हळद आणि ओव्याचं हे पाणी काही मिनिटांत दूर करेल गॅस आणि ॲसिडिटी! असं बनवा.

हळद ओव्याचं हे पाणी काही मिनिटांत दूर करेल गॅस आणि ॲसिडिटी, कसं बनवायचं समजून घ्या. आजच्या खराब जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनाचे त्रास सर्वांनाच आहेत. अगदी आज सगळ्यांना असणारा त्रास म्हणजे ॲसिडिटी. अनेकदा तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने ॲसिडिटी होते. मात्र, ॲसिडिटीची इतरही अनेक कारणं आहेत.

जास्त वेळ उपाशी राहणे, अन्न नीट न चावता खाणे आणि धुम्रपान यामुळेही पोटात जळजळ आणि अस्वस्थता येते. कारण आपल्या पोटातील गॅस्ट्रिक ग्रंथी अन्न पचवण्यासाठी आम्ल सोडतात. पण पोटात ॲसिडचं प्रमाण जास्त असेल तर ते ॲसिडिटीची तक्रार करतं.

मित्रांनो, ॲसिडिटीमुळे आपल्याला पोटदुखी, पोट फुगणे, छातीत जळजळ आणि डोकेदुखी असे त्रास सुरु होऊ शकतात. अनेकदा लोक ॲसिडिटीला किरकोळ आजार समजून दुर्लक्ष करतात. पण, ॲसिडिटीची तक्रार बरेच दिवस येत राहिल्यास पोटाशी संबंधित अनेक गंभीर आजार जडू शकतात.

सामान्यतः लोक ॲसिडीटी झाल्यावर औषधं घेतात. पण काही घरगुती उपाय करूनही तुम्ही ॲसिडिटीच्या त्रासात आराम मिळवू शकता. पोटातील गॅस आणि ॲसिडिटीच्या त्रासावर हळद आणि ओव्याचा  वापर खूप फायदेशीर मानला जातो. जर तुम्ही ॲसिडिटीने त्रासून गेला असाल तर तुम्ही हळद आणि ओवा ह्यांचं पाणी बनवा आणि प्या. यामुळे तुम्हाला ॲसिडिटीपासून लवकर आराम मिळेल.

चला तर मग जाणून घेऊया ॲसिडिटी वर एक खात्रीशीर उपाय. हे करण्यासाठी तुम्ही हळद आणि ओव्याचं पाणी कसं बनवायच ते सुद्धा समजून सगळं.

हळद आणि ओव्याचं पाणी कसं बनवायचं?

  • हळद आणि ओव्याचं पाणी बनवण्यासाठी, एक चमचाभर ओवा एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी एका भांड्यात ओवा टाकून पाणी उकळवा.
  • आता त्यात थोडी कच्ची हळद घाला आणि पाणी गाळून थंड होऊ द्या.
  • जर तुमच्याकडे कच्ची हळद नसेल तर तुम्ही एक चमचा हळद वापरू शकता.
  • हे हळद आणि ओवा मिश्रित पाणी दररोज पिऊन बघा. पोटातील गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास हळूहळू कमी होईल.

हळद

आयुर्वेदात हळदीला औषधी गुणधर्मांचा खजिना असल्याचे म्हटलं आहे. यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात, जे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकायला मदत करतात. हळदीमध्ये असलेले गुणधर्म आतड्यांतील सूज, वेदना आणि पेटके कमी करतात.

याशिवाय हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे तत्व आहे जे पोटातील गॅस, अपचन आणि ॲसिडिटीने होणार त्रास कमी करायला मदत करते. हळद खाऊन शरीरातील चयापचय क्रिया गतिमान होते आणि अपचनाचे त्रास कमी होतात.

ओवा

पचनाच्या समस्यांमध्येही ओवा खाणं फायदेशीर मानलं जातं. पोटातील गॅस आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी  ओवा खाणं हा एक जुना घरगुती उपाय आहे. ओव्यामध्ये अँटासिड गुणधर्म असतात, जे ॲसिडिटीच्या त्रासापासून मुक्त होण्यास मदत करतात. याशिवाय अजवाइनमध्ये थायमॉल नावाचा घटक आढळतो, जो अपचन, पोटदुखी, पोट फुगणे आणि आंबट ढेकर यासारखे त्रास दूर करतो. ॲसिडिटी टाळण्यासाठी तुम्ही ओव्यामध्ये काळं मीठ मिसळूनही दररोज खाऊ शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories