हिंग आणि दुधाची जोडी खूप खास आहे. पोटापासून ते लिव्हर पर्यंत अशाप्रकारे घेऊ शकता.

जेवणात जर चिमूटभर हिंग असेल तर जेवणाची चव वाढते. हिंगाची तिखट आणि कडवट चव जेवणाचा जेवणाची चव वाढवतेच पण जेवण पाचक बनवते. हिंग आपल्या तब्येतीसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. आपल्याकडे मसाल्याच्या पदार्थात घरोघरी हिंग आढळतोच. हिंग पोटासाठी अमृतासमान आहे आपल्याला तो अनेक प्रकारे उपयोगी पडतो. अगदी पोट श्वास गळा यासारखे आजार हिंगाच्या औषधाने बरे होतात.

एवढेच नाही तर हींग मासिक पाळीचा त्रास दूर करण्यात गुणकारी ठरतो. संशोधनानुसार हिंग तुमचं कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रण ठेवतो. एवढ्या सगळ्या हिंगाच्या औषधी गुणधर्मांमुळे की काय आपल्या पूर्वजांनी हिंगाचा वापर रोजच्या जेवणात सुरू ठेवला.

पण तुम्ही हिंगाचा वापर कधी दुधासोबत केला आहे का? पण अगदी जुन्या वैद्यांनी सांगितल्या प्रमाणे केल्याप्रमाणे हिंग आणि दुधाचा वापर बऱ्याच आजारावर औषध म्हणून केला जातो याची आपण आजच्या लेखात माहिती घेऊ.

हिंग आणि दुधाने होणारे फायदे

पचन सुधारेल

3 47

पिंगा आणि दूध एकत्र घेतल्याने बिघडलेलं पचन पूर्ववत होतं. रात्री झोपताना वाटेवर दुधात चिमूटभर हिंग टाकून प्यायल्याने पोटाच्या तक्रारी दूर होतात. जर पोटाचा त्रास खूपच वाढला असेल तर दिवसातून दोन वेळा सुद्धा तुम्ही आणि दूध एकत्र औषध म्हणून घेऊ शकता.

कानदुखीवर औषध

4 45

जर कान दुखून हैराण झाला असाल तर हींग आणि दुध हे गुणकारी औषध आहे. यासाठी बकरीच्या दुधात चिमूटभर हिंग घालून ते दूध काना मध्ये सोडा. सकाळी कान कापसाच्या मदतीने स्वच्छ करा. कान दुखी बरी होऊन वेदना कमी होतात आणि इन्फेक्शन देखील होत नाही.

उचकी वर रामबाण इलाज

5 45
  • उचकी आली की थांबता थांबत नाही जर तुम्ही आणि दूध तर प्याल तर उचकी लगेच थांबते.
  • जर उचकी थांबत नसेल तर हा उपाय करून बघायला हरकत नाही.
  • बद्धकोष्ठता कमी होते
  • बद्धकोष्ठता म्हणजे संडासला साफ न होणे. तर हिंग आणि दूध हा उपाय सकाळी करून बघा. हिंग पाचक असल्याने तो दुधासोबत एकत्र आला की मलाला पुढे ढकलतो यामुळे संडासला साफ होते.
  • त्याचप्रमाणे पोटाला सूज आली असल्यास हा उपाय करून बघू शकता आराम मिळेल.

हिंग आणि दुधाचे इतर फायदे

6 38
  • आतड्यामध्ये आलेला कोरडेपणा दूर करण्यासाठी हा चांगला उपाय आहे.
  • मूळव्याधीचा त्रास असेल तर देखील हा उपाय सुचवला जातो.
  • लिव्हर चे काम सुरळीत सुरू ठेवण्यासाठी हिंग आणि दुधाचा वापर केला जातो.
  • एवढेच नाही हिंग आणि दुधाचं सेवन आपल्याला ॲक्टिव्ह राहायला मदत करेल.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories