पीसीओएस चा त्रास असताना वजन कमी करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा.

जर तुम्हाला पीसीओएस चा त्रास असेल तर वजन वाढणार हे नक्की. पण काळजी करु नका. ह्या लेखात तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. चला वाचूया. 

पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम, ज्याला पीसीओएस देखील म्हणतात, हा एक हार्मोनल विकार आहे. हा एक असा आजार आहे, ज्यामुळे महिलांना प्रजननक्षमतेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, पीसीओएस मुळे केवळ गर्भधारणाच कठीण होत नाही, तर त्यामुळे महिलांचं वजनही वाढतं.

खरं तर, पीसीओएस असलेल्या अनेक महिलांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता देखील असते, ज्यामुळे शरीराला रक्तातील ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर करण्यात अडचणी येतात. त्यामुळे महिलांचं वजन वाढू लागतं. त्यामुळे पीसीओएस ग्रस्त महिलांनी त्यांचे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. जर त्यांचे वजन जास्त असेल तर त्यांना गर्भधारणेसह इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

मात्र, अशा महिलांना वजन कमी करण्यातही त्रास होतो. तर आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे पीसीओएस महिलांचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

प्रोटीन्स घेण्याकडे लक्ष द्या

जर पीसीओएस ग्रस्त महिलांना वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात प्रोटीनचं प्रमाण थोडे वाढवणे फार महत्वाचे आहे. प्रथिने केवळ तुम्हाला भरभरून आरोग्य देतात आणि बराच काळ एनर्जेटिक ठेवतात. उलट रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यासही मदत होते. यामुळे कॅलरी बर्न करण्यात आणि भूक लागणाऱ्या हार्मोन्सवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि वजन कमी होतं.

फायबर घेताय ना 

प्रोटीन्स घेण्यासोबतच फायबरकडे पुरेसे लक्ष देणे देखील खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही तुमचे फायबरचे सेवन वाढवता तेव्हा तुम्ही जास्त काळ पोट भरलेले अनुभवू शकता. शिवाय, जेव्हा तुम्ही हाय-फायबर कॉम्प्लेक्स कार्ब्स वापरता तेव्हा ते तुमच्या रक्तातील साखर वाढवत नाहीत. त्यामुळे वजन कमी होतं.

आहारात हवेत हेल्दी फॅट्स 

जर तुम्ही तुमच्या आहारात हेल्दी फॅट्सचा समावेश करत असाल तर ते पीसीओएस ची लक्षणं कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यात मदत करते. जेव्हा तुम्ही हेल्दी फॅट्स खाता, तेव्हा जेवणानंतर तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं.  यामुळे जास्त भूक लागत नाही आणि तुम्ही कमी कॅलरी वापरता. त्यामुळे वजन कमी होणं सोपं होतं. तुम्ही तुमच्या आहारात ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल किंवा एवोकॅडो यांचा समावेश केला पाहिजे.

पॅक केलेल्या वस्तूंना नाही म्हणा

पीसीओएस ग्रस्त महिलांनी पॅक केलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा साखरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे. यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार होऊ शकतो आणि वजन कमी होण्याऐवजी वजन वाढू शकते.

व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका

वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम हे दोन अतिशय प्रभावी मार्ग आहेत. जर तुम्ही पीसीओएस मुळे त्रस्त असाल आणि व्यायामाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनवत असाल तर ते केवळ अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास मदत करत नाही. याशिवाय, ते त्यांची इन्सुलिन संवेदनशीलता देखील सुधारते. ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते.

त्यामुळे आता तुम्हीही या गोष्टींची काळजी घ्या आणि हेल्दी पद्धतीने वजन कमी करून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories