जसं घरोघरी डायबिटीस तसं घरोघरी किडनी स्टोन. किडनी स्टोनची समस्या एक रोजची समस्या बनली आहे. किडनी स्टोन ही एक गंभीर समस्या आहे ज्यामध्ये तीव्र वेदना होण्याची तक्रार असते.
हे खडे किडनी आणि पित्त मूत्राशयात होऊ शकतात. किडनी स्टोनपासून बरं होण्यासाठी घरगुती उपचार आणि डॉक्टरांचे उपचार सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर किडनी स्टोनच्या समस्येपासून घरगुती पद्धतींनी आराम मिळवण्यासाठी आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
किडनी स्टोन पडून जाईल तर तुम्ही हा उपाय कराल.
किडनी स्टोनचा त्रास आजकाल बहुतांश लोकांमध्ये दिसून येत आहे. खराब जीवनशैली आणि आहार हे स्टोन होण्याचं प्रमुख कारण आहे. किडनीतील खडे लहान असतात, त्यामुळे अनेक वेळा जास्त पाणी प्यायल्याने ते लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतात.
पण कधी कधी मोठा दगड असल्याने हे शक्य होत नाही. मग काय करावं? किडनी स्टोनमुळे पोटदुखी देखील खूप तीव्र असते. तुम्हाला किडनी स्टोन आहे आणि पोट आणि कंबरेच्या दोन्ही बाजूला दुखत असेल तर लगेच डॉक्टरांना भेटा.
काही वेळा कोलेस्टेरॉल आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने मुतखड्याचा त्रास होतो. काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करूनही तुम्ही किडनीतील खडे बाहेर काढू शकता, त्यामुळे होणारा त्रास कमी करू शकता. तुम्हाला एवढच करायचं आहे की कुळीथाचा वापर औषध म्हणून करायचा आहे. कुळीथ किडनीतील खडे काढून टाकते
मुतखड्याचा त्रास आहे तर कुळीथ खूप फायदेशीर आहेत.
किडनी स्टोन असेल तर कुळीथाचा खूप फायदा होतो. ह्याने काही महिन्यांत दगड वितळून बाहेर पडतात. विशेषत: कुळीथ डाळीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास छोटे दगड सहज निघून जातात.
कुळीथ इतके का पौष्टीक असतात?
ह्या कुळीथात अनेक प्रकारची पोषक घटक असतात. कुळीथामध्ये सॅपोनिन्स, स्टिरॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स इत्यादी अतिशय महत्त्वाचे घटक असतात. इतकंच नाही तर त्यात अँटी-युरोलिथियासिस घटक देखील असतात, जे मुतखड्याचा दगड विरघळवण्याचं काम करतात.
मुतखड्यासाठी उपाय, कुळीथ कसे खावेत
कुळीथ स्वच्छ करा. एका भांड्यातल्या पाण्यात टाका आणि रात्रभर ठेवा. सकाळी उठल्यानंतर ह्याचं पाणी रिकाम्या पोटी प्या. अशाप्रकारे तीन ते चार महिने रोज एक कप कुळीथ पाणी प्यायल्यास फायदा होतो. किडनीतून स्टोन बाहेर पडून जातो.
कुळीथ खाण्याचे फायदे आहेत जबरदस्त
कुळीथ नियमित सेवन केल्यास हृदयाचं आरोग्य सुधारतं. कुळीथाचा जेवढा वापर कराल तेवढं वजन कमी व्हायला मदत करते. डायबिटिस च्या रूग्णांसाठी कुळीथ चे सेवन चांगले मानले जाते कारण ते रक्तातील साखरेची पातळी कमी करते, ज्यामुळे मधुमेह व्यवस्थापनास मदत होते. किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी कुळीथ खाल तर खरच फायदेशीर आहेत.किडनीतील मुतखडे बाहेर पडून जातात.