आलं घरोघरी असतच पण ते आपण पोटाच्या विकारांवर किंवा सर्दी खोकल्यावर औषध म्हणून वापरलं असेल पण केसांसाठी सुद्धा आलं उत्तम उपचार आहे आणि बरेच लोक वापरतात, आलं जे तुमच्या चहाची चव वाढवते, तुमचे केस मजबूत आणि चमकदार बनवू शकते. आपल्याला फक्त ते कसं वापरायचं हे माहित असणे आवश्यक आहे.
इतरांचे सुंदर आणि निरोगी केस पाहिल्यानंतर बहुतेकांना असं वाटतं की आपल्यासारखे केस का नाहीत. केसांची योग्य काळजी न घेतल्याने किंवा पुरेसे पोषक न मिळाल्याने असे घडते. जर तुम्हालाही तुमचे केस निरोगी ठेवायचे असतील तर केसांची काळजी घेण्यासाठी त्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, ज्यामुळे केसांचे पोषण तर होतेच पण त्या केमिकल फ्री देखील असतात.
असंच एक सुपरफूड म्हणजे आलं होय, आलं तुमचे केस मजबूत करायला मदत करू शकते. केसांसाठी आल्याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.
केसांच्या आरोग्यासाठी
रिसर्चगेटने आल्यावर केलेल्या संशोधनानुसार, आल्यामध्ये सिलिकॉन नावाचे सेंद्रिय संयुग organic compound आहे. वैज्ञानिक अभ्यासानुसार, सिलिकॉन केस निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.
केस गळत नाहीत
झिंक आणि मॅग्नेशियमसारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. आल्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात आणि शरीरातील हे दोन्ही पोषक तत्व आलं खाऊन भरून काढता येतात.
केसातला कोंडा कमी होतो
कोंडा दूर करण्यासाठी आल्याचा फायदेशीर प्रभाव दिसून येतो. आल्यामध्ये झिंक आढळते आणि झिंक युक्त शॅम्पू वापरून कोंड्याची समस्या दूर केली जाऊ शकते.
निरोगी केसांसाठी आलं कसं वापरायचं ते जाणून घ्या
केसांच्या वाढीसाठी आलं आणि कांदा
- साहित्य- आल्याचा रस २ टीस्पून, कांद्याचा रस १ टीस्पून
- वापरण्याची पद्धत
- एका भांड्यात आले आणि कांद्याचा रस टाका.
- नंतर केसांच्या मुळांना लावून हलक्या हातांनी मसाज करा.
- 10-15 मिनिटांनी केस पाण्याने धुवा.
आलं आणि खोबरेल तेल मास्क
साहित्य: केसांच्या वाढीनुसार आल्याचे छोटे तुकडे, आवश्यकतेनुसार खोबरेल तेल
असं वापरा
- आल्याची पेस्ट तयार करा.
- नंतर या पेस्टमध्ये खोबरेल तेल मिसळा.
- आता ही पेस्ट केसांमध्ये लावल्यानंतर 5-10 मिनिटे राहू द्या, केस शॅम्पूने धुवा.
आलं आणि लेमन ऑईल केस मास्क
साहित्य – एक टेबलस्पून आल्याचा रस, एक टीस्पून लेमन ऑईल
वापरण्याची पद्धत
- एका भांड्यात आल्याचा रस आणि लेमन ऑईल टाका.
- आता हे मिश्रण केसांच्या मुळापर्यंत लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.
- हे मिश्रण 5 ते 10 मिनिटे ठेवल्यानंतर केस शॅम्पूने धुवा.