आयुर्वेदानुसार पावसाळ्यात दही खावं की खाऊ नये? दही खाल्ल्यामुळे कोणते त्रास होऊ शकतात.

Advertisements

पावसाळ्यात दही खावं की खाऊ नये याविषयी तुमच्या मनात सुद्धा संभ्रम असेल तर हा लेख पूर्ण वाचा. उन्हाळ्यात दह्यात साखर मिसळून खाल्ल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते. उन्हाळ्यात दही खाल्ल्याने शरीर थंड राहते. पण पावसाळ्यात दही खाल्ल्याने खरंच काही त्रास होतात का हे खर आहे की खोटं?

दही खाणे प्रत्येकासाठी पौष्टिक असतं. आहारात दही खाल्ल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता होत नाही. आपली हाडं आणि दात मजबूत करण्यासाठी दही उत्तम आहे. यासोबतच दही खाल्ल्याने पचनसंस्था, केस आणि त्वचेलाही याच्या सेवनाने खूप फायदा होतो. दह्यामधील व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करते.

दही प्रोबायोटिक म्हणून देखील काम करते, म्हणजे आतड्यात राहणारे चांगले बॅक्टेरिया निरोगी ठेवते आणि त्यांच्या वाढीला मदत करते. पण काही ऋतूंमध्ये आणि काही परिस्थितींमध्ये दही खाऊ नये असं सांगितलं जातं. जसं की पावसाळ्यात दही खाऊ नये.

दही खाण्याविषयी आयुर्वेद काय म्हणतो?

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात दही खाणे चांगले नाही. पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थांमध्ये जिवाणूंचा प्रादुर्भाव जास्त होत असल्याने पावसाळ्यात दही जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. अशा परिस्थितीत दही खाण्यासाठी उन्हाळाच उत्तम मानला जातो.

Advertisements

पावसाळ्यात दही खाण्याचे तोटे

पावसाळ्यात सकाळी किंवा रात्री जास्त दही खाल्ल्याने सर्दी, सर् घसा खवखवण्याची समस्या होऊ शकते. छातीत कफ वाढल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. या दिवसात जास्त दही खाल्ल्याने अंग दुखायला लागतं. अंग सतत दुखून तापासारखे वाटू शकते.

दही खाल्ल्याने ते आंबट आणि थंड असल्याने संधिवाताचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच ज्या लोकांना सांधेदुखी सारख्या हाडांच्या समस्यांनी त्रस्त आहे, त्यांनीही पावसात दह्याचे सेवन कमी करावे. दह्याचा प्रभाव थंड असल्याने दही खाल्यावर जरा नियंत्रण ठेवा किंवा अजिबातच खाऊ नका.

पावसाळ्यात ओलाव्यामुळे दही खराब होऊ शकतं किंवा चिकट होऊ शकतं. यासोबतच अनेक प्रकारचे बॅक्टेरिया वाढण्याची भीती असते, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो. जर तुम्हाला दही खायचं असेल तर ते ताजं खा, जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवलेलं दही खाऊ नका नाहीतर पोटात संसर्ग होऊ शकतो.

दही खाण्याचे आरोग्य फायदे

वर सांगितल्याप्रमाणे सगळ्या रोगांना दूर ठेवण्यासाठी दही एक चांगले औषध आहे. दही हे प्रोबायोटिक अन्न आहे. सूक्ष्मजीव असल्याने ते फायदेशीर आहे. प्रोबायोटिक्स संसर्ग टाळतात. रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

  • दही खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.
  • पोटाचे आरोग्य, पचनशक्ती मजबूत असते.
  • केसांवर दही लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते.
  • त्वचेवर दही लावल्याने त्वचा निरोगी राहते. टॅनिंगची समस्या दूर होते.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories