10 Healthy Benefits Of Jeshthamadh In Marathi – जेष्ठमधाचे आयुर्वेदिक फायदे

जेष्ठमध (Jeshthamadh) ही एक आयुर्वेदिक जडीबुटी असून आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेष्ठमधाचे फायदे देखील माहीत आहेत. जेष्ठमधाला आयुर्वेदिक भाषेमध्ये ‘मुलेठी’ असे म्हटले जाते. सर्दी- खोकला व ताप यामध्ये आराम मिळण्याकरता सामान्यतः जेष्ठमधाचा वापर केला जातो.

घसा बसणे, घशाची खवखव होणे यामध्ये उपचार म्हणुन जेष्ठमधाच्या आयुर्वेदिक गोळ्या देखील बाजारामध्ये उपलब्ध असतात. ज्या खाल्ल्यामुळे घशाची खवखव तसेच घसा दुखणे देखिल थांबते. जेष्ठमधाचा वापर अगदी पुर्वापार वेगवेगळ्या शारीरीक आजारांवर केला जातो. आयुर्वेदामध्ये अनेक अौषधे व चुर्ण तसेच काढे बनवण्याकरता जेष्ठमध वापरले जाते. जेष्ठमधाचा वापर करुन आपण अनेक साध्या आजारांपासुन अगदी गंभीर दुखण्यांमध्ये देखील उपचार करता येतो.

1 4

आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये जेष्ठमध म्हणजेच मुलेठीच्या महत्त्वपूर्ण फायद्यांबद्दल माहिती सांगणार आहोत. आजीबाईच्या बटव्यामध्ये ज्येष्ठमधापासून अनेक प्रकारचे घरगुती नुस्खे बनवले जातात. तर घरगुती उपचारांबरोबरच वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील जेष्ठमधाच्या काड्यांपासुन बनवल्या जाणार्‍या पावडरचा वापर केला जातो. जेष्ठमधाचे फायदे जाणून घेण्याअगोदर आपल्याला जेष्ठमध नक्की काय आहे? याबद्दल माहिती जाणून घेणे आवश्यक आहे चला तर जाणून घेऊया जेष्ठमधाविषयी सविस्तर माहिती!

जेष्ठमध ओळख – (Introduction of Jeshthamadh)

जेष्ठमधास आयुर्वेदात यष्टिमधु किंवा जेष्ठमध असे देखील म्हटले जाते. हिंदीमध्ये ज्येष्ठमध आला मुलेठी असे म्हटले जाते जेष्ठमध ही अतिशय महत्त्वपूर्ण व गुणकारी आयुर्वेदिक जडीबुटी आहे सर्दी पडसे व खोकला या मध्ये आराम मिळण्याकरता सामान्यपणे या जडीबुटी चा वापर केला जातो मात्र या चमत्कारी जडीबुटी चे अनेक फायदे आहेत जे आपल्याला माहित देखील नसतात जेष्ठमधाचा वापर मुख्यत्वे आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी केला जातो

जेष्ठमध काय आहे ? (What Is Jeshthamadh?)

जेष्ठमध काय आहे ? जेष्ठमध हे एक झुडूप किंवा रोपटे आहे. या झुडपाचे किंवा रोपाचे संपूर्ण खोड सालीसहीत सुकवून त्याचा वापर करतात. जेष्ठमधाच्या खोडामध्ये भरपूर आयुर्वेदिक गुण असतात. चवीला गोड असलेले जेष्ठमध आयुर्वेदिक औषध म्हणून वापरले जाते. याशिवाय दात व हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच घसा दुखीसाठी देखील जेष्ठमधाचा वापर केला जातो. याच कारणामुळे अनेक आयुर्वेदिक टूथपेस्टमध्ये आता जेष्ठ मधाचा वापर केला जातो.

2 4

जेष्ठमधाचे इतर भाषांमधील नावे- ( Name of Liquorice in Different Languages)

English : Liquorice root (लिकोरिस रूट)

Sanskrit : यष्टीमधु, यष्टीमधुक, मधुयष्टि, जलयष्टि, क्लीतिका, मधुक, स्थल्यष्टी

Hindi : मुलहठी, मलेटी, मुलेठी, मीठी लकड़ी, जेठीमधु

Urdu : मुलेठी (Mulathi)

Kannad :  जेष्टमधु (Jeshthamadhu), यष्टिमहुकम (Yashtimahukam)

Gujarati :  जेठीमध (Jethimadha)

Marathi :  जेष्टिमधु (Jeshtimadhu), जेष्टमध (Jeshtimadha)

जेष्ठ मधाचे फायदे आणि सेवन करण्याची पद्धत (Jeshthamadh Benefits and uses in Marathi)

अनेक रोगांमध्ये औषध म्हणून जेष्ठमधाच्या पावडरचा वापर लाभदायक ठरतो. जेष्ठमधामध्ये वात आणि पित्त दोष कमी करण्याचे औषधी गुण असतात. अनेक आजारांच्या उपचारांतदेखील जेष्ठमधाचा वापर केला जातो. विशेषत: त्वचा रोग झाल्यास जेष्ठमधाचा वापर केला जातो. जेष्ठमधाचा वापर केल्यामुळे रक्त शुद्ध होते, केस वाढतात आणि बुद्धिमत्ता तल्लख होते. याशिवाय

3 4

जेष्ठमधाचे अजून काही अनोखे फायदे आहेत ज्याबद्दल आपण पुढे माहिती घेणार आहोत!

डोकेदुखीमध्ये आराम  (Benefits of Jeshthamadh for headache in Marathi )

जर आपल्याला कायम डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत असेल तर जेष्ठमध आपल्या करता अतिशय चांगले औषध ठरते. जेष्ठमध चूर्ण म्हणजे जेष्ठमध पावडर एक भाग घेवून त्यामध्ये एक चतुर्थांश कलिहारी चूर्ण व थोडेसे मोहरीचे तेल मिसळून केवळ याचा वास घेतल्याने देखील डोकेदुखीमध्ये आराम मिळतो.

केसवाढीकरता जेष्ठमधाचे फायदे ( use of Jeshthamadh for Hair Growth in Marathi)

केस वाढवण्याकरता जेष्ठमधाचा वापर केला जातो. जेष्ठ मधामध्ये केसांना पोषण देणारी व केस वाढण्यासाठी प्रोत्साहन देणारी तत्वे असतात. जेष्ठमध पावडर पाण्यामध्ये उकळून ते पाणी थंड करून केस धुतल्याने केसांचे आरोग्य सुधारते व केसांचे पोषण होऊन केस वाढण्यास मदत होते. याशिवाय ज्येष्ठमध आणि तीळ म्हशीच्या दुधामध्ये दळून केसांना लेप लावल्यास केस गळती थांबते.

जेष्ठमधाचा माइग्रेनवर उपाय – (Jeshthamadh for Migraine pain in Marathi )

ज्या लोकांना सतत अर्धशिशीचा त्रास होतो, अर्धे डोके कायम दुखत असते अशा मायग्रेनचा रुग्णांकरिता जेष्ठमधाचा वापर अतिशय लाभदायी ठरतो. जेष्ठमध चुर्ण म्हणजेच जेष्ठमध पावडर व मध एकत्र मिसळून नाकामध्ये नेझल ड्रॉप प्रमाणे टाकल्यास अर्धशिशीच्या त्रासामध्ये आराम मिळतो.

जेष्ठमधाचा अकाली केस पांढरे होण्यावर उपाय (Jeshthamadh use in controlling premature hair greying in Marathi)

वाढत्या वयासोबत केस पांढरे होणे हा निसर्गनियम आहे. मात्र आजकाल अगदी लहान-लहान मुलांचे व तरुणांचे कमी वयात अकाली केस पांढरे होत आहेत. या समस्येवर उपाय करण्याकरता लोक मेहंदी,डाय लावुन केस काळे करतात. केमिकलयुक्त डाय किंवा हेअस कलर्समध्ये हानीकारक अमोनिआ नावाचे केमिकल असते.

4 3

केस काळे किंवा शेड येत असली तरी सततच्या केमिकलयुक्त हेअर कलर्स व डायच्या वापरामुळे केसांचे अतोनात नुकसान होते. जेष्ठमधाचा वापर करून आपण केस गळती व केस पांढरे होण्याच्या समस्या रोखु शकता. त्याकरता आपल्याला 50 ग्रॅम जेष्ठमध पावडर, 750 मिलिग्रॅम आवळ्याचा रस व 750 मिलीग्रॅम तिळाचे तेल एकत्र मिसळून त्याचे चांगले मिश्रण बनवायचे आहे. नियमित हे  तेल एक ते दोन थेंब नाकामध्ये टाकल्यामुळे अकाली केस पांढरे होणे थांबते व केस गळण्याची समस्या देखील कमी होऊ लागते.

जेष्ठमधाचा डोळ्यांच्या आजारांवर उपाय (use of Jeshthamadh for Eye diseases)

डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, रांजणवडी होणे, कन्जक्टीव्हीटी किंवा डोळे येणे अशा अनेक प्रकारच्या डोळ्यांच्या आजारांमध्ये जेष्ठमधाचा उपयोग केला जातो. जेष्ठमधाचा काढा करून त्याने डोळे धुतल्यामुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये फायदा होतो. जेष्ठमधाचे चूर्ण आणि बडीशेप हे समप्रमाणात घेऊन दळुन घ्यावे. हे चूर्ण सकाळ-संध्याकाळ रोज खाल्ल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारते व डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे, तसेच दृष्टी कमी होणे अशा समस्यांमध्ये चांगला लाभ मिळतो.

5 3

कन्जेक्टिव्हिटी म्हणजेच डोळे येणे या समस्यांमध्ये देखील  जेष्ठमधाचा उपयोग होतो. आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे डोळ्यांची सूज येवुन डोळे लाल होणे तसे डोळ्यांमधून पू येणे या समस्या दूर होतात. जेष्ठमध पाण्यात दळुन त्यामध्ये कापसाचा बोळा बुडवुन डोळ्यांवर पट्टी बांधल्यास डोळे लाल होणे किंवा लाली येणे कमी होते. ज्येष्ठ मध व आंवळा पाण्यात एकत्र दळुन अंघोळीच्या पाण्यात मिसळुन अंघोळ केल्याने तसेच डोळे धुतल्याने पित्त कमी होते. तसेच डोळ्यांतील पांढर्‍या डागांवर जेष्ठमध उपयुक्त आहे.

जेष्ठमधाचा पित्तामुळे होणार्‍या कानाच्या रोगांवर उपाय (Jeshthamadh for Ear diseases in Marathi )

जेष्ठ मध व द्राक्ष एकत्र दुधात शिजवुन त्याचे काही थेंब कानात टाकण्याने पित्तामुळे होणारे कानासंबंधी दुखण्य‍ांमध्ये लाभ होतो. जेष्ठमधाचे औषधी गुण कानासंबंधी आजारांमध्ये खुप लाभदायक आहेत.

जेष्ठमधाचा नाकाच्या आजारांवर उपाय (use of Jeshthamadh for Nasal Problems in Marathi)

3-3 ग्रॅम जेष्ठमध व सुंठामध्ये 6 वेलची आणि 25 ग्रॅम खडीसाखर मिसळुन चांगल‍ा काढ़ा बनवावा. या काढ्याचे 1-2 थेंब नाकात टाकल्याने नाकाचे रोग ठीक होतात.

जेष्ठमधाचा तोंड येणे व तोंडातील फोडांवर उपाय (use of jeahthmadh for Mouth ulcers in Marathi) उष्णता विकारांमुळे किंवा विटामीन बी च्या कमतरतेमुळे

सतत तोंडात फोड येणे, तोंड येणे या समस्या होतात. जर यावर आपण चांगले प्रभावी अौषध शोधात असाल तर जेष्ठमध हे अतिशय उपयुक्त अौषध आहे. तोंडातील फोड जाण्याकरता जेष्ठमधाचे तुकडे मधात बुडवुन चोखुन चोखुन खावे. याने तोंड येणे व तोंडातील फोड लगेच बरे होतात.

जेष्ठमधाचे फायदे- घसा बसणे, आवाज घोगरा होणे यावर उपाय (Jeshthamadh benefits for Hoarseness in Marathi)

बरेचदा वातावरणातील बदलांमुळे किंवा विषाणु संक्रमणामुळे घसा बसणे,आवाज घोगरा होणे असे बदल होतात. बरेचदा आवाज ही नीट निघत नाही इतके घशात इन्फेक्शन होते. याकरता ज्येष्ठ मधाची काडी केवळ तोंडात ठेवुन लॉलीपॉप सारखी चघळत राहिले तरी घसा बसण्याच्या समस्येमध्ये आराम पडतो. ज्येष्ठ मध चोखल्याने घसा व गळ्यातील बरेचसे इन्फेक्शन व विषाणु संक्रमण दूर होण्यास मदत होते.

खोकला किंवा कोरडा खोकल्यावर जेष्ठमधाचा उपाय (jeshthamadh for cough & dry cough in Marathi):

जेष्ठमधाची काडी तोंडामध्ये ठेवून जास्त वेळ पर्यंत चोखत बसल्यास खोकल्यामध्ये आराम मिळतो व खोकला येत नाही. जर आपल्याला जास्त कोरडा खोकला होत असेल व खोकल्याची उबळ आल्यावर खोकला थांबत नसेल तर एक चमचा जेष्ठमध पावडर दोन-तीन चमचा मधासोबत चाटण करून दिवसातून 3 -4 वेळा घ्यावे. यामुळे खोकल्यामध्ये लवकर आराम मिळतो. जेष्ठमधाचा काढा बनवून 20 ते 25 मिली प्रमाणात सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास आपल्याला खोकल्यामध्ये आराम मिळतो.

जेष्ठमधाचा उचकी थांबण्याकरता उपाय (Jeshthamadh use to stop hiccups in Marathi)

जर आपणास एकसारखी उचकी येत असेल तर आपण बरेच घरगुती उपाय आजमावत असतो. मात्र उचकी बंद होण्यासाठी केवळ जेष्ठमधाची काडी तोंडात ठेवल्याने व चोखल्याने काही मिनटात उचकी येणे बंद होते.

जेष्ठमधाचे श्वसनासंबंधी आजारांमध्ये उपयोग (Jeshthamadh use for respiratory disorder in Marathi)

बर्‍याचदा श्वास जड होणे, धाप लागणे तसेच श्वासासंबंधी आजार सुरु होतात. याकरता जेष्ठमधाचा काढा नियमित 10-15 मिली दिवसातुन 3 वेळेस घेतल्यास श्वासासंबंधीचे आजार बरे होतात.

जेष्ठमधाचा ह्रदयरोगावर उपयोग (Jeshthamadh benefits for Heart diseases in Marathi)

ह्रदयरोग्यांसाठी उपाय म्हणुन 3-5 ग्रॅम ज्येष्ठ मध चुर्ण आणि तेवढ्याच प्रमाणात कुटकी चूर्ण एकत्र करुन घ्यावे. हे मिश्रण रोज 15-20 ग्रॅम साखर पाण्यात विरघळवुन त्या पाण्यात एकत्र करावे व हे पाणी रोज नित्यनियमाने प्यावे. या पाण्याच्या नियमित सेवनामुळे ह्रदयासंबंधी सर्व आजारांपासुन बचाव होतो व आराम मिळतो. पित्त दोषामुळे होणार्‍या ह्रदय रोगांकरता गंभारी, जेष्ठमध,मध, साखर यांना एकत्र मिसळुन चुर्ण बनवावे.  हे चुर्ण खाऊ घालुन उलट्या करवुन घ्याव्यात यामुळे पित्त बाहेर पडते.

जेष्ठमधाचा पोटाच्या अल्सरकरता उपाय (Jeshthamadh benefits for Stomach ulcers in Marathii)

पोटाचा अल्सर ही अतिशय गंभीर समस्या आहे. अल्सरचा उपचार करने बरेचदा खुप खर्चिक असते. याशिवाय अल्सरवर उपचार करणे गरजेचे देखील असते. वैद्यकीय उपचारांसोबतच पोटाच्या अल्सरवर काही घरगुती उपाय करणे देखील आवश्यक असते. जेष्ठमधाचा उपयोग आपण अल्सरवर घरगुती उपाय म्हणुन करु शकता.

याकरता एक चमचा जेष्ठमध चूर्ण एक कप दूधासोबत दिवसातून 3 वेळा सेवन करावे. यासोबतच पथ्य म्हणुन पोटातील अल्सर झाल्यास मिरची- मसाले आणि  तिखट पदार्थ खाणे वर्ज्य करावे.

पोटदुखीवर जेष्ठमधाचा उपाय-(Jeshthamadh benefits for stomach pain in Marathi)

अपचन, अॅसिडीटी, शिळे अन्न खाणे यामुळे बरेचदा पोटदुखी होते. याकरता उपाय म्हणुन 1 चमचा ज्येष्ठ मधाचे चूर्ण मधामध्ये मिसळुन दिवसातून  3 वेळेस खायला द्यावे. या उपायामुळे पोट आणि आतड्यांमधील दुखणे थांबते व पोटदुखीपासुन सुटका होते.

जेष्ठमध – पोट फुगण्यावर उपाय (Jeshthamadh use for flatulence in Marathi)

पोटफुगीच्या समस्येमुळे अनेक लोक आज त्रस्त आहेत. खाल्लेले अन्न व्यवस्थित न पचल्याने तसेच शारीरिक कसरत व व्यायाम न केल्याने अनेक लोकांना पोटफुगी होते. पोटाचा आकार फुग्यासारखा वाढतच जातो. यावर उपाय म्हणुन 2-5 ग्रॅम जेष्ठमध चूर्ण पाणी आणि साखरेसोबत मिसळुन खाल्ल्यास पोटाची चरबी कमी कमी होते व वाढलेला पोटाचा घेर हळुहळु कमी होतो.

जेष्ठमधाचा उल्टीतुन रक्त पडत असल्यास उपाय-म (Jeshthamadh use  for blood in vomiting) :

उल्टीमधुन रक्त येत असेल तर ही समस्या गंभीर असते. कॅन्सर, टी.बी यासारखे गंभीर कारण नसेल व उल्टीतुन रक्त येत असेल तर आपण जेष्ठमध आणि रक्त चंदन चूर्ण दोन्हीचे 1-2 ग्रॅम घेवुन हे मिश्रण 50 मिली दूधात मिसळावे. थोड्या-थोड्या कालांतराने हे सेवन केल्यास उल्टीमधुन रक्त येणे पूर्णपणे बंद होते.

जेष्ठमधाचा अॅनिमियावर उपयोग (Jeshthamadh for Anemia in Marathi)

बर्‍याच स्त्रियांमध्ये रक्ताल्पता पाहायला मिळते तसेच काही आजारांमध्ये व तापात रक्त कमी होते. ज्याला आपण अॅनिमिया असे देखील म्हणतो.  शरीरात रक्त कमी झाले तर हिमोग्लोबीन कमी होऊन गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. याकरता रक्तवाढीसाठी उपचार करावे लागतात. जेष्ठमध हे रक्तवाढीकरता अतिशय लाभदायक आहे. याकरता एक चमचा जेष्ठमध चूर्ण एक चमचा मधासोबत रोज खावे किंवा 10-20 मिली जेष्ठमध काढा बनवुन त्यात मध मिसळुन प्यावे.

जेष्ठमध लघवीच्या जळजळीवर उपयुक्त( Jeshthamadh use for  UTI in Marathi)

युरीनरी इन्फेक्शन किंवा उष्णतेच्या विकारांमध्ये लघवीला आग होणे, जळजळ होणे अशा प्रकारचे त्रास होतात. याकरता एक चमचा जेष्ठमध चूर्ण एक कप दूधासोबत नियमित सेवन करावे. यामुळे लघवीला जळजळ होणे, आग होणे कमी होते.

जेष्ठमधाचा यूरिनरी रिटेंशनपासुन बचाव (jeshthamadh for urinary retention in Marathi)

जेष्ठमध, हळद आणि एर्वारुबीज यांचे चूर्ण समप्रमाणात घेवुन एकत्र मिसळावे. दिवसातून तीन-चार वेळा तांदळाच्या धुवनात म्हणजेच तण्डुलोदक मध्ये मिसळुन प्यायल्यामुळे आराम मिळतो.

जेष्ठमध स्तनदा मातांना दूध जास्त येण्याकरता उपाय- (Jeshthamadh benefits for increasing milk after delivery)

बाळंतपणानंतर बर्‍याचशा महिलांना दुध कमी येते किंवा कमी दुध येण्यामुळे बाळाचे पोट भरत नाही. बाळाला जन्मानंतर 6 महिने केवळ आईचे दूधच पाजावे लागते. ज्यामुळे बाळाचे अनेक आजारांपासुन संरक्षण होते. मातेला दुध कमी आल्यास बाळाची वाढ चांगली होत नाही. दुध येण्यासाठी लॅक्टोज ग्रंथींना सक्रीय होणे आवश्यक असते. स्तनद‍ा मातांना जेष्ठमधाचे चूर्ण नियमित सेवन करण्यास दिले तर बाळंतपणानंतर स्त्रियांना दुध कमी येणे किंवा दुध न येणे असे त्रास होत नाहीत. जेष्ठमध स्तनांमध्ये दूध निर्माण करणार्‍या ग्रंथींना सक्रीय करतात. 

2 चमचे जेष्ठमध चूर्ण आणि 3 चमचे शतावरी चूर्ण एक कप दूधामध्ये चांगले उकळुन घ्यावे. हे मिश्रण काढ्याप्रमाणे अर्धे होईस्तोवर चांगले शिजु द्यावे. मिश्रण अर्धे झाल्यावर गॅस बंद करावा. हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ अर्धे-अर्धे एक कप दूधात मिक्स करुन प्यावे. याव्यतिरिक्त 100 मिली दूधात  2-4 ग्रॅम ज्येष्ठ मध आणि 5-10 ग्रॅम साखर मिक्स करुन रोज बाळंत स्त्रीला  सकाळ- संध्याकाळ प्यायला द्यावे. या उपायाने दुध जास्त तयार होते व बाळाचे पोट भरते.

जेष्ठमधाचा मासिक पाळीमध्ये अधिक रक्तस्राव किंवा रक्तप्रदर आजारांमध्ये उपाय (Jeshthamadh use for monorrhegia or heavy bleeding in menstruation in women)

अनेक महिला आणि मुलींना मासिक पाळी दरम्यान अतिरक्तस्त्रावाची समस्या होत असते. काही महिलांना मासिक पाळीमध्ये जास्त दिवस अंगावरुन रक्तस्राव होतो. ज्यामुळे महिलांचे आरोग्य खालवते. मासिक पाळीसंबंधी सर्व समस्या तसेच जास्त प्रमाणात रक्तस्राव होण्याची समस्या असेल तर नियमित १ चमचा जेष्ठमध पावडरचे सेवन करावे किंवा 1-2 ग्रॅम ज्येष्ठमध चूर्णामध्ये 5-10 ग्रॅम साखर मिसळुन तांदुळाच्या धुवनाच्या पाण्यात मिसळुन प्यायला द्यावे.

मासिक पाळी बद्दल अधिक माहिती साठी इथे क्लिक करा

जेष्ठमधाचा जखमा, घाव तसेच अल्सरच्या दुखण्यामध्ये उपाय  (Jeshthamadh use for Ulcers, wounds in Marathi )

जखमा, व्रण, घाव लवकर बरे न झाल्यास त्या जागी सुज येते, पु तयार होतो, कधीकधी जखमा चिघळतात लवकर जखम भरुन येत नाहीत. याकरता उपाय म्हणुन ज्येष्ठ मधाचे सेवन करावे. जेष्ठमध चूर्ण तुपात मिसळुन हलके गरम  करुन जखमांवर लावावे. यामुळे जखमा लवकर बर्‍या होतात. तसेच भाजल्यानंतर अंगावर फोड़ आले असतील तर त्यावर जेष्ठमधाचा लेप लावल्याने फोड लवकर पिकुन फुटुन जातात.

जेष्ठमधाचा शरीराचा अशक्तपणा दूर करण्याकरता उपयोग –  (jeshthmash benefits for Weakness in Marathi)

दीर्घ आजारपण किंवा शारीरिक व अंगमेहनतीची कामे जास्त केल्यामुळे येणार्‍या थकव्यामुळे जर आपण अशक्त झाला असाल तर दररोज १ चमाचा जेष्ठमधाचे चुर्ण अर्धा चमचा मध व १ चमचा तुपासोबत घ्यावे. ५ते ७ आठवडे दररोज सकाळ-संध्याकाळ हे चुर्ण दुधासोबत सेवन केल्यास शरीरात बळ येते व ताकद वाढते.

जेष्ठमधाचा शरीराच्या दुर्गंधीवर उपाय (Jeshthamadh use to reduce Body odour in Marathi)

जर आपल्याल‍ा देखील शरीराला कायम घामाचा दुर्गंध येत असेल व अनेक उपाय व परफ्युम वापरुन देखील फरक पडत नसेल तर ज्येष्ठमधाचा वापर करुन पहा.

जेष्ठमधाची पावडर पाण्यात दळुन उटण्यासारखे अंगाला चोळावे व त्यानंतर अंघोळ करावी. हा उपाय नियमित केल्याने अंगाला येणारा घामाचा दुर्गंध पूर्णपणे नाहीसा होतो.

जेष्ठमधाचा मिरगी/फीट येणे वर उपाय (Jeshthamadh benefits for Epilepsy in Marathi)

एक चमचा जेष्ठमध चूर्ण तूपामध्ये मिसळुन दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळ असे 3 वेळा सेवन केल्यास मिरगी येणे किंवा फीट येणे या आजारांमध्ये लाभ होतो. याशिवाय 5 ग्रॅम जेष्ठमध पावडर पेठ्याच्या रसात मिसळुन सलग 3 दिवस खाल्ल्याने मिरगी व फीटच्या आजारात आराम मिळतो.

सारांश – Conclusion

या लेखामध्ये आपण जेष्ठमधाबद्दल माहिती घेतली. जेष्ठमधाचा वापर करण्याकरता जेष्ठमध पावडर किंवा चुर्ण स्वरुपात वापरता येते.डोकेदुखी, अर्धशिशी,घसा दुखणे,घसा बसणे,केसगळती, अकाली केस पांढरे होणे यासारख्या केसांसंबंधी समस्येमध्ये जेष्ठमधाचा वापर केला जातो. उल्टीतुन रक्त येणे,श्वसनासंबंधी आजारांमध्ये, उचकी येणे, ह्रदयरोग, अल्सर, खोकला व कोरडा खोकला यामध्ये देखील जेष्ठमधाचा अौषध म्हणुन उपयोग होतो.

6 4

एवढेच काय तर नाकाचे आजार, कानदुखी, पित्तदोष, डोळ्यांचे आजार याकरता देखील जेष्ठमधाचा उपयोग होतो. या लेखातुन आपण जेष्ठमधाचा उपयोग चुर्ण व काढा बनवुन कसा करावयाचा आणि किती प्रमाण घेवुन अौषधी काढे बनवायचे यांबद्दल देखील माहिती घेतली.

या उपायांना करताना आपल्याला काही गंभीर आजार असले तर आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा.

हे हि वाचा :

मधुमेह म्हणजे काय? मधुमेह लक्षणे आणि आयुर्वेदिक उपचार !

सांधेदुखी म्हणजे काय? सांधेदुखीची कारणे, लक्षणे आणि उपाय !

चिया सीड्स किंवा सब्जाचे बी खाण्याचे फायदे !

मखाना (कमळाचे बी) खाण्याचे आरोग्याला होणारे 9 फायदे!

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories