10 Amazing Health Benefits Of Kantola In Marathi

Kantola In Marathi – तुम्ही बरीच हंगामी फळे आणि भाज्या खाल्ल्या असतील. आपल्या आरोग्यासाठी अशा भाज्या आणि फळे खाण्याचे अनेक फायदे असतात. आजच्या लेखात आपण माहिती घेणार आहोत ती आहे पावसाळयात येणारी ही हिरवीगार कारल्यासारखी दिसणारी विशिष्ट फळभाजी म्हणजे कंटोळी (Spine Gourd) ज्याला कंटोला किंवा कंकोर देखील म्हणतात. ही एक अतिशय पौष्टीक भाजी आहे आणि विविध प्रकारे खाता येऊ शकते.

भारतातील एक डॉक्टर रंगनायुकुळु पीएच.डी.आयुर्वेद. ह्यांनी असं म्हटलं आहे की, “प्राचीन भारतातील कृषी संस्थांनी फार आधीच ह्या हंगामी कंटोळी (Kantola) फळाचे असंख्य आरोग्य फायदे ओळखले आहेत.

आपण ह्या लेखात कंटोळी खाण्याचे फायदे जाणून घेऊया. (Health benefits of spiny gourd or Kantola.)

आणि कंटोळी (Kantola) भाजीची रेसिपी सुध्दा पाहूया. कंटोळी तळून घेऊ शकता, भाजी बनवू शकता आणि स्टार्टर किंवा
रायता /भरीत म्हणून खाऊ शकता.

कंटोळी खाण्याचे फायदे (Health Benefits Of Kantola In Marathi)

Kantola In Marathi

रक्तदाब (Blood Pressure): कंटोळीच्या ताज्या फळांचा रस घेतल्यास रक्तदाब नियमित होण्यास मदत होते. त्यामध्ये असलेले अँटी-लिपिड पेरोक्सिडेटिव्ह गुणधर्म धमनीच्या वॉल आणि त्यांना आतून बाहेरून बरं करायला मदत करते.

कंटोळी सर्दीचं संक्रमण रोखते: कंटोळी (Spine Gourd) कधी येतात तर पावसाळ्यात म्हणजेच माणसासाठी निसर्ग किती उपकारक आहे कारण सर्दी आणि इतर फुफ्फुसाच्या संसर्गाला पावसाळ्यात सुरुवात होते.कंटोळी खाऊन ह्या सामान्य विषाणूजन्य संक्रमणाला तुम्ही आळा घालू शकता. यात अँटी-ॲलर्जीक, अँटी-बॅक्टेरियल आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात.

आयुष्य वाढतं: शरीरातील फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरातील पेशींच्या वाढीला आणि पेशी टिकून राहण्यास अडथळा आणतात. कंटोळी मध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स ह्या फ्री रॅडिकल्सचा नाश करू शकतात. अशा प्रकारे कंटोळी खाऊन आपलं आयुष्यमान वाढतं. तसेच हे यकृताचे रक्षण करते आणि त्यामध्ये चरबी जमा होऊ देत नाही.

कंटोळी खा वजन कमी करा : कंटोळी कमी उष्मांक असलेली भाजी आहे आणि त्याचे सेवन वजन कमी करायला मदत करते. यामुळे शरीरात आर्द्रता चांगल्या प्रमाणात वाढते.

मुतखडा आणि किडनी : कंटोळी ही फळभाजी खात असाल तर मुतखडा (किडनी स्टोन) तयार होण्याची शक्यता कमी होते आणि कंटोळी खाल्ल्याने किडनी स्टोन निघून जाऊ शकतो. मुतखडा असलेल्या बऱ्याच लोकांनी ह्याचा अनुभव घेतला आहे.

तरुण दिसण्यासाठी : कंटोळी मध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात. यात बीटा कॅरोटीन, ल्युटीन, झेंथाइन्स इत्यादी असतात, जे त्वचा निरोगी आणि तुकतुकीत राहायला मदत करतात.

कंटोळी खा डोळ्याचे आरोग्य मिळवा: कंटोळी मध्ये व्हिटॅमिन ए असतं जे चांगल्या दृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आणि पोषक आहे. म्हणून, व्हिटॅमिन ए ने समृद्ध असलेली ही फळ भाजी डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत करते.

त्वचेची समस्या : त्वचेच्या अनेक समस्या आहेत, ज्याचा सामना एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर करावा लागतो. बरेचसे लोक सांगतात की कंटोळी च्या भाजलेल्या बिया हे इसब आणि त्वचेच्या इतर रोगांवर गुणकारी ठरतात.

पेप्टिक अल्सर (Peptic ulcers) : पेप्टिक अल्सर मध्ये पोटातील अस्तर, खालची अन्ननलिका आणि लहान आतडे ह्यात जळजळ होते. कुठलेही मसाले न घालता केलेली कंटोळीची भाजी किंवा कढी पेप्टिक अल्सर आणि मूळव्याध असलेल्यांसाठी उत्कृष्ट आहे.

बुध्दी तेजस्वी बनवा : कंटोळी या फळ भाजीमध्ये अनेक न्यूरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असतात जे मेंदूची कार्यक्षमत सुधारते. या व्यतिरिक्त, विसरण्याचा त्रास असलेल्या रूग्णांसाठी देखील हे चांगले ब्रेन टॉनिक आहे.

कंटोळी भाजीची रेसिपी (Kantola Recipe)

Kantola In Marathi

आता आपण बघूया आरोग्यासाठी एवढी फायदेशीर असलेली ही कंटोळी ची भाजी कशी बनवायची.

आपल्या भारतीय मसाल्यांसोबत केलेली अशी ही अत्यंत पौष्टिक भाजी आहे आणि जी आरोग्यासाठी अनेक फायदे देते. ही भाजी आणि उत्तम साइड डिश म्हणून खाता येते. ही भाजी गरम भातासोबत आणि भाकरी सोबत एकदम खमंग लागते.

चला तर मग कंटोळीची भाजी रेसीपी ला सुरुवात करु.

 • तयारीची वेळ 10 मिनिटे
 • शिजायला लागणारा वेळ 20 मिनिटे
 • 4 लोक खाऊ शकतात.

कंटोळीची भाजी रेसीपी ला लागणारे साहित्य

 • 600 ग्रॅम ताजी आणि कोवळी कंटोळी
 • 1½ टीस्पून हळद
 • 2 लवंगा
 • 4 लसूण पाकळ्या
 • 1 मध्यम कांदा
 • 1 मध्यम बटाटा हवा असेल तर
 • 1 लहान टोमॅटो पर्यायी
 • 2 टीस्पून मीठ चवीनुसार
 • 1½ टीस्पून मोहरी
 • 1½ टीस्पून धणे पावडर
 • 2 टेस्पून तेल

कंटोळीची भाजी कृती :

 • कंटोळी धुवून पुसून घ्या.
 • नीट सोलून घ्या. खराब भाग असेल तर काढा.
 • आडवी धरून गोलाकार चकत्यांसारखे काप करा. कापून हे बाजूला ठेवा.
 • बटाटा सोलून अर्धा इंच चौकोनी तुकडे करा.
 • कांदा, टोमॅटो आणि लसूण बारीक चिरून घ्या. आले बारीक किसून घ्या.
 • कढई गरम करून तेल घाला. तेल थोडे गरम झाल्यावर मोहरी घाला.
 • मोहरी फुटू लागल्यावर कांदे, आले आणि लसूण घाला.
 • कांदे आणि लसूण गोल्डन ब्राऊन झाल्यावर हळद, मीठ आणि धणे पूड घाला.
 • 1 मिनिट झाल्यावर आणि कापलेला बटाटा घाला. 5 मिनीट मिक्स करा.
 • आता चिरलेले कंटोळी काप आणि चिरलेला टोमॅटो घाला.
 • गॅस कमी / मध्यम वर आणा आणि झाकून ठेवा.
 • मधे मधे ढवळत राहा आणि 10-15 मिनीटे नीट मिक्स होऊ द्या आणि शिजू द्या.
 • जास्त प्रमाणात शिजवू नका कारण भाज्यांची चव आणि पौष्टिकता कमी होईल.

भाकरी किंवा भाताबरोबर बरोबर सर्व्ह करा आणि पौष्टीक कंटोळी च्या भाजीचा आस्वाद घ्या!

आम्हाला खात्री आहे कंटोळी खाण्याचे फायदे (Health Benefits Of Spiny Gourd Or Kantola In Marathi) आणि कंटोळी भाजीची रेसिपी (spiny gourd recipe) सांगणारा हा लेख तुम्हाला आवडला असेलच.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories