अपचन म्हणजे काय ? अपचन कारणे आणि उपाय !

नमस्कार मित्रांनो आज आपण तुम्हाला अपचन झालं किंवा पोटा संबंधित आजारावर कोणते कोणते घरगूती उपाययोजना आहेत, कोणता कोणता आहार घ्यावा या संबंधित सगळी माहिती आपणास आम्ही देणार आहोत.

सध्या धावपळीच्या जीवनात आपण काहीही खाऊन आपली भूक भागवतो, जसे की सकाळी उठून आपल्याला लवकर नोकरी असो किंवा एखादा व्यवसाय असो तिकडे आपल्याला जायला घाई असते त्यामुळे घाई घाईत कुठे चहा सोबत ब्रेड खा तर कुठे फक्त चहा पिऊन जाने.

नंतर ते सकाळच नाश्ता करून कामावर गेले की दुपारी कामातून जर वेळ भेटला तर ठीक नाहीतर जेवण सुद्धा आपले नीट होणार नाही त्यामुळे आपला आहार चांगला होत नाही. आपले दररोज चे वेळापत्रक ठरवले पाहिजे पण जर अचानक कोणत्याही वेळी काय खाल्ले तर आपली तब्बेत बिघडायला जास्त वेळ लागत नाही.

अपचन म्हणजे काय?

अपचन

आहाराचे टायमिंग जर आपण योग्य रीतीने केले तर आपल्याला कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही. तुम्हाला माहीतच आहे की जर आपण योग्य वेळी योग्य आहार जर घेतला नाही तर आपल्याला लगेच त्रास जाणवायला लागतो जसे की पोट गच्च होणे, मळमळणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, डोळ्यावर झोप येणे, चिडचिड होणे.

आत्ताच्या जीवनात आपण कुठेही कोणत्याही प्रकारचे अन्न खातो तसेच वेळच्या वेळी झोप घेत नाही, कामामुळे व्यायाम करायला सुद्धा टाईम भेटत नाही. तसेच आजकाल आपण वेळ नसल्यामुळे बाहेरच जास्त करून खातो ते म्हणजे फास्ट फुड.

त्या फास्ट फुड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे द्रव्य वापरले जातात, नंतर आपले रोजचे जे रुटिंग आहे ते बदलल्याने सुद्धा आपल्याला अपचन होते. आज आपण तुम्हाला अपचन का होते तसेच त्याची कारणे काय नंतर आपल्याला अपचन झाले तर काय करावे व ते जर आपल्याला कायमचे घालवायचे असेल तर त्या वर पर्याय काय हे सर्व सांगणार आहोत.

जाणून घ्या, अपचन होण्याची कारणे :

अपचन

आपल्या रोजच्या आहारात जर योग्य अन्न खात नसेल जसे की जर तुम्ही सकाळी सहा वाजता उठत असाल तर त्यावेळी तुम्ही एक तास गॅप देऊन नंतर नाश्ता केला पाहिजे, नाश्ता हा नेहमी हलका असावा, ज्यामध्ये जास्त करून फळांचा समावेश असावा नंतर ज्युस असावा.

दुधाचा समावेश असावा नंतर तुम्ही एक ते दोन अंडी सुद्धा घेऊ शकता. केली खाल्याने तुम्हाला चांगली ऊर्जा प्राप्त होईल पण त्याच ठिकाणी जर तुम्ही पोहे खाल्ले किंवा अजून कोणतेही तळलेले पदार्थ खाल्ले तर तुम्हाला अपचन होण्याचा त्रास होऊ शकतो.

नाश्ता झाला की तुम्ही लगेच जेवण तर करत नाही पण ज्यावेळी तुम्ही जेवण करणार आहे त्यावेळी तुम्ही जेवणातही जास्त मसाले तसेच तेल, चटणी, वापरू नका कारण याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो कारण आपल्या शरीरातील जी आतडी असतात ती खूप नाजूक प्रकारची असतात.

त्यामुळे त्यांना सुद्धा त्रास होतो आणि त्यांना त्रास झाला की तुमच्या पोटाला तर नक्कीच होणार त्यामुळे सुद्धा अपचन होऊ शकते. नंतर संध्याकाळी सुद्धा आपण ५ च्या वेळी काही तर खायच बघतो त्यावेळी सुद्धा जर तुम्ही सकाळी नाष्टाला जे खाल्ल आहे ते जर घेतल तर तुम्हाला त्रास होणार नाही.

रात्रीच्या वेळी सर्वात हलके अन्न खावे कारण रात्री जेवल्यानंतर झोपतो कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाही त्यामुळे रात्री जर तुम्ही जड अन्न घेतले तर तुम्हाला अन्न पचण्यास त्रास होऊ शकतो.

पचक्रीया सुधारण्यासाठी कोणते पदार्थ खावे आणि कोणते खाऊ नयेत:

अपचन

तुम्ही नाश्त्याला फळ, दूध अंडी खाऊ शकता तसेच जेवणात पालेभाज्या फळभाज्या खाऊ शकता. तसेच जर तुम्ही हळदीचे पदार्थ खाल्ले तर तुम्हाला अपचन होऊ शकते, अत्ता हळद तर प्रत्येक पदार्थामध्ये असते पण प्रमाणात असली की काही अडचण नाही तसेच जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाचे जर नियोजन म्हणजचे वेळापत्रक चांगल्या प्रकारे बनवले तर तुम्हाला कोणताही त्रास होऊ शकत नाही.

तसेच जास्त जड अन्न खाऊ नये जसे की मांसाहारी पदार्थ. मांसाहारी पदार्थ खायचे असले तर त्याला सुद्धा लिमिट असावे महिन्यातून एक ते दोन वेळा ठीक आहे. तसेच रोडवर किंवा हॉटेल मध्ये जे फास्ट फूड असते जसे की वडापाव, पाणीपुरी, समोसा नंतर चायनीज, पिझ्झा. आशा पदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण खूप असते तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची द्रव्य सुद्धा वापरलेली असतात त्यामुळे सुद्धा तुम्हाला अपचन होऊ शकते.

अपचन किंवा पोट जड आल्यास काय खावे (उपाय):

अपचन

दोन ग्लास पाणी घ्यावे व ते गॅसवर ठेवावे त्यामध्ये तुम्ही दोन चमचे जिरे टाका तसेच आपल्या घरी ज्या विलायची असतात त्याच्या वरची साल काढून टाका त्या फक्त दोनच असाव्या. ते मिश्रण बऱ्यापैकी गरम करावे आणि गरम झाल्यानंतर एका ग्लास मध्ये ते मिश्रण ओतून घ्यावे. त्या ग्लास मध्ये लिंबू पिळावे जास्त प्रमाणात नसून एक चमचा खूप झाला. ते पिल्याने तुम्हाला अपचन झाले असेल तर ते ठीक होईल.

तसेच जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पीत असाल तरीही तुम्हाला अपचन होणार नाही. नंतर तुम्ही रोज योगासने केली किंवा व्यायाम जर केला तरीही तुम्हाला अन्न पचवण्यास मदत होईल. तुम्ही जर योग्य वेळी योग्य आहार घेतला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाहीत कारण अपचन होणे हे खूप मोठी शरीराला होणारी हानी आहे कारण पोट साफ नसल्याने आपल्याला ९० टक्के आहार होतात.

नियमित व पुरेसे पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

त्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक सुद्धा केले पाहिजे. पोट साफ होत नसल्याने तुम्हाला आतड्यांचे आजार होऊ शकतात तसे जर तुम्ही आसड ओसाड अन्न घेतले तर तुम्हाला फूड पोयजन होऊ शकतो. काही लोकांचा मृत्यू फक्त अपचन होत असल्यामुळे झाला आहे कारण एकदा अन्न झालेले जर नीट पचत नसेल तर आतमध्ये वेगवेगळ्या क्रिया होतात आणि पोटामध्ये जे पार्ट असतात त्यांना त्रास होयला सुरू होतो.

अपचन

रात्री जेवण केल्यानंतर तुम्ही लगेच पाणी पिऊ नका कारण आपण जे अन्न खाल्लेले असते ते व्यवस्थित पचत नाही त्याची झीज होयला सुरुवात होते त्यामुळे सुद्धा अपचन होते आणि पोटाचे आजरी जडतात. जेवले की तुम्ही शतपावली सुद्धा करायला पाहिजे म्हणजे जे खाल्ले आहे ते जीरायला मदत सुद्धा होते. तुमची पचन क्रिया जर साफ असेल तर तुम्हाला कोणताही परिणाम होत नाही, आणि आसाड ओसाड अन्न खाऊ नये.

तुम्ही जर तुमचे जे दैनंदिन आहाराचे वेळापत्रक बनवले तर ते तुम्ही २१ दिवस जर पाळले तर तुम्हाला त्याची सवय भासेल आणि तुम्ही तिथून पुढे योग्य वेळी योग्य आहार घ्यायला अडचण येणार नाही.

तुम्ही तेलकट पदार्थ खाण्यावर तसेच जे बाहेरचे पदार्थ आहेत ज्यामध्ये जास्त केमिकल्स मिसळली असतात ते खाणे सुद्धा टाळले पाहिजेत. आणि रोज सकाळी तुम्ही एक तास जर आपल्या शरीराला दिला तो म्हणजे योगासने करणे, किंवा मॉर्निंग वॉक ला जने, जॉगिंग करणे हे रोज केले तरीही तुमच्या पोटात जे जड अन्न आहे ते नक्की पचण्यास मदत होईल.

संबंधित व्यायाम कोणता करावा:

अपचन

आपले आजकालचे जीवन हे धावपळीचे आहे त्यामुळं जास्त लोक फास्ट फूड खाण्यावर भर देतात आणि आपली प्रकृती बिघडून ठेवतात. या साठी आपणास व्यायाम करणे सुद्धा खूप गरजेचे आहे त्यासाठी सकाळी उठल्यावर कमीत कमी 2 किलोमीटर धावावे. त्या बरोबर योगासने सुद्धा करावीत आणि संतुलित आहार घ्यावा.

आम्हाला आशा आहे,की तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाइक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना आणि नातेवाइकांना शेयर करा. तसेच नेहमी आरोग्यदायी माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेज ला लाइक करा.

हे हि वाचा :

अशा प्रकारे घ्या आपल्या चेहऱ्याची काळजी कधीच होणार नाहीत पिंपल्स 

उन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी

10 Healthy Benefits Of Jeshthamadh In Marathi

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories