एरंडेल तेलाने बाळांना मसाज करण्याचे काय फायदे आहेत?

लहान मुलं खूप नाजूक असतात, त्यांची योग्य काळजी घेतली नाही तर ती आजारी पडू शकतातच, पण आजारी पडली त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकासही खुंटतो. त्याचप्रमाणे मुलांची त्वचाही अतिशय नाजूक आणि मऊ असते. आपण त्यांच्या त्वचेसाठी आपल्यासाठी वापरतो ती तेलं, शाम्पू, पावडर काहीही वापरू शकत नाही.

विशेषत: मसाज तेलाच्या बाबतीत, चुकीच्या गोष्टीचा वापर केल्याने मुलांच्या शरीरावर पुरळ उठणे, त्यांची चिडचिड होणे, त्वचा सुजणे आणि कोरडेपणा असे त्रास होऊ शकतात. मुलांच्या मसाजसाठी मोहरीचं तेल, खोबरेल तेल, आवळा तेल अशी तेलं अनेकजण वापरतात, परंतु एरंडेल तेल वापरताना आई वडील गोंधळून जातात. नवीन पालक अनेकदा हा प्रश्न विचारतात की मुलांना एरंडेल तेलाने मालिश करावी का? 

एरंडेल तेल आहे एवढं पौष्टीक 

एरंडेल तेलाला काही ठिकाणी एरंडीचं तेल असही म्हणतात. यामध्ये व्हिटॅमिन-ई, खनिजे आणि प्रोटीन्स यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. एरंडेल तेलामध्ये असलेले रिसिनोलिक ॲसिड, अँटी इन्फ्लमेशनरी गुणधर्म, बुरशीविरोधी गुणधर्म आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील खूप फायदेशीर मानले जातात.

मुलांसाठी एरंडेल तेल कसं वापरायचं?

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की, लहान बाळासाठी एरंडेल तेल सुरक्षित आहे का? एरंडेल तेल मुलांच्या त्वचेसाठी पूर्णपणे सुरक्षित मानलं जातं. त्यातील पोषक द्रव्ये बाळाच्या त्वचेपर्यंत भरपूर पोहोचतात. अनेक वेळा लोकांना एरंडेलचा वास अजिबात आवडत नाही, ज्यामुळे त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. एरंडेल तेल जर मुलाची त्वचा संवेदनशील असेल किंवा त्याचा कोणताही भाग भेगा पडल्या असतील तर ते अतिशय काळजीपूर्वक वापरा. 

लहान मुलांसाठी एरंडेल तेलाचे फायदे

लहान मुलांची त्वचा कधीकधी खूप कोरडी असते. कोरड्या त्वचेवर एरंडेल तेल वापरल्यास ती मऊ आणि मुलायम होऊ शकते. एरंडेल तेलामध्ये असलेले पोषक घटक मॉइश्चरायझरचे काम करतात आणि त्यामुळे त्वचा मुलायम होते.

काहीवेळा लहान मुलांच्या त्वचेवर लहान ठिपके आणि डाग येतात. लहान मुलांच्या शरीरावरील डाग नाहीसे करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर अत्यंत उपयुक्त मानला जातो. मुलाच्या त्वचेच्या डागलेल्या भागांवर थोडे कोमट एरंडेल तेल लावा. बाळाच्या त्वचेवर एरंडेल तेल लावल्याने उन्हात जळजळ होत नाही. या तेलाचा उपयोग इसब बरा करण्यासाठी देखील केला जातो जो मुलांमध्ये नॉर्मल आहे.

आजकाल पालक आपल्या मुलांना डायपर घालतात, त्यामुळे त्यांना डायपर रॅश होतात. एरंडेल तेल शरीरातील डायपर रॅश दूर करण्यासाठी, लहान पिंपल्स बरे करण्यासाठी देखील कार्य करते.

बाळासाठी एरंडेल तेल कसं वापरायचं

बाळाच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी एरंडेल तेल वापरताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. बाळाला एरंडेल तेलाने मसाज करण्यासाठी एका भांड्यात 2 ते 4 चमचे तेल घ्या आणि ते हलक गरम करा. कोमट तेलात 2 चमचे खोबरेल किंवा मोहरीचे तेल मिसळा आणि नंतर बाळाला मालिश करा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories