आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पायाच्या तळव्याला मालिश हा सर्वोत्तम उपाय केल्याने हे फायदे होतात.

पायाच्या तळव्याला मसाज करणे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. तळव्यांना मसाज करण्यासाठी पद्धत कोणती, तेल कोणतं हे समजून घ्या. पायाच्या तळव्याला मसाज केल्याने हे फायदे होतात, जाणून घ्या आयुर्वेदानुसार कोणत्या तेलाने तळव्यांना मालिश करावी.

मित्रांनो, आपण सर्वजण हेड मसाज बऱ्याचदा करतो, पण तुम्हाला माहित आहे का की पायाच्या तळव्याला मसाज केल्याने देखील अनेक फायदे होतात. तुमचा दिवसभराचा थकवा, निद्रानाश, ताणतणाव या समस्यांवर मात करण्यासाठी पायांच्या तळव्यांना मसाज करणे खूप फायदेशीर आहे.

तळवे मसाज केल्याने शारीरिक आणि मानसिक आराम मिळतो. इतकंच नाही तर शांत झोप लागते, एवढेच नाही तर तळव्यांची मालिश केल्याने अनेक आजार दूर होतात. पायांच्या तळव्याला मसाज करण्याचे फायदे जाणून घेऊया.

पायाच्या तळव्याला मालिश करण्याचे फायदे

पायाच्या तळव्याला मसाज केल्याने शारीरिक आणि मानसिक फायदा होतो. यामुळे तणाव कमी होतो, तसेच झोप सुधारते. तळवे मसाज केल्याने सांधेदुखीत आराम मिळतो. एवढेच नाही तर पायाच्या तळव्याला मसाज केल्याने त्वचाही सुधारते. जाणून घ्या तळव्यांची मालिश करण्याचे फायदे

निद्रानाश जाऊन झोप लागते

दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री झोप लागणे कठीण होते. झोप न लागण्याच्या समस्येला निद्रानाश म्हणतात. जर तुम्हालाही निद्रानाशाचा त्रास होत असेल तर रोज रात्री झोपताना तळव्यांची मालिश करा. यामुळे तुमचा थकवा दूर होईल, तणाव कमी होईल आणि खूप चांगली झोप मिळेल. पायाच्या तळव्याला मसाज केल्याने शरीराला आराम मिळतो, मन शांत होतं.

तणाव आणि चिंता होईल गायब

आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने तणाव किंवा चिंतेखाली असतो. दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने नैराश्य येऊ शकते. अशा परिस्थितीत, तणाव कमी करण्यासाठी तुम्ही पायाच्या तळव्याची मालिश करू शकता. तळवे मसाज केल्याने तणाव कमी होतो, मानसिक शांती मिळते. तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी, रात्री पायांच्या तळव्याची मालिश करा.

सांधेदुखीत आराम

पायाच्या तळव्याला मसाज केल्याने आपल्याला मानसिक तसेच शारीरिक फायदा होतो. होय, रोज रात्री झोपताना तळव्यांना मसाज केल्याने सांधेदुखीत आराम मिळतो. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते, मज्जातंतूंना आराम मिळतो आणि सांधेदुखी कमी होते.

रक्ताभिसरण वाढतं

आयुर्वेदात रक्ताभिसरण वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शरीराला मसाज करणे. आपण सर्वजण डोके, हात आणि पाय मालिश करतो, परंतु तळवे विसरतो. तळवे मसाज करताना संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी पायाच्या तळव्याची मालिश करणे आवश्यक आहे.

मासिक पाळीतील थकवा घालवा

प्रत्येकाने पायाच्या तळव्याची मालिश करावी. परंतु स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदनांमध्ये तळवे मसाज केल्याने आराम मिळतो. याव्यतिरिक्त, यामुळे तणाव आणि थकवा देखील कमी होतो. महिलांनी त्यांच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तळव्यांची मालिश नक्कीच करावी.

तळव्यांच्या मालिशसाठी कोणतं तेल वापरायचं

तीळ तेल उत्तम. पायाच्या तळव्याला मसाज करण्यासाठी योग्य तेल निवडणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. आयुर्वेदात तिळाच्या तेलाला महत्त्व आहे. तिळाच्या तेलाने शरीराला मसाज केल्याने अनेक समस्या दूर होतात.

पण पायांच्या तळव्याला मसाज करण्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर आहे. तळव्यांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने अनेक त्रास कमी होतात. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही रात्री झोपताना तुमच्या तळव्यांना तुपाने मसाज करू शकता.

तळवे कसे मालिश करावे

  • तळव्यांना मसाज करण्यासाठी सर्वप्रथम कोमट पाण्याने पाय, तळवे चांगले धुवावेत.
  • आता कापड किंवा टॉवेलने पाय आणि तळवे पूर्णपणे पुसून घ्या.
  • यानंतर, तेल हलके गरम करा, दोन्ही पायांच्या तळव्यावर लावा.
  • आता तळव्यांना हाताने मसाज करा. तुम्ही कांस्य धातूच्या वाटीने मसाज करु शकता.
  • त्वचा हळूहळू तेल शोषून घेईपर्यंत पाय जमिनीवर ठेवू नका.

तुमचा शरीर स्वभाव लक्षात घेऊन तेलाची निवड करावी. तळव्यांना मसाज करण्यासाठी तेल निवडण्यापूर्वी एकदा आयुर्वेदाचार्यांचं मत अवश्य घ्या.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories