थायरॉईड आहे तर वजन कमी करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपलं नुकसान करुन घेऊ नका.

Advertisements

थायरॉईडच्या रुग्णांनी वजन कमी करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपलं नुकसान करुन घेऊ नका.थायरॉईड असलेल्या रुग्णाचे वजन झपाट्याने वाढते.  भारतात सुमारे 42 दशलक्ष लोक थायरॉईडचे बळी आहेत. थायरॉईडच्या आजारामध्ये रुग्णाच्या शरीरात थायरॉईड हार्मोनची पातळी कमी होते, ज्यामुळे शरीर कॅलरी बर्न करू शकत नाही. त्यामुळे रुग्णांच्या शरीरातील चरबी वाढते.

थायरॉईडचे रुग्ण वेगाने वजन कमी करण्यासाठी विविध डायट प्लॅन आणि जिम करतात. पण अनेकदा घाईगडबडीत असे रुग्ण एवढा प्रयत्न करतात की त्यामुळे त्यांच्या शरीराला इजा होऊ लागते.

जर तुम्हीही थायरॉईडच्या त्रासाचे बळी असाल आणि वजन कमी करणार असाल तर त्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.

थायरॉईड रुग्णांसाठी वजन कमी करण्याच्या टिप्स

थायरॉईड रुग्णांनी वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्हींचा समतोल राखला पाहिजे. आहारात कपात करून, आपण वजन कमी करण्यात यशस्वी होऊ शकता, परंतु यामुळे आपल्याला अनेक त्रास होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांनी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय स्वत:हून कोणतही पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला जातो. असं केल्याने तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता आणि तुम्हाला इतर अनेक आजार होऊ शकतात.

थायरॉईड रुग्णांनी वजन कमी करताना ह्या चुका नका करू

थायरॉईड रुग्णांनी वजन कमी करताना उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाणे टाळावे. अशा पदार्थांमुळे शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि चरबी वाढते. रुग्णांनी व्हाईट ब्रेड, मैद्याचे पदार्थ आणि केक इत्यादीं खाणे सेवन टाळा.

Advertisements

वजन कमी करताना, आहारातून जास्त फायबर आणि पुरेशा प्रमाणात प्रोटीन असलेले पदार्थ खायचे कमी करू नका. फायबर आणि प्रोटीन्सयुक्त पदार्थ आहारातून काढून टाकल्याने तुम्हाला अनेक त्रास सुरु होऊ शकतात.

थायरॉईडच्या रुग्णांनी वजन कमी करताना गोइट्रोजनयुक्त पदार्थांचे सेवन थांबवू नये. असं केल्याने शरीरातील आयोडीनचा वापर कमी होतो.

थायरॉईडचा त्रास असलेल्या रुग्णांनी शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नये. भरपूर पाणी प्या आणि पातळ पेय प्या.

वजन कमी करताना रुग्णांनी जास्त ताण घेऊ नये आणि पुरेशी झोप घ्यावी. जास्त ताण घेतल्याने रुग्णांच्या त्रास वाढू शकतात.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, वजन कमी करताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डायट आणि जिम सुरू करू नये. वजन कमी करण्यासाठी पौष्टीक आहारासोबतच व्यायाम आणि कसरतही करावी. निरोगी जीवनशैली आणि पौष्टिक आहार घेतल्यास तुम्हाला थायरॉईड असताना वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.

Advertisements

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories