सकाळी रिकाम्या पोटी अंजिराचं पाणी प्यायल्यामुळे शरीराला मिळतात भरपूर फायदे.

Advertisements

सकाळी उठल्यावर अंजिराचं पाणी प्याल तर ते आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदे देऊन जाईल. अंजिराचे पाणी प्यायल्यामुळे त्वचा आणि हाडांचं आरोग्य चांगलं राहतं. आपल्याला सकाळी उठल्यावर नेमकं काय खावं? आणि कशापद्धतीने दिवसाची सुरुवात करावी? जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील याविषयी आपण सतत शोध घेत असतो पण तुम्ही फक्त अंजीराचं पाणी सकाळी प्यायल्यास तुम्हाला बरेच फायदे होतात कारण हे विटामिन्स आणि मिनरल्सचे चांगले स्रोत आहेत.

अंजिराचं पाणी सकाळी प्यायल्यामुळे तुमचं पचन चांगलं होतं आणि तुमचं पोट ठीक राहतं. हे पाणी प्यायल्यामुळे तुमचं अपचन, गॅस, ॲसिडिटी असे त्रास दूर राहतील. यामुळे तुमचे वजन योग्य राहतं.

तसेच तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं आणि हाडं बळकट राहतात. अंजीर नियमित खाल्ल्यास हृदय रोगामध्ये सुद्धा फायदेशीर आहे. तुम्ही अंजिराचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी घेऊ शकता किंवा सुके अंजीर सुद्धा खाऊ शकता. पण अंजीर फळ खाण्यापेक्षा अंजिराचे पाणी पिणे जास्त फायदेशीर असल्याचे डॉक्टर सांगतात. 

यामुळे तुम्हाला डीहायड्रेशनचा त्रास सुद्धा होत नाही. अंजिरामध्ये विद्राव्य फायबर असते आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट मानली जाते. अंजिराचे पाणी प्यायला तर त्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हीटामिन अँटीऑक्सीडेंट असे घटक सहज आपल्याला मिळतात. हे सगळे घटक आपल्याला आतून बळकट बनवत जातात.

अंजिराचे पाणी पिण्याचे फायदे

वजन नियंत्रित करण्यासाठी

3 50

अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतात जे पचन सुयोग्य ठेवतात. जे तुमचं पचन चांगलं राहतं तेव्हा तुमचं वजन नियंत्रित व्हायला मदत होते. अशक्त असाल तर वजन वाढून नियंत्रित राहतं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही डायट प्लान घेत असाल तर त्यात अंजीर आवश्यक आहेत कारण त्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि तुमची भूक तुमच्या ताब्यात राहते.

Advertisements

हाडं बळकट ठेवण्यासाठी

4 48

अंजिराचा पाळी पाहिल्यास त्यामध्ये मॅग्नेशिअम कॅल्शिअम फॉस्फरस असे पोषक घटक असतात. हाडांच्या मजबुतीसाठी हेस्तर घटक आवश्यक असतात. तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही नियमित अंजिराचे पाणी पिऊन त्रास कमी होईल. ऑस्टियोपोरोसिस एवढा त्रास सुद्धा कमी होईल आणि दात सुंदर व बळकट होतील.

हाय ब्लड प्रेशर मध्ये उपयुक्त

5 48

हाय ब्लड प्रेशर मध्ये तुम्हाला अनेक त्रास होतात. हाय ब्लड प्रेशरमुळे तुम्हाला हार्ट स्ट्रोकचा धोका असतो. शरीरामध्ये सोडियम कमी झाल्याने हा त्रास सुरू होतो. अंजिराचे पाळी नियमित पाहिल्याने हाय ब्लड प्रेशर कमी होतो कारण या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम फॉस्फरस असे घटक असतात. अंजिरा सोबतच तुम्हाला हिरव्या पाले भाज्या खायला हव्यात.

अँटीऑक्सीडेंट भरपूर असतात

6 41

अँटीऑक्सीडेंट आपल्या शरीरासाठी खूप खूप महत्त्वाचे असतात. अंजीरच्या पाण्यात पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास आणि फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. उतींसाठे आणि त्वचेसाठी एंटीऑक्सीडेंट महत्त्वाचे असतात.

तुमचे पचन चांगले राहते

7 38

निरोगी राहण्यासाठी सर्वात आधी तुमचं पचन चांगले असणे आवश्यक आहे. अंजिराचं पाणी प्यायल्याने त्यामधील विद्राव्य फायबर आपल्या आतड्यांसाठी आवश्यक असतं. आतडीच्या आरोग्याचा थेट संबंध तुमच्या चांगल्या पचनाशी असतो.

अंजिराचं पाणी कसं प्यावं?

8 20

अंजीराचे पाणी पिण्यासाठी २-३ अंजीर रात्रभर भिजवावे. सकाळी उठल्यावर अंजिराच्या पाण्यात मध मिसळून प्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही उरलेले अंजीरही वापरू शकता. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी अंजिराचे पाणी तुम्ही वापरू शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories