तुम्हाला एरंडेल तेलाचे फायदे माहीत आहे का? चेहऱ्याच्या समस्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत फायदेशीर वनस्पती तेल…

 एरंडेल तेलाचे फायदे आरोग्य शास्त्रामध्ये एरंड ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आणि बहुउपयोगी मानली जाते. त्यामुळे आयुर्वेदात या एरंडेल तेलास अमृताची उपम दिली आहे. कारण हे तेल अंगास लावल्यास किंवा त्याचे सेवन केल्यास आपले डोके व तळ पायांना शांतता मिळते. तसेच सर्व प्रकारच्या उष्णतेच्या समस्या दूर होतात. याचबरोबर या तेलाच्या दिव्यानेसुद्धा डोळ्यांना थंडावा मिळतो.

त्यामुळे या एरंडेल तेलाचा औषधी म्हणून, खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने खोकला, पोट दुःखी यासारख्या अनेक समस्यांवर या तेलाचा वापर केला जातो.

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या तेलाच्या वापरामुळे आपल्याला कफ, वात आणि पित्त नियंत्रणात आणण्याचे मदत होते. ही एक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे, अनेक औषधी बनवण्यासाठी देखील एरंडेल तेलचा वापर केला जातो.

सूज कमी करण्यासाठी

जर अपघातामुळे किंवा पडल्यामुळे तुमच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाला सुज आली असेल तर,त्या ठिकाणी एरंडेल तेलाने मालिश केल्यास सुज कमी होण्यास सुरुवात होते. तसेच एरंडेलच्या  तेलामध्ये रिकिनो लिक एसिड असल्यामुळे, एका वाटीत हे एरंडेल तेल घेऊन थोडे गरम करून, हलक्या हाताने सुजेच्या प्रभावित जागेवर मालिश केल्यास जर हाता पायाची सुज कमी होते.

दुखणे दूर करते

या आयुर्वेदिक एरंडेल तेल अवयवाची  सुज कमी करण्यासोबतच, शरीराच्या स्नायूंमध्ये होणारे दुखीही कमी करण्यासाठी मदत करते. तुम्हाला जर गुडघेदुःखी, मानदुःखी किंवा कोपराच्या स्नायूं दुखत असल्यास, एरंडेल तेलात लसणाच्या दोन पाकळ्या टाकून त्याला गरम करून लावल्यास, दुखणे कमी होते.

पोट साफ होण्यासाठी

आपल्यापैकी अनेक लोकांना पोटासंबंधीत अनेक समस्या निर्माण झालेल्या असतात.यामध्ये पोट साफ न होणे, तसेच सतत पोटात दुखणे असा सर्व प्रकारच्या पोटासबंधीत समस्या दूर करण्यासाठी, तुम्ही दररोज रात्री झोपण्याआधी एक चमचा एरंडेल तेल सेवन करावे. तुम्ही याचे सेवन दुधासोबत ही करू शकतात.कारण एरंडेल तेलमध्ये लेक्सटिव नावाचा घटकमुळे पोटाचें सर्व आजार बरे होतात.

वजन कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचे फायदे

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना लट्टपणाची समस्या वाढत आहे. त्यामुळे आपण या बहुगुणी एरंडेल तेलचा उपयोग करून, अनावश्यक चरबी आणि वजन कमी करू शकतो.त्यासाठी दोन ग्लास पाणी घेऊन,ते गरम करून त्या पाण्यात आल्ले टाकून त्याला उकळून ते पाणी एका भांड्यात गाळून त्यामध्ये ग्रीन-टी आणि एरंड तेल टाकुन, हे पाणी दररोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी घेतल्यास, वजन कमी होऊ लागेल.

सर्दी खोकल्यात एरंडेल तेलाचे फायदे

एरंडेल तेल गरम करून ,आपल्या नाकावर आणि छातीवर लावल्यास,आपले नाक गाळण्यास पूर्णपणे बंद होते आणि सर्दी, खोकल्यापासून सुटका होते.

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी

आपण जर चेहऱ्यावरील डाग किंवा मुरूमाने त्रस्त असल्यास, चेहऱ्यावर डाग आल्यावर एक चमचा एरंडेल तेलात थोडासा खाण्याचा सो डा टाकावा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. हे तेल लावल्याने चेहऱ्यावर असलेल्या मृत पेशी निघून जातात आणि वांग व काळे डाग फिकट होऊन जातात.

केसांसाठी एरंडेल तेलाचे फायदे

केसांच्या आरोग्यासाठी एरंडाचे तेल खूप उपयोगी आहे. कारण यामधील रेसिनो लेईक ॲसिड बरोबर ओमेगा 6 आणि फॅटीऍसिड या घटकांमुळे, आपल्या डोक्यातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे केसांची पौष्टिकता वाढते आणि केस वाढवण्यासाठी मदत मिळेल.

याचबरोबर, आपल्या केसात कोंडा झाला असेल तर, एका वाटीत नारळाचे तेलात एरंडेल तेल मिक्स करून, हे मिश्रण योग्य प्रकारे  पद्धतीने केसांमध्ये लावल्यास, केसांमधील कोंडा कमी होण्यास सुरुवात होतो.त्याबरोबर  केसांमधील आग किंवा खाज बंद होते. रात्री झोपण्याआधी 10-15 थेंब ऐरंडेल तेल बेंबीत टाकल्यास,पोटादुःखी आणि अपचनची समस्या दूर होते.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories