आता पावसाळा जवळपासच्या उंबरठ्यावर येउन ठेपला आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात सतत पाऊस पडतो. सध्या प्रदूषण वाढल्यामुळे पहिल्या पावसाचे पाणी अंगावर पडून अनेकांना अंगाला खाज यायला सुरुवात होते. त्याचबरोबर खराब पाण्याच्या चिखलामुळे पायाला खाज सुटते, फोड येऊन खरूज होते. पावसाळ्यात त्वचेला होणाऱ्या या त्रासावर काही उपाय आहे का?
हो आहे ना! पावसाळ्यात खाज सुटण्यावर हा नामी उपाय आहे. डागाच्या खुणा त्वचेवर राहत नाहीत. जर तुम्ही हा उपाय नागीण येणे, खाज येणे ह्यावर नियमित वापरत असाल, तर तुम्हाला त्याचे परिणाम फार कमी वेळात दिसू लागतील.
पावसाळ्यात ही खाज का येते?
पावसाळ्याच्या दिवसात बॅक्टेरिया ओलसर दमट हवेमुळे वाढतो आणि जर तुम्ही तुमच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर तुमच्या त्वचेला खाज येण्याचा त्रास आणखी वाढतो. हे एक प्रकारचं इन्फेक्शन आहे ज्याने तुमच्या त्वचेवर पुरळ, चट्टे आणि लालसरपणा येतो.
पावसाळ्यात सर्व वातावरण ओले होते आणि जर तुम्ही कधी ओले कपडे घातले किंवा तुमच्या त्वचेला बाहेरून आलेल्या घाणेरड्या हातांनी स्पर्श केला तर तुम्हाला खाजेचा संसर्ग होऊ शकतो. याला एक्जिमा असही म्हणतात.
खाज सुटण्यावर हा उपाय घरच्या घरी बनवा
साहित्य काय लागेल
- यासाठी तुम्हाला एक पिकलेलं कारलं लागेल.
- थोडं गुलाबपाणी घ्या.
- ताजा कोरफडीचा गर किंवा ॲलोवेरा जेल घ्या.
कृती
- सर्व प्रथम तुम्ही कारलं घ्या आणि ते पाण्यात धुवून चांगलं कोरड करा.
- आता कारलं किसून घ्या आणि पिळून त्याचा रस काढा.
- कोणतंही बी त्याच्या रसात मिसळणार नाही याची काळजी घ्या.
- आता या रसात उरलेले दोन घटक म्हणजे गुलाबजल आणि कोरफड जेल घाला.
- हे सगळं एकमेकांत चांगले मिसळा.
हे कसं वापरायचं?
ह्या मिश्रणात कापसाचे पॅड भिजवा आणि तुमच्या त्वचेच्या ज्या भागात तुम्हाला खाज येत असेल तेथे लावा. रस लावल्यानंतर त्वचेला थोडासा मसाज करा जेणेकरून ते तुमच्या त्वचेत चांगले शोषले जाईल. यामुळे तुम्हाला थोडी जळजळ देखील होऊ शकते, परंतु जर असं होत असेल तर ते काढू नका किंवा काळजी करू नका, काही काळानंतर तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल.
तुम्ही हे किती वेळा वापरू शकता?
जोपर्यंत तुमची खाज येण्याची समस्या पूर्णपणे बरी होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचा दररोज वापर करावा लागेल आणि हा उपाय तुम्हाला दिवसातून दोनदा वापरावा लागेल. काही दिवसातच तुम्हाला पूर्ण आराम दिसू लागेल.
तुम्ही हे लहान मुलांच्या खाज खरजेवर वापरू शकता का?
जर ज्यावर उपाय करायचा आहे त्या मुलाचं वय 10 वर्षांपेक्षा जास्त असलं तर तुम्ही त्याच्यावरही हा घरगुती उपाय वापरू शकता. अगदी लहान मुलांवर याचा वापर करू नका, नाहीतर त्याची खूप चिडचिड होऊ शकते.
पावसाळ्यात येणाऱ्या खाजेवर हा रामबाण उपाय आहे.
जर तुम्ही हा उपाय दररोज वापरत असाल तर तुम्हाला त्याचे परिणाम फार कमी वेळात दिसू लागतील. यातील सर्व घटक नैसर्गिक आहेत आणि तुम्हाला त्यापासून घाबरण्याची किंवा दुष्परिणामांची काळजी करण्याची गरज नाही. ते वापरल्यानंतर काही तासांनंतर, तुम्ही तुमच्या त्वचेवर इतर कोणतेही उत्पादन वापरू नका.