रुईच्या झाडाला आयुष्यावर्धक म्हटलं आहे याचं कारण तो आहे ह्या आजारांवर गुणकारी.

रस्त्याच्या कडेला दिसणार्‍या रुईच्या पानांचा वापर हा एक जुना घरगुती उपाय आहे. आपल्या घराघरात पन्नाशी नंतर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या असतात. हाडं कमकुवत झाली आणि सांधेदुखीपासून ते रक्तदाब आणि साखरेशी संबंधित समस्यांपर्यंत त्यांना प्रत्येक आजाराशी लढावं लागतं. मग या सगळ्या त्रासांवर फक्त एकच तेल तुम्हाला मदत करू शकेल. ते म्हणजे रुईचं तेल/ अर्क तेल.

रुईच्या झाडाला मदार वृक्ष असही म्हणतात आणि त्याचे बहुतेक भाग – पाने, फुले, मुळे आणि बिया – हर्बल किंवा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जातात. रुईच्या झाडाला स्पर्श केला तरी औषधी वनस्पती असल्याने तुम्हाला फायदा होईल. आयुर्वेदाने केवढी खात्री दिली आहे ह्या रुईच्या उपायांबद्दल.

रुईच्या पानांचं तेल एक अद्भुत औषध असून या आजारांवर नामी उपाय आहे

डायबिटीसमध्ये इन्सुलिनची पातळी योग्य ठेवेल

3 68

डायबिटिस वर औषधं घेताय तर हा उपाय करा. रुईची पाने हायपोग्लाइसेमिक आहेत, जी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनची पातळी योग्य राखायला मदत करतात.

या पानांचा डायबिटीसवर उपचार करण्यासाठी हर्बल औषध म्हणून वापर केला जाऊ शकतो. घरगुती उपाय म्हणून रुईची दोन पाने पायांच्या टोकाला लावून त्यावर मोजे घाला. हे दिवसभर करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शुगर टेस्ट करा; दाव्यानुसार साखरेची पातळी खाली येईल.

सांधेदुखीतून बरे व्हाल

4 66

रुईच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे सांध्यातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. या गुणामुळे सांधेदुखी किंवा गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हे तेल औषधी आहे.

हे तेल संधिवाताच्या वेदनांसाठी वापरले जाऊ शकते. कोविडमुळे स्नायू किंवा सांधेदुखीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा एक उत्तम घरगुती उपाय असू शकतो. दुखत असलेल्या भागावर थोडसं तेल लावा, आंब्याच्या वाळलेल्या पानांनी झाकून पट्टीने गुंडाळा. 5-6 दिवस हा उपाय केल्याने अंतर्गत आणि बाह्य दोन्ही सूज कमी होऊ शकतात.

कीटक चावला तर

5 66

तुम्ही कुठे अडचणीच्या जागी जात असाल आणि तुम्हाला कोणता कीटक चावला असेल तर तुम्हाला फक्त रुईचं पान शोधावं लागेल. रुईच्या पानांमध्ये anti-inflammatory म्हणजेच सूज कमी करणाऱ्या औषधी गुणधर्मांसोबतच त्यात विष-विरोधी गुण असतो. रुईच्या पानांची पेस्ट चावलेल्या जागेवर लावल्याने जखम बरी होते. रुई किंवा अर्क पूर्वीपासून एक चांगला उपाय आहे याकरता तुम्ही वैद्यांची मदत घेऊ शकता.

गॅस झाल्यावर आगळावेगळा उपाय

6 58

पोटाच्या समस्या जसे की बद्धकोष्ठता, गॅस, सूज येणे आणि पचनाच्या त्रासांवर रुईच्या फुलं किंवा बियां वैद्यांच्या सल्ल्याने घेऊ शकता. ही फुलं चांगली रेचक म्हणून काम करतात आणि सहज पचन वाढवतात.

श्‍वसनाच्या आजारात मदत होते

7 52

रुईची फुले किंवा मूळ उन्हात वाळवून पावडरमध्ये सेवन करणे हा श्वसनाच्या आजारांवर एक उत्कृष्ट उपचार आहे. अस्सल घरगुती उपाय आहे. जसं की दमा, सर्दी, खोकला, नासिकाशोथ इ. कधी सूर्यप्रकाशात तर कधी बदलत्या हवामानात अनेक आजार आपल्याला घेरतात. अशा वेळी अशा सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी आपल्या पूर्वजांचं म्हणणं ऐका आणि हा घरगुती उपाय नक्की करून पहा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories