सतत पोट दुखतंय तर ह्याचं कारण आहे आतड्याला झालेल्या जखमा! यावर घरगुती उपचार करून बघा.

तुमच्या पोटात दुखतं का? सतत पोटदुखीचं कारण लहान आतड्यातल्या जखमा! खरंच आतड्याला जखमा होतात का याला नक्की काय म्हणतात? यावर काही उपचार आहेत का जेणेकरून नेहमीची पोटदुखी कायमची बरी होईल. पोटात अल्सर, हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. हे जीवाणू पोटात दाहक स्थिती निर्माण करतात, ज्यामुळे पोटात फोड किंवा अल्सर होतात.

ज्याप्रमाणे तुमच्या तोंडात फोड येतात, त्याचप्रमाणे पोटात फोड किंवा व्रण असतात. या समस्येला पेप्टिक अल्सर म्हणतात. जर तुम्हाला पेप्टिक अल्सर असेल, तर तुम्हाला पोटात वेदना, जळजळ जाणवेल. अनेक वेळा पोटाशी संबंधित हा त्रास चुकीचं खाणंपिणं, खराब जीवनशैली, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे होतो. पोटात व्रण किंवा फोड आल्यावर पोटात खूप तीव्र वेदना होतात.

हा पोटातला अल्सर हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतात. या जीवाणूंमुळे पोटात जळजळ होऊन फोड किंवा व्रण होतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास अंतर्गत रक्तस्त्राव आणि संसर्ग देखील होऊ शकतो. जाणून घ्या, पेप्टिक अल्सरची लक्षणे, कारणे आणि उपचार काय आहेत?

पेप्टिक अल्सर नक्की काय आहे बरं?

- Advertisement -

पेप्टिक अल्सर हा पोटाच्या आतला एक फोड आहे जो पोटाच्या अस्तर, अन्ननलिकेचा खालचा भाग आणि लहान आतड्यात येतो. ही समस्या उद्भवते जेव्हा पोटातील आम्ल पचनमार्गाचे संरक्षणात्मक अस्तर श्लेष्मल नष्ट करते. पेप्टिक अल्सर तेलकट किंवा मसालेदार अन्न आणि तणावामुळे होत नाही. पण ह्या गोष्टी त्याची लक्षणे वाढवू शकतात.

पेप्टिक अल्सरची लक्षणे

 • ओटीपोटात कळ मारणे
 • उलट्या आणि मळमळ
 • उलट्यामध्ये रक्त
 • वजन कमी होणे
 • वारंवार ढेकर येणे
 • भूक न लागणे
 • छातीत दुखणे किंवा जळजळ
 • पोट फुगणे, जळजळ होणे
 • श्वास लागणे
 • गडद होणे आणि रक्तरंजित मल

पेप्टिक अल्सर होण्याची कारणे कोणती आहेत?

पेप्टिक अल्सरमुळे आतड्यांतील अल्सर एच पायलोरी बॅक्टेरियामुळे होतात. हा जीवाणू श्लेष्मल झिल्लीमध्ये राहतो जो लहान आतड्याच्या ऊतींचे संरक्षण करतो. ह्या जिवाणूमुळे पोटाच्या आरोग्याला धोका पोहोचत नाही, परंतु अल्सर किंवा जखमांमुळे पोटाच्या आतील भागात जळजळ होते.

 • पोटातील काही आम्लांमुळे पचनसंस्थेतील श्लेष्मल, संरक्षणात्मक अस्तर नष्ट होऊन पोटात अल्सर होऊ शकतो.
 • ह्याचं कारण म्हणजे काही लोक सतत ऍस्पिरिन, अँटी इन्फ्लमेशनरी औषध घेतात, यामुळे पेप्टिक अल्सर होतो.
 • जास्त सिगारेट आणि दारू पिण्यामुळेही पोटात अल्सर होऊ शकतो.
 • रेडिएशन थेरपी आणि पोटाच्या कॅन्सर मुळेही पेप्टिक अल्सर होतात.

पेप्टिक अल्सरवर उपचार काय आहेत?

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांना भेटा. पेप्टिक अल्सरच्या समस्येचे डॉक्टर लक्षणे पाहून निदान करतात. यासाठी शारीरिक तपासणीसह एन्डोस्कोपी केली जाते.

पेप्टिक अल्सरवर घरगुती उपाय

- Advertisement -

गाईचं घरगुती तूप पेप्टिक अल्सरवर रामबाण उपाय आहे. पेप्टिक अल्सर एक चमचा तूप हळद मिसळून घेतल्याने बरे व्हायला लागतात. पेप्टिक अल्सरमध्येही थंड दूध पिणे फायदेशीर आहे.

आयुर्वेदानुसार, थंड दूध सम प्रमाणात पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटातील अल्सरची समस्या काही दिवसांतच दूर होते. मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाण्याऐवजी उकडलेले अन्न खा. यामुळे पचनक्रिया सुधारते. पोटातील अल्सर काही दिवसातच कमी होईल.

पोटाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी हिंग खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. पचनक्रिया सुधारण्यासोबतच पोटातील व्रण दूर करण्यासाठी अन्नात हिंगाचा वापर करा. तुम्ही एक ग्लास पाण्यात चिमूटभर हिंग पावडर टाकूनही पिऊ शकता. पोटदुखीत आराम मिळेल.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories