. ह्याने जखम लवकर भरते. जरी तुम्ही ओव्याच्या पाण्याने जखम धुतली तरी तुम्हाला फायदा मिळू शकतो.

तर आपण घरीच सहजपणे ओव्याचा लेप किंवा पेस्ट वापरू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. ओवा पेस्टच्या बाबतीतही असेच आहे. ओवा पेस्ट मोठ्या प्रमाणात लावणे टाळा.

ह्यातचे कारण असे की ओवा खूप उष्ण असतो. यामुळे त्वचेच्या तापमानात चढउतार होऊ शकतात. ओव्याचा लेप बनवताना ताजा नवीन ओवा वापरा कारण त्यात तेलकटपणा चांगला असतो.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories