गुळवेलाचे फायदे आहेत अनेक ! नक्की करा आपल्या आहारात समावेश – 10 Amazing Health Benefits Of Giloy In Marathi

गुळवेलाचे फायदे – भारतीय आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या जडीबुटी आणि वनौषधींचा समावेश केलेला आहे. सर्दी -खोकल्यापासून ते अगदी कॅन्सरसारख्या जटील आजारांमध्ये देखील अनेक औषधी जडीबुटी उपयुक्त ठरतात. हिमालयातील जंगले, निलगिरी पर्वत रांगा, सातपुडा डोंगर रांगा तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगा यांच्यामध्ये अश्या अनेक वनौषधी व जडीबुटीयुक्त झाडे आणि वेली आहेत, ज्यांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो.

ज्यामुळे अनेक असाध्य आजार व रोगांवर उपचार करता येत आहे. शतावरी, अश्वगंधा, अशोक,शिसम, मुळेठी, कांचन, कोरफड, नागरमोथा, जास्वंद, बाभुळ, जटामांसी अशी अनेक औषधी झाडे आहेत ज्यामुळे अनेक आजारांवर व रोगांवर उपचार करता येतो. या वनौषधींपैकी एक महत्त्वाची वेल म्हणजे गुळवेल (गुळवेल).

भारतात अगदी सहजपणे आढळणारी गुळवेल (Giloy In Marathi) अनेक असाध्य आजारांवर उपायकारक आहे. गुळवेलीच्या मुळापासून ते गुळवेलीच्या पानांपर्यंत गुळवेलीचा प्रत्येक भाग हा आयुर्वेदामध्ये महत्त्वाचा मानला गेला आहे. गुळवेलीला आयुर्वेदामध्ये व हिंदीमध्ये गिलोय असे म्हणतात. गुळवेल या एकमेव औषधीमध्ये वातनाशक आणि कफ नाशक गुणधर्म असतात. यामुळे वात आणि कफ दोषामुळे होणार्‍या सर्व प्रकारच्या आजारांमध्ये गुळवेलीचा वापर केला जातो.

गुळवेलाचे फायदे बद्दल थोडक्यात माहिती – Giloy In Marathi

गुळवेलाचे फायदे Benefits Of Giloy In Marathi
  • गुळवेलाची नावे – गुळवेलीला अनेक भाषांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. मधुपर्णी, गुरुची, अमृता, रसायनी ही गुळवेलची इतर नावे आहेत. Tinospora cordifolia हे गुळवेलाचे Botanical name आहे.
  • थोडक्यात ओळख – आयुर्वेदामध्ये गुळवेलीला सर्वऔषधी म्हटले जाते. कारण मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवासंबंधी निर्माण होणाऱ्या आजारांवर व व्याधींवर गुळवेलीचा उपयोग होतो. आपले डोळे, हाडे, अंतर्गत इंद्रिये, बाह्य- उपचार, अंतर्गत उपचार या सर्वांवर गुळवेलीचा अनेक प्रकारे वापर केला जातो. गुळवेलीच्या पानांचा व मुळांचा रस काढला जातो.

गुळवेलीची पाने नुसती खाऊन देखील अनेक आजारांवर उपचार आयुर्वेदात सांगितलेले आहेत. गुळवेलीच्या पानांपासून, मुळांपासून, खोडापासून, पावडर तयार केली जाते. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये गुळवेलीच्या चूर्णाचा वापर केला जातो. गुळवेलीचा रस आणि गुळवेलचा काढा हे देखील आयुर्वेदिक उपचाराचे एक घटक आहेत.

  • गुळवेलीचा विविध आजारांवर वापर – गुळवेलापासून काढा तयार केला जातो. या काढ्याचा उपयोग सर्दी-खोकला-ताप, ऍलर्जी, अस्थमा, ओबेसिटी, डायबिटीस, इन्फेक्शन, विटामिन ए सी डी के आणि विटामीन बी कॉम्प्लेक्स यांच्या कमतरतेमध्ये होणार्‍या व्याधींवरदेखील गुळवेलचा काढा दिला जातो.

सांधेदुखी, सांधे जखडणे, अर्थराइटिस, संधिवात, आमवात, रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यास ओकारी व जुलाब होत असल्यास गुळवेलीचा काढा दिला जातो.

गुळवेलीचा काढा कसा बनवावा ?

  • साहित्य – गुळवेलीची पाच ते सहा पाने किंवा गूळवेलची मुळी, एक ग्लास पाणी, साखर किंवा गूळ.
  • कृती – एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी गॅसवर मंद आचेवर उकळत ठेवावे. गुळवेलीची पाने किंवा गुळवेलीची मुळी या पाण्यामध्ये चुरगळून किंवा कुस्करुन करून टाकावीत. गॅस अगदी मंद आचेवर ठेवावा. एक ग्लास पाण्याचे एकचतुर्थांश म्हणजेच निम्म्याला निम्मे पाणी शिल्लक राहिल्यावर गॅस बंद करावा. आपला काढा तयार झाला आहे. चवीकरता आपण या काढ्यामध्ये साखर किंवा थोडासा गुळ टाकू शकता. काढा प्राशन करण्याइतपत कोमट झाल्यास दोन चमचे दिवसभरातून तीन वेळेस घ्यावा.

गुळवेलीचा काढा कसा बनवावा : हा घरगुती आयुर्वेदिक काढा तुम्हाला ठेवेल कोणत्याही रोगापासून दूर!!

अतिशय गुणकारी असलेला हा गुळवेलचा काढा आपल्याला प्रत्येक आजारावरामध्ये आपली रोगांशी लढण्याची शक्ती वाढवतो.

Benefits Of Giloy In Marathi – गुळवेलाचे फायदे व नुकसान

गुळवेलाचे फायदे

ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी गुळवेलाचे फायदे –

एक सारखे बैठे काम किंवा हार्मोनल असंतुलनामुळे काही लोकांचे वजन जास्त वाढते. तसेच बऱ्याच लोकांना बि.पी शुगर,  हार्ट अटॅक यासारखा त्रास असतो. या लोकांना वजन नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक असते. वजन नियंत्रणात आणण्यासाठी गुळवेलीचा उपयोग अगदी प्राचीन काळापासून केला जातो. गुळवेलीचा वापर वजन कमी करण्यासाठी, वजन नियंत्रणात आणण्यासाठी इतर आयुर्वेदिक औषधांच्या मिश्रणासोबत केला जातो.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी गुळवेलाचे फायदे –

  • साहित्य- गुळवेल (Giloy In Marathi), मुलेठी पावडर, दहा- पंधरा  तुळशीची पाने, तीन ते पाच लवंगा, दहा-बारा काळीमिरी आणि साखर.

कृती- वरील सर्व पदार्थ एकत्र मिक्सरमधून बारीक दळुन घ्यावेत.  मंद गॅस ठेवुन १ ग्लास पाण्यात चांगले उकळुन १/४ होईस्तोवर शिजवावे. काढा बनवावा. हा काढा सकाळी उपाशीपोटी व रात्री झोपण्याच्या अगोदर दहा मिनिटे नियमित घेतल्यास आपल्याला पंधरा दिवसातच आपल्या शरीरामध्ये फरक जाणवेल. आपले वजन कमी होत नियंत्रणात येईल व लठ्ठपणा व चरबी देखील कमी होऊ लागेल.

डेंग्यू, चिकनगुनिया आणि प्लेटलेट्स कमी झाल्यास गुळवेलाचे फायदे –

गुळवेलीचा उपयोग रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी केला जातो. आपली रोगप्रतिकारक क्षमता ही आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या पांढऱ्या रक्त पेशी वर अवलंबून असते. आपल्या शरीरात ३- ४ लाख पांढर्‍या रक्तपेशी असतात. जेव्हा आपल्यावर एखाद्या आजाराचे संक्रमण होते किंवा आजार पसरवणाऱ्या विषाणूंचे किंवा बॅक्टेरियाचे इन्फेक्‍शन होते तेव्हा आपल्या पांढऱ्या रक्त पेशी त्या आजारांना वाढवणाऱ्या विषाणूंना व रोगजंतुंना मारण्यासाठी लढाई देत असतात.

म्हणूनच पांढर्‍या रक्तपेशींना फाईटर सेल्स असे देखील म्हटले जाते. पांढऱ्या पेशी आपल्या शरीरामध्ये जेवनावाटे, पाण्यावाटे किंव‌ा श्वासावाटे येणाऱ्या विषाणू, बॅक्टेरिया, जिवाणू व हानीकारक रोगजंतूशी लढत असतात व आपल्याला आजारी पडू देत नाहीत.

डेंग्यू, चिकुनगुनिया व प्लेटलेट्स कमी होणे या आजारांमध्ये रोग जंतू हे डायरेक्टली आपल्या पांढऱ्या पेशींवरच हल्ला करत त्यांना कमी करण्यास सुरुवात करतात. डेंग्यु, चिकुनगुनिया या आजारांमध्ये सगळ्यात जास्त नुकसान आपल्या पांढऱ्या पेशींचे होत असते. पांढऱ्या पेशी तसेच तांबड्य‍ा रक्तपेशी झपाट्याने कमी होऊ लागतात. त्यामुळे रुग्णाला श्वास घेणे कठीण होते व शरीरांमधील लोहाचे प्रमाण कमी होते. ज्य‍ामुळे रक्तातील हिमोग्लोबीन पातळी कधी-कधी ५-७ मि.ग्रॅम पर्यंत येते.

हिमोग्लोबीन कमी झाल्याने शरीरातील अवयवांना ऑक्सिजन व पाणी पोषण पोहचवणार्‍या रक्तवाहिन्या रक्त पुढे वाहुन नेण्यास अक्षम होतात. ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि रुग्णाला श्वास घेताना दम लागतो, अशक्तपणा, चक्कर, ताप, प्रचंड डोकेदुखी ही लक्षणे सुरु होतात. बरेचसे रुग्ण शरीरामधील हे संक्रमण किंवा इन्फेक्शन वाढल्यामुळे व प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे दगावतात. याकरता रुग्णाच्या पांढर्‍या पेशी झपाट्याने वाढणे आवश्यक असते. पांढर्‍या पेशी वाढण्याकरता अनेक ॲलोपॅथीची औषधे व सलाईन घेऊन देखील  पांढऱ्या पेशी लवकर वाढत नाहीत. त्यावर प्रभावी उपचार म्हणून गुळवेलीचा वापर केला जातो.

पांढऱ्या रक्त पेशी वाढण्याकरता उपाय –

डेंग्यू ,चिकुनगुनिया, ताप, व्हायरल फ्ल्यु, कोरोना तसेच प्लेटलेट्स कमी करणारे सर्व रोग व आजारांवर पुढील उपचार करावा.

गुळवेल (Giloy In Marathi) +कोरफडीचा गर+ पपईची पाने+ डाळिंब +तुळशीची १०-१५ पाने यांना एकत्र दळून  घ्यावे. या मिश्रणाचा रस वस्त्रगाळ करुन घ्य‍ावा. रुग्णास हा रस दिवसातून तीन वेळा द्यावा. या उपायाने अगदी एका दिवसात 25000 प्लेटलेट्‌स वाढतात व रुग्णाची तब्येत स्थिर होते.

डेंग्यु,मलेरिया, चिकनगुनिया, फ्ल्यु या आजारांमध्ये प्लेटलेट्‌सचे प्रमाण कमी झाल्यामुळेच लोकांचे मृत्यू होतात. गुळवेल (Giloy In Marathi) आणि पपईच्या पानामध्ये प्लेटलेट्‌सचे वाढवण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे हा उपाय अतिशय प्रभावी ठरतो.

गुळवेलाचे जखमा व केसांकरता उपचारात्मक फायदे –

जखम झाल्यास किंवा सूज आल्यास गुळवेलीच्या  पानांचा लेप त्या जागी लावल्यास सूज उतरते व जखमा देखील लवकर भरून येतात. केस गळती होणे, केसांत चाई पडणे, टक्कल होणे, केसांत कोंडा होणे, केसांच्या संबंधित विविध समस्या निर्माण होणे यामध्येदेखील गुळवेलीचा रस रोज नियमितपणे सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास सर्व समस्या दूर होतात.

गुळवेलीचा डोळ्यांच्या आरोग्याकरिता उपयोग –

डोळ्यांच्या सर्व समस्यांवर गुळवेलीचा अतिशय लाभ होतो. डोळ्यांमध्ये खाज सुटणे, डोळ्यांमधून एकसारखे पाणी येणे, डोळे सतत लाल होणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे येणे, डोळ्यांची दृष्टी कमी होणे, चष्म्याचा नंबर येणे या व यासारख्या डोळ्याशी संबंधित सर्व विकारांवर गुळवेलीचा उपयोग केला जातो. रोज सकाळी उपाशी पोटी गुळवेलीचे ज्यूस प्यायल्यामुळे डोळ्यांसंबंधित सर्व विकार बरे होतात तसेच व्यक्तीची दृष्टी नितळ व निकोप होते.

ताप आणि ‘हे’ ताप –

 ताप आणि हे ताप येण्याची काही अंतर्गत व बाह्य कारणे असतात. अंतर्गत कारणांमध्ये शरीरातील अवयवांच्या कार्यपद्धतीत बिघाड झाल्यास आपल्याला तापाद्वारे त्याचे संकेत समजत असतात.

अंतर्गत घटक –

आपल्या खान-पानाच्य‍ा चुकीच्य‍ा सवयींमुळे आपली पचनशक्ती व्यवस्थित काम करत नाही. जर पचनच नीट होत नसेल तर शरीरामध्ये जास्त प्रमाणात विषारी पदार्थ तयार होतात, ज्यामुळे ताप येऊ लागतो. याकरता आपल्या आहारा चौरस असावा.  रोजच्या आहारामध्ये शरिराला आवश्यक असलेले सर्व विटामिन्स, पोषकतत्वे व खनिजे आणि पाणी मिळाले पाहिजे अशा पदार्थांचा समावेश करावा. कायमच एक सारखा तोच-तोच आहार घेतल्यामुळे देखील आपल्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतात.

आहारात सर्व प्रकारचे अन्नधान्य, फळे, भाजीपाला यांचा समावेश करावा. केवळ आवडते पदार्थ म्हणून सतत तेच-तेच पदार्थ परत-परत खाऊ नयेत.

बाह्य घटक –

ऋतू- मानातील बदल आणि धुलिकण-

बरेचसे आजार हे ऋतूतील बदलांमुळे देखील होत असतात. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे पृथ्वीच्या भागांमध्ये ऋतु बदल होत असतो. अचानक पाऊस, वारा, ऊन वाढल्यामुळे देखील ऋतुमानात बदल होतो. आपण अनुभवले असेल कधीकधी कडक उन्हाळ्यामध्ये पाऊस सुरू होतो ज्यामुळे रोगजंतू सक्रिय होतात. अनेक प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन या काळामध्ये सुरू होते. सुप्तावस्थेतील रोगजंतू त्यांच्या वाढीस पोषक असलेले वातावरण निर्माण झाल्यामुळे सक्रिय होतात. ज्याला आपण ऋतुबदलामुळे येणारे आजार म्हणतो!

अशा हवामानबदलामुळे उष्माघात, ताप- खोकला, टायफाईड, मलेरिया, व्हायरल फ्ल्यु असे आजार निर्माण करणारे रोग जंतू सक्रीय होतात. ऋतु बदलामुळे अनेक लोकांना या आजाराचे संक्रमण होते. या काळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर व्यक्तीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. सकस आहार व ऋतुमानातील बदलांमुळे आहारामध्ये योग्य ते बदल केल्यामुळे अशा आजारांचा परिणाम शरीरावर होत नाही.

पोलन किंवा मुक्त कण –

वातावरणात धुळीचे अति सूक्ष्म कण हवेमध्ये पसरलेले असतात. रोगजंतु या सुक्ष्म कणांसोबत हवेमध्ये तरंगत असतात. श्वसनावाटे हे सूक्ष्मकण नाकावाटे आपल्या फुप्फुसांत व शरीरामध्ये प्रवेश करतात. व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल तर याचा शरीरावर जास्त परिणाम होत नाही. कोणत्याही आजारामध्ये रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणे आवश्‍यक असते.

बरेचदा साथीच्या आजारांमध्ये रुग्णांचा संसर्ग व संपर्क जास्त झाल्यामुळे ताप येत असतो. स्वाइन फ्लू, कोरोना, बर्ड फ्लू, गोवर, कांजिण्या, टायफॉईड या आजारांमध्ये संसर्गामुळे व रुग्ण व्यक्तिच्या संपर्कात आल्यामुळे आजाराचे रोगजंतू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात.  सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी असे रोगजंतू श्वासावाटे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात पसरत असतात. हे रोगजंतू जेव्हा आपल्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा आपल्या शरीरामधील फायटर सेल्स म्हणजेच पांढऱ्या पेशी या रोगजंतूंची लढत असतात. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान थोड्या प्रमाणात वाढते व आपल्याला ताप जाणवतो. तापासोबतच अंगात थोडीशी कणकण देखील जाणवते. अशावेळी लवकर उपचार करून अँटिबायोटिक्स घेऊन त्या रोगजंतूंना मारण्यासाठी फायटर सेल्सला मदत करणे अपेक्षित व आवश्यक असते. त्यामुळे आजार आटोक्यात येतो व लवकर बरा देखील होतो.

पचनक्षमता वाढवण्यासाठी गुळवेलाचे फायदे – Digestion Benefits Of Giloy In Marathi

गुळवेल (Giloy In Marathi) यामध्ये ‘दीपम पाचन’ गुणधर्म असल्यामुळे गुळ वेलाच्या सेवनामुळे पचनक्षमता सुधारते. आपण केलेल्या जेवनाचे पोषण शरीराला चांगल्या प्रकारे मिळू शकते. गुळवेल शरीराला रेज्युव्हेनेट म्हणजे पुनरुज्जीवन करत असते. गुळवेलाचा रस प्यायल्यामुळे किंवा गुळवेलीचा काढा प्यायल्यामुळे ताप व ‘हे’ ताप यासारख्या तापांची लक्षणे देखील कमी होऊ लागतात.

मेटॅबोलिक डिसीज वर गुळवेलाचा उपाय –

आपल्या  शरीराच्या मेटाबोलिजमसंबंधी होणारे आजार जसे डायबेटिस, हृदयविकार, कोलेस्टेरॉल वाढणे, ब्लडप्रेशरचा त्रास होणे यासारख्या आजारांवर गुळवेलीचा काढा व गुळवेलीच्या पानांचा रस पिणे लाभदायक असते. लिव्हरसंबंधी आजारांमध्ये देखील गुळवेलीचा उपाय आपल्याला फायदेशीर होवू शकतो.गुळवेलीचा सेवनामुळे आपली पचनशक्ती सुधारते, ज्यामुळे आपले पचन तंत्र चांगले होते. खाल्लेले अन्न चांगल्याप्रकारे पचले जाते त्यामुळे आपल्या शरीराचा मेटॅबोलिझम सुधारतो व मेटॅबॉलिझम संबंधित असलेल्या या आजारांमध्ये फरक पडुन लवकर उपाय होतो.

पचनासंबंधी व पोटासंबंधी होणारे आजार –

डायरिया, जुलाब, उलट्या यासारख्या आजारांमध्ये गुळवेलीचा पानांचा रस किंवा गुळवेलीचा मुळीचा किंवा पानांचा काढा करून प्यायल्यामुळे हे आजार मुळापासून बरे होतात.दीपम पाचन व गुळवेलीमधील अौषधी गुणांमुळे डायरिया लवकर बरा होतो व आटोक्यात येतो.

संधिवात -आमवात /सांधेदुखी यावर उपाय –

गूळ वेलीमध्ये वातनाशक गुण असतात. त्यामुळे सर्व प्रकारच्या वात विकारांमध्ये गुळवेलीचा (Giloy In Marathi) उपयोग व वापर केला जातो. सर्व प्रकारच्या सांधेदुखीच्या दुखण्यांमध्ये गुळवेलीचा वापर केला जातो. गुळवेलीच्या पानांचा ज्यूस किंवा काढा करून प्यायल्यामुळे सांध्यांची सूज आणि सांधे दुखणे थांबते व सांधेदुखीमध्ये चांगला आराम मिळतो.

गुळवेलाचे सेवन किती प्रकारात करता येते ?

गुळवेलाचे फायदे

गुळवेलीचे उपयोग करण्याकरिता अनेक प्रकारांमध्ये गुळवेलीचे प्रोडक्ट्स बाजारात उपलब्ध आहत.

  • गुळवेल चूर्ण
  • गुळवेल सत्व
  • गुळवेलीच्या पानांचा ज्युस
  • गुळवेलाचा काढा व
  • गुळवेलापासून बनवलेल्या आयुर्वेदिक टॅबलेट देखील बाजारात उपलब्ध आहेत.

अर्थराइटिसमध्ये खा गुळवेलीचे पाने –

 गुळवेल (Giloy In Marathi) हे अतिशय औषधी असल्यामुळे गुळवेलीची पाने चावून खाल्ल्यामुळे देखिल अर्थराइटिसमध्ये आपल्याला आराम मिळतो. गुळवेलीची पाने कच्ची चाऊन खाल्ल्यामुळे त्वचेसंबंधित आजार दूर होतात व त्वचेमध्ये चमक येते. गुळवेलीच्या कच्च्यव पानांचा रस काढून रोज सेवन केल्यामुळे आपली त्वचा आतून चमकदार बनते. गुळवेल हे आपल्या शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर काढते. एक डिटॉक्स ड्रिंक म्हणून देखील गुळवेलीचा रस आपण घेऊ शकता.

गुळवेलीच्या काढ्याचा उपाय – (Juice – Giloy In Marathi)

नियमित गुळवेलीच्या काढ्याचे सेवन केल्यामुळे अर्थराइटिस तसेच पचनासंबंधित सर्व आजारांमध्ये लाभ होतो. पोटाच्या आरोग्यासाठी व हाडाच्या आरोग्यासाठी गुळवेलीचा काढा अतिशय उपयुक्त आहे.

गुळवेलीमध्ये असलेल्या anti-inflammatory प्रॉपर्टीज मुळे सर्व प्रकारचे inflammation गुळवेल कमी करते. आयुर्वेदानुसार गुळवेल (Giloy In Marathi) हे वातनाशक आणि कफनाशक आहे. जर आपले पचन व्यवस्थित होत नसेल तर शरीरांमध्ये जास्त प्रमाणामध्ये विषारी पदार्थांची निर्मिती होते, यामुळे वजन वाढते. ते विषारी पदार्थ चरबीच्या रूपात आपल्य‍ अवयवांवर  जमा होऊ लागतात. नियमितपणे एक ते दोन चमचे  गुळवेलीचा ज्यूस रोज सकाळ-संध्याक‍ाळ सेवन केल्यास आपले वजन एक ते दोन महिन्यांमध्ये कमी होते. तसेच वजन अगदी आपल्या उंचीनुसार योग्य प्रमाणात नियंत्रणात राहते.

लहान बालकांकरीता गुळवेलीचा फायदा –

लहान बालकांमध्ये भूक मंदावणे, भूक न लागणे अशा समस्या नेहमीच पाहायला मिळतात. तसेच लहान मुले तापामुळे नेहमी चिडचिड करतात. लहान मुलांची पचनशक्ती देखील अतिशय अशक्त असते. याकरता त्यांचे पचन सुधारावे व अन्नपचन चांगले व्हावे याकरता लहान बालकांना गुळवेलीचे सत्त्व किंवा गुळवेलीचा काढा देण्यात यावा त्यामुळे मुलांना चांगली भूक लागते व मुलांची तापामुळे होणारी किरकिर देखील कमी होते.

गुळवेलाद्वारे बाह्य उपचार –

गुळवेलाचा वापर आपल्या शरीरावरील बाह्य जखमा बऱ्या करण्यासाठी देखील केला जातो. याकरता गुळवेलाच्या पानांचा लेप बनवून तो दुखणाऱ्या जागेवर लावला जातो. जखम झाली असल्यास किंवा सूज आली असल्यास गुळवेलाच्या (Giloy In Marathi) पानांचा लेप बनवून त्या जागी लावल्यास आराम मिळतो. मात्र गुळवेलीचा लेपाचा प्रयोग आपल्या शरीरावर व त्वचेवर लावण्याअगोदर टेस्ट करावे. जर गुळवेलीचा लेप त्वचेवर लावल्यामुळे आपल्याला खाज, फोड, चट्टे, पुळ्य‍, सूज किंवा कुठल्याही प्रकारचे रॅशेस येत नाहीत ना याची खात्री करून घ्यावी.कारण बर्‍याचशा  लोकांना गुळवेलामुळे ॲलर्जी होते.

गुळवेलीचा लेप शरीरावर व त्वचेवर लावण्यासाठी आपण नेहमी मध किंवा दुधासोबतच गुळवेलाच प्रयोग करावा.

सारांश –

या लेखाद्वारे आपण  गुळवेलाच्या औषधी गुणांचा व गुळवेलाचा विविध आजारांमध्ये व विकारांमध्ये कशा प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो याबद्दल माहिती घेतली. गुळवेलाची वेगवेगळी नावे देखील आपणाला या लेखातून समजली असतील. गुळवेल (Giloy In Marathi) वातनाशक व कफनाशक असल्यामुळे विविध प्रकारच्या वात व कफ विकारांमध्ये गुळवेलाचा वापर केला जातो.

सर्व प्रकारचे संधिवात, सांधेदुखी, आमवात यामध्ये गुळवेलाचे सेवन करणे आरोग्यासाठी हितकारक असते. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारख्या पांढऱ्या पेशींवर हल्ला करणाऱ्या आजारांपासून गुळवेलीचे सेवन रोगांशी लढण्याची शक्ती वाढवते व रोगप्रतिकारक शक्ती वाढून पेशंटला स्थिर करण्यामध्ये गुळवेल (Giloy In Marathi) प्रभावी उपचार मानली जाते. गुळवेल चूर्ण, सत्व, काढा, ज्यूस व  टॅबलेट स्वरूपात बाजारात उपलब्ध आहे. मात्र गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व शस्त्रक्रिया झालेल्या लोकांनी, गुळवेलीचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

आमचे इतर लेख वाचा इथे :

वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता

आरोग्यविषयक चांगल्या सवयी लावून घेण्याचे 10 मार्ग 

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories