जर अन्नपचन व्यवस्थित होत नसेल तर आपल्यालाही होऊ शकतात पोटाचे हे गंभीर आजार !

माणसाला दैनंदिन कामे करण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते व ही ऊर्जा आपण जे अन्न खातो त्याच्या ऑक्सिडेशनमुळे आपल्याला मिळते व आपल्या अन्नातून काम करण्याकरता शक्ती आणि बळ प्राप्त होते. तोंडावाटे अन्नग्रहण केल्यानंतर आपल्या शरीरामधील पचनसंस्था खाल्लेले अन्न अन्ननलिकेतून लिव्हरमध्ये पोहोचते.

लिव्हरमध्ये पाचक रसायनात मिसळुन अन्नाचे विघटन होते. हे विघटन करणारे अनेक एन्झाइम्स लिव्हरमध्ये असतात.आपण खाल्लेल्या अन्नपदार्थांना बारीक बारीक तुकड्यांमध्ये विघटित करुन व त्यातून ऊर्जा निर्माण करण्याचे काम अविरत लिव्हरमध्ये चालु असते.

2 9

मात्र बरेचदा आपण खाल्लेले अन्नपदार्थ हे एन्झाइम्स व्यवस्थितरित्या अन्न पचवण्यासाठी असमर्थ होतात, त्यामुळे बऱ्याच लोकांना पोटामध्ये जास्त प्रमाणात गॅसेस होणे, पोटात आग पडणे व एसिडिटी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. आपण ग्रहण केलेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अपचनाची समस्या वाढते. आजकाल तर बऱ्याच लोकांना अपचनाचा त्रास कायम होताना पाहायला मिळतो.

मात्र याचे गंभीर परिणाम होवु शकतात हे आपल्याला माहित नसते. आज या लेखातुन आम्ही आपल्याला याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणुन घेवुुया अपचन होण्याची काय कारणे आहेत?

- Advertisement -

जास्त खाणे/ भुक नसताना खाणे

3 10

अनेक लोक बरेचदा भूक नसताना खाऊन घेतात तसेच प्रमाणापेक्षा जास्त अन्नपदार्थ केवळ फेवरेट म्हणुन खात राहतात. यामुळे पचायला जड असलेले व तळलेले-तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खाणे अन्नपचनाच्या वेगावर विपरीत परिणाम करतात. चुकीच्या पद्धतीने खाणे,विषम आहार करणे त्यामुळे देखील आपले पचन तंत्र बिघडते. आपल्या लिव्हरमध्ये उपस्थित असलेले एन्झाइम्स जर आपले काम व्यवस्थित करू शकले तर अपचनाची समस्या येत नाही.

मात्र हे काम व्यवस्थित होणे शक्य झाले नाही तर अपचनाची समस्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. ज्यामुळे व्यक्तीला खूपच पोटाच्या व्याधी व त्रासाला सामोरे जावे लागते. जर आपल्याला देखील कायम पोटात गॅसेस होणे, पोटामध्ये आग पडणे, एसिडिटी होणे यांसारख्या अपचन संबंधित समस्या कायमच होत असतील तर याबाबत आपल्याला गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. कारण आपले दुर्लक्ष भविष्यामध्ये गंभीर आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकते.

वारंवार अपचन होणारे गंभीर आजार व संभाव्य शरीरव्याधी

एलर्जी अथवा अर्थराइटिस ऑटोइम्युन डिसीजेस, त्वचारोग व इन्फेक्शन तसेच पुरळ, मूड डिसोर्डर आणि थकवा किंवा अशक्तपणा.

पोटाचे आजार होण्याची कारणे

4 11

आपली पचनइंद्रिय आपण जे अन्न जेवतो त्याला पचवण्याचे व विघटन करण्याची व ऑक्सिडेशनद्वारे ऊर्जा निर्माण करण्याचे काम करते. आपली पचनइंद्रिये ठरवतात की आपण कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांमधून कोणत्या प्रकारचे पोषक घटक शरीराकरता आवश्यक आहेत व ते किती प्रमाणात प्राप्त करायचे आहे? तसेच शरीरामध्ये निर्माण होणारे विषारी पदार्थ उत्सर्जित करायचे काम पचनसंस्था करत असते.

- Advertisement -

आपले निरोगी राहणे हे बरेचदा आपल्या पोटाच्या आरोग्यावर अवलंबून असते. कारण बरेचसे आजार हे पोटापासून म्हणजेच पचनसंस्थेमुळे निर्माण होतात. आपल्या शरीराचे अंतर्गत निरोगी राहणे हे योग्य पचन व अभि:शोषण आणि अन्नाचे योग्य प्रकारे विघटन होणे यावर अवलंबून असते.

आपल्या शरीराचा मेटॅबोलिझम चांगला ठेवणे व शरीरातील अनावश्यक बायप्रॉडक्ट असलेले विषारी पदार्थ यकृताद्वारे पित्ताशयामध्ये सोडले जातात. हे विषारी पदार्थ उलट प्रक्रिया करू लागले तर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बद्धकोष्ठतेमुळे विषारी पदार्थ शरीरामध्ये वाढु लागतात.

या कारणांमुळे अपचन होते

5 8

आपल्या शरीरात शेकडो बॅक्टेरिया असतात. गुड व बॅड बॅक्टेरियामधील गुड मानले गेलेले लैक्‍टोबासिलस अथवा बिफिडोबॅक्‍टेरिया हे बॅक्‍टीरिया कमी झाले तर आपले आरोग्य ढासळते. योग्य पचनक्रिया आणि निरोगी आरोग्य संतुलन ठेवण्याकरता बॅक्‍टेरियाचे योग्य संतुलन खुप गरजेचे असते.

पोटाचे आरोग्य बिघडण्याची ही आहेत काही कारणे

8 1

बरेचदा आपल्या रोजच्या जेवनामध्ये फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी असते. जास्त प्रमाणात साखरेचे गोड पदार्थ आपण खाणे पसंत करतो. योग्य पोषक घटकांची कमतरता आणि उच्च कॅलरीयुक्त आहार यामुळे आपल्या शरीरामध्ये बॅड बॅक्टेरिया जास्त वाढू लागतो व आतड्यांची तंत्र बिघडु लागते.

- Advertisement -

काही लोकांना रोजच काही ना काही औषधे व गोळ्या घ्याव्या लागतात. या औषधांमुळे पचनसंस्थेमध्ये बाधा निर्माण होते. अॅस्परिन आणि फिलोसेट अशा अनेक गोळ्या व औषधं होईल पचनतंत्र बिघडवतात तसेच शरीरामध्ये पारा आणि मोल्ड टॉक्सिनचा स्तर वाढल्याने देखील पचन तंत्र बिघडू शकते.

बरेचदा ताणतणावामुळे देखील आपल्या चेतासंस्थेमध्ये मोठे बदल होतात. ज्यामुळे आपले पचन तंत्र बिघडते व अन्न पचत नाही. पोटामध्ये बॅड बॅक्टेरियाचे संतुलन बिघडते व त्यामुळे पोट खराब होते. पचनसंस्थेमधील मुख्य घटक असलेल्या आपल्या पोटामध्ये बॅक्टेरियाच्या पाचशेपेक्षा जास्त प्रजाती आहेत.

9 1

हे बॅक्टेरिया आपण ग्रहण केलेले अन्नपदार्थ आपल्याला पचवण्यास मदत करतात. बॅक्टेरिया आपल्या शरीरांमध्ये होणाऱ्या हार्मोन्सला संतुलित ठेवतात तसेच शरीरामध्ये निर्माण होणारे धोकादायक विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम देखील बॅक्टेरियाच करतात. इतर हीलिंग तत्त्वांची निर्मिती देखील चांगल्या बॅक्टेरिया करतात. ज्यामुळे आपले पचनतंत्र सुधारते व शरीर निरोगी राहते. निरोगी आरोग्य हवे असेल तर पचनसंस्थेवर लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे.

आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आपला अभिप्राय नक्की कळवा. लेख मित्रपरिवारासोबत शेअर करा.धन्यवाद.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories