केसांच्या आणि त्वचेच्या या समस्यांमध्ये मध्ये उपयुक्त ठरतात धणे, असा करा वापर !

नितळ, तेजस्वी, तुकतुकीत त्वचा आणि सुंदर मजबूत केस हे आपल्या सौंदर्याचे प्रमुख अंग मानले जातात. निरोगी स्वास्थ्याकरिता आपली त्वचा (skin care) आणि केस (hair care)हे प्रमुख प्रावधाने म्हणून गणले गेले आहेत. केसांच्या आणि त्वचेच्या अनेक तक्रारीमध्ये आपण घरगुती व आयुर्वेदिक उपचार घेत असतो.

पण आपल्याला माहित आहे का आपल्या रोजच्या ओळखीचे असलेले धनेदेखील आपल्याला केसांच्या आणि त्वचेच्या तक्रारींमध्ये उपयुक्त ठरू शकते. धने म्हणजेच आपण आपल्या रोजच्या भाजीमध्ये जी कोथिंबीर वापरतो त्या कोथिंबीरीचे बी होय.

कोथिंबिरी शिवाय कोणत्याही भाजीला चव येत नाही. भाजीची चव आणि स्वाद वाढवण्याकरता आपण कोथिंबीरीचा वापर करतो. कोथिंबीर अँटी- बॅक्टेरियल आणि अँटी- फंगल प्रॉपर्टीनी युक्त असते, त्यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहते. कोथिंबिरी बरोबरच कोथिंबिरीचे बी असलेले धने देखील तेवढेच उपयुक्त व औषधीय आहे.

त्वचेच्या अनेक समस्या जसे त्वचेवर सुरकुत्या येणे, अंगाला खाज येणे अशा अनेक प्रकारच्या त्वच‍ा विकारांमध्ये धने आपल्याला उपयुक्त ठरते. यासोबतच आपल्या केसांच्या त्वचेचे संरक्षण करण्यास देखील धने उपयुक्त आहेत. केसांचे आरोग्य चांगले राहण्यास करता देखील धन्याचा उपयोग होतो.

आज या लेखाद्वारे आम्ही आपल्याला धन्याचा केस आणि त्वचेसाठी कशा प्रकारे उपयोग करता येऊ शकतो याबद्दल माहिती सांगणार आहोत.

  • धन्याचे त्वचेकरता असलेले फायदे :
2 25

धन्यामध्ये अँटिऑक्सिडंट anti-inflammatory प्रोपर्टी असतात. तसेच मोठ्या प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्सदेखील असतात ज्यामुळे त्वचेवर येणारा लालसरपणा, खाज, सूज यामध्ये धन्याचा उपयोग अगदी आरामदायी ठरतो. धन्याच्या नित्य सेवनामुळे आपली त्वचा नितळ व मुलायम राहते. धन्यामध्ये विटामिन, बीटा कॅरोटीन आणि फॉलेट देखील मोठ्या प्रमाणात आढळते. सूर्यापासून निघणार्‍या हानिकारक अतिनील किरणांपासून ते आपल्या त्वचेचे संरक्षण करतात. चेहऱ्यावर येणाऱ्या ऍक्ने म्हणजेच मुरूम ,पुटकळ्यांच्या समस्येमध्ये देखील धने लाभदायक ठरते.

  • केस गळती साठी धन्याचा उपयोग :
3 24

बरेचदा हार्मोन्स प्रॉब्लेममुळे केस गळती होते. स्त्री व पुरुषांमध्ये आजकाल प्रदूषणामुळे केस गळतीचे प्रमाण वाढत चालले आहे. जास्त प्रमाणात केस गळती झाल्यास टक्कल पडू शकते. केस गळती थांबवण्याकरता धन्यांची कुटुन पावडर करावी. धन्याच्या पावडरचा लेप तयार करून केसांना लावल्यास केस गळती समस्या दूर होते. धण्यामध्ये विटामिन ए ,विटामिन बी, विटामिन के आढळते. ज्यामुळे केस मजबूत आणि घनदाट होण्यास मदत होते.

  • मुरूम आणि पुटकुळ्यांपासून संरक्षण आणि मुक्ती :
4 25

चेहऱ्यावर वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या केमिकलयुक्त क्रीम्स आणि साबणामुळे चेहऱ्यावर एक्ने म्हणजेच मुरूम पुटकुळ्या होण्याचे प्रमाण जास्त पाहायला मिळत आहे. ही मुरूमं व पुटकुळे एकदा आली तर पुन्हा -पुन्हा येत राहतात. धन्यामध्ये असलेल्या anti-inflammatory अँटी-बॅक्टेरियल प्रॉपर्टीजमुळे आपल्या त्वचेचे एक्नेपासून रक्षण होते. एक्ने म्हणजेच मुरूम- पुटकुळ्यांची समस्या देखील पूर्णपणे नष्ट करता येऊ शकते. धन्यामध्ये असलेले अँटी-फंगल आणि अँटीमायक्रोबियल गुण आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स देखील नष्ट करतात.

  • केसातील खाज व डॅंड्रफ दूर करण्यासाठी धण्याचा वापर :
5 23

आजकाल वातावरणातील प्रदूषणामुळे केस कोरडे होत आहे. त्यामुळे केसांमध्ये खाज येते व डँड्रफ म्हणजेच कोंडा देखील मोठ्या प्रमाणात होताना आढळत आहे. कोंड्याच्या समस्याेपासून मुक्ती मिळण्याकरता धन्याची पावडर करून त्यामध्ये पाणी टाकून त्याचा लेप केसांना लावल्याने किंवा ज्यूस बनवून केसांना लावल्याने देखील सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात.
धने बारीक वाटून त्याची पेस्ट करून आपल्या केसांच्या त्वचेवर लावल्यास डँड्रफ आणि खाज पूर्णपणे दूर होते.

  • सूज कमी करण्यासाठी धण्याचा वापर :
6 19

शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या सुजेकरता धन्याचे पाणी पिण्याचा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टर देतात. धन्यामध्ये असलेल्या anti-inflammatory गुणांमुळे सर्व प्रकारची सूज बरी करण्यासाठी धन्याचा वापर केला जातो.
संधिवातामध्ये होणारे सांध्यांचे दुखणे, तसेच थायरॉईड सारख्या आजारांमध्ये देखील धन्यामुळे आराम मिळतो. आपणही शरीरामधील कोणत्या भागामध्ये सुजेमुळे त्रस्त असाल तर धन्याच्या वापर करा.

  • धन्याच्या वापर कसा करावा ?
7 12

त्वचेचे सौंदर्य चांगली राहण्याकरता आठवड्यातून एकदा आपली त्वचा स्क्रब केली पाहिजे. धन्याचा स्क्रबर बनवून आपण आपल्या त्वचेचे स्क्रबिंग करू शकता. धन्यामध्ये एंटीऑक्सीडेंट सोबतच विटामिन बी देखील असतात. जे नैसर्गिक रित्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत करतात.या शिवाय आपण आपल्या आहारामध्ये धन्याच्या बियांचा वापर करायला हरकत नाही.

केसांचे आरोग्य चांगले राहण्याकरता धन्याचे बी कुटून घ्यावे व आपण जे तेल केसांकरता वापरतात त्यामध्ये ही पावडर मिक्स करून आपल्या केसांवर लावावे. तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात ब्लॅकहेड्स व मुरूम तयार होतात. याकरता धन्याची पावडर करून त्यामध्ये हळद व मध मिक्स करून त्याचा एक चांगला फेस पॅक तयार करावा व नियमित चेहऱ्याला लावल्याने ब्लॅक हेड्‍स मुरूम व पुटकुळ्या येण्याचे थांबते.

धने पाण्यामध्ये भिजवून त्याचे पाणी प्यायल्याने देखील पोटाच्या समस्या दूर होतात. आपण कोणत्याही प्रकारचा डायट प्लॅनचा अवलंब करत असला तरीदेखील आपण हे धन्याचे पाणी पिऊ शकतात. ज्यामुळे त्वचेसंबंधी आजार तसेच केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नक्कीच मदत मिळेल.

इतर गंभीर आजाराने आपण ग्रस्त असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा उपाय करू नये.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories