हिवाळ्यात त्वचा आणि पचनासाठी फायदेशीर आहे मेथी,जाणून घ्या इतर महत्वाचे फायदे.

मेथी म्हटल्यावर तुमच्या समोर येते ती म्हणजे मेथीची भाजी. मेथीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत तसेच अनेक ठिकाणी घरगूती उपचारादरम्यान मेथी चा उपयोग केला जातो. तसेच मेथीच्या बियाणांचा उपयोग सुद्धा अनेक औषधांमध्ये सुद्धा केला जातो. मेथी ही आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.

अनेक वेगवेगळ्या सौंदर्य प्रसादनामध्ये मेथी बियांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मेथी मध्ये लोह, मॅंगनीज, आणि मॅग्नेशियम चे प्रमाण जास्त असते. तसेच थंडीच्या वेळी मेथीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो,कारण मेथीचा प्रभाव हा उष्ण असल्याने त्याचा उपयोग थंडीच्या दिवसात केला जातो.

त्वचेसाठी आणि पचनावर मेथीचे आरोग्यदायी फायदे.

3 67

मेथी ही एक प्रकारची औषधी वनस्पती आहे. त्यामुळे मेथीचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. मेथीचा वापर मासाल्यांमध्ये सुद्धा केला जातो सोबत वेगवेगळी सौंदर्य प्रसादने बनवण्यासाठी मेथी दाण्याचा वापर केला जातो. औषधी वनस्पती असल्यामुळे बाजारात सुद्धा चांगली मागणी आहे. 

मेथीचा उपयोग त्वचेच्या उपचारात मोठ्या प्रमाणात केला जातो. वेगवेगळी सौंदर्य प्रसादने,साबण, शैम्पू बनवण्यासाठी मेथीचा वापर मोठया प्रमाणात केला जातो. तसेच मेथी मध्ये शरीरास उपयुक्त असणारे अनेक पोषक घटक असतात. 

मेथीच्या एका चमच्या मध्ये 6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 3 ग्रॅम फायबर, 3 ग्रॅम प्रोटीन आणि 1 ग्रॅम फॅट एवढी पोषक तत्वे सापडतात सोबतच लोह, मॅंगनीज, मॅग्नेशियम इत्यादी घटक सुद्धा मेथीमध्ये आढळतात. मेथीचा प्रभाव उष्ण असल्याने हिवाळ्यात आणि थंडीच्या वेळी मेथीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

मेथी चे फायदे:

1) मधुमेहासाठी फायदेशीर

4 65

जर का टाइप 1 मधुमेहाच्या रुग्णाने सलग 10 दिवस 50 ग्राम मेथीचे सेवन केल्यामुळे त्यांच्या शरीरातील आणि रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वेगाने कमी होते. हा मेथीचा फरक आपल्याला 4 तासानंतर जाणवायला लागतो.

2) पचनासाठी उपयुक्त

5 65

मेथीमध्ये भरपूर फायबर चे प्रमाण असते. याशिवाय यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट तत्व सुद्धा असतात, जे बद्धकोष्ठता किंवा पचनाशी संबंधित समस्या दूर करू शकतात. ज्या लोकांना पचनासंबंधीत काही त्रास असेल तर त्यांनी मेथ्याच्या दाण्याचे सेवन करणे फायदेशीर आहे.

3) त्वचेसाठी मेथी फायदेशीर

6 57

आपल्या चेहऱ्यावरील त्वचा मुलायम बनवण्यासाठी मेथीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्वचेसाठी मेथीचा वापर खूप दिवसांपासून केला जातो. मेथीमुळे त्वचेवरील आणि चेहऱ्यावर असलेले डाग नाहीसे होतात आणि त्वचेला चमक आणि ग्लो येतो. मेथीची भाजी खाल्ल्याने पिंपल्सच्या समस्येवर मात करता येते. त्यामुळे मेथीचे सेवन महत्वाचे आहे.

4) टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवते

7 51

मेथी चे सेवन केल्यामुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते.एका अहवालानुसार चार आठवडे दररोज 500 मिलीग्राम मेथी खाल्ल्याने शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी अनेक पटींनी वाढते.त्यामुळे मेथीचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

5) दाट केस

8 28

मेथी केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. मेथी ची पाने केसांसाठी वापरली जातात. मेथीची पाने बारीक करून केसांना लावल्याने केस काळे, दाट,चमकदार होण्यास मदत होते.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories