डोकं दुखतंय काय करु? घाबरु नका. डोकेदुखीवर हमखास घरगुती आणि आयुर्वेदीक उपाय.

- Advertisement -

डोकं दुखतंय? काही सुचत नाही? घाबरु नका. ह्या लेखातून डोकेदुखीवर घरच्या घरी ताबडतोब करता येण्यासारखे रामबाण उपाय आपण पाहणार आहोत.

डोकेदुखीवर घरगुती आणि सोप्पे उपाय

1. टेन्शन गायब करा:

3 4

आपल्याला सर्वात आधी ताणतणाव म्हणजेच टेन्शन कमी करण्याची गरज आहे. म्हणजे आपले मन आराम करेल. दीर्घ श्वास घेणे, ध्यान करणे आणि काही आनंदी मनासारख्या गोष्टी करणे मनाला आराम देते आणि त्यामुळे डोकेदुखी हळूहळू बरी होते.

2. अंधारी आणि शांत खोली:

4 4

जर ताणतणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीने हैराण असाल तर तुम्हाला प्रकाश व आवाज अधिक त्रासदायक वाटेल. डोळे मिटून शांत, अंधुक प्रकाश असलेल्या खोलीत आराम करा, मान, खांदे ह्यांना विश्रांती द्या. किंवा अंधाऱ्या खोलीत झोप घ्या.

3. मालिशः

5 4

मान आणि डोक्याची मालिश केल्याने रक्त प्रवाह सुधारेल आणि डोकेदुखी शांत होईल. लसणीच्या पाकळ्या तेलात टाकून ते तेल गरम करावे. कोमट झाल्यावर हलकेच डोक्याला आणि मानेला मालिश करावे.

- Advertisement -

4. हॉट/कोल्ड कॉम्प्रेस:

6 4

डोकेदुखी ने होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी मानेच्या आणि टाळूच्या भोवती एक हीटिंग पॅड लावा. ताण आल्याने डोकेदुखी होत असेल तर ती कमी करण्यासाठी कोल्ड पॅड देखील वापरू शकता

5 .गरम चहा किंवा कॉफी:

7 4

डोकेदुखी कमी करण्यासाठी गरमागरम चहा किंवा कॉफी घ्या. चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य मूड सुधारण्यास, जागरूकता वाढविण्यात आणि रक्तवाहिन्यांना आवर घालण्यास मदत करते. या सर्वांचा डोकेदुखीच्या लक्षणांवर चांगलाच परिणाम होतो. आणि डोकेदुखी थांबते. पूर्वीपासून आल्याचा चहा किंवा गवती चहा वापरून केलेला चहा डोकेदुखी होत असल्यास घेतात. पित्त झाल्यास चहा कॉफी टाळा.

डोकेदुखीवर आयुर्वेदिक उपाय

डोकेदुखीची अनेक कारणे आहेत परंतु आयुर्वेदानुसार बद्धकोष्ठता हे एक मुख्य कारण आहे. हे जाणून आश्चर्य वाटलं असेल.
आयुर्वेदानुसार आपण घरच्या घरी डोकेदुखीवर उपाय म्हणून दोन साध्या गोष्टी करू शकता.

एरंडेल तेल कोमट पाण्यात घालून प्या.

8 4

जर आपल्याला नेहमी बद्धकोष्ठता होत असेल तर 4 चमचे एरंडेल तेल गरम पाण्यात मिसळून प्या 1-2 वेळा संडासला ह्याने साफ होईल. आपल्या कोट्याप्रमाणे एरंडेल तेलाचे प्रमाण ठरवणे आवश्यक आहे. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा असे केल्याने बद्धकोष्ठता आणि डोकेदुखीसाठी जबाबदार असलेला अपान वायू कमी होतो.

- Advertisement -

पाण्यामध्ये सुंठ पावडर मिसळून दाट पेस्ट बनवा.

9 4

सुंठ म्हणजे कोरडे आले आहे आणि आजकाल सर्वसाधारण स्टोअरमध्येही उपलब्ध आहे. कपाळावर पेस्ट लावा आणि सुकल्यावर पाण्याने धुवा.

एक गोष्ट लक्षात ठेवा की की घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक उपचार या दोन भिन्न गोष्टी आहेत. आयुर्वेदात दृढ तत्व, संकल्पना आहेत आणि ते शास्त्र आहे.

तर डोकेदुखीची अनेक कारणे आहेत. डोकेदुखी दररोज होत असेल आणि घरगुती उपायांनी थांबत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. नंतर, डॉक्टर गरज असल्यास काही मेडिकल टेस्ट करून घेऊ शकतात. त्यानुसार औषध देऊ शकतात.

जर आपल्याला हा लेख माहितीपूर्ण वाटत असेल तर हि माहिती आपल्या प्रियजनांना शेयर करायला विसरू नका !

- Advertisement -

.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories