ह्याच त्या कारणांसाठी काळी मिरी थंडीच्या दिवसांत हवीच!

- Advertisement -

मित्रांनो, जेव्हा वातावरणात बदल होतो तेव्हा आपल्या आहारात बदल करणे देखील आवश्यक आहे, जेणेकरून आपण रोग आणि संक्रमणाच्या जोखमीपासून स्वतःचं संरक्षण करू शकता.

मसाले निवडताना काळी मिरीचं नाव आधी येतं. काळी मिरी हा जगभरात वापरल्या जाणार्‍या मुख्य मसाल्यांपैकी एक आहे. ज्याचा सर्व पदार्थांसोबतच औषध म्हणून वापर केला जातो. काळी मिरी ही आयुर्वेदात आरोग्यासाठी औषध मानली जाते. हिवाळ्यात काळी मिरी खाणे तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते ते जाणून घ्या. 

आयुर्वेदावर विश्वास ठेवायचा झाल्यास, हे नैसर्गिक औषध आपले एकंदर आरोग्य राखण्यासाठी प्रभावी ठरू शकते. हिवाळ्यात याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराचे तापमान कायम राहते आणि इन्फेक्शनपासून दूर राहायलाही मदत होते.

जाणून घ्या काळी मिरी खास का असते

वेबमेडच्या संशोधनानुसार, तुमच्या आहारात काळी मिरी समाविष्ट केल्याने तुम्हाला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, मॅंगनीज, कॉपर, आयर्नचा पुरवठा होतो. याशिवाय त्यात क्रोमियम, झिंक, सेलेनियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, थायामिन हे घटकही चांगल्या प्रमाणात आढळतात. हे सर्व पोषक तत्व चांगले आरोग्य राखण्यास आणि रोगांपासून रक्षण करतात. हिवाळ्यात आहारात काळी मिरी का समाविष्ट करणे आवश्यक आहे

- Advertisement -

वजन कमी होईल 

दर हिवाळ्यात तुमचं वजन वाढत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काळी मिरी अवश्य समाविष्ट करा. तुमची चयापचय शक्ति वाढवून वजन कमी करायला ती उपयुक्त ठरेल. काळी मिरी खाल्ल्याने तुमची भूक नियंत्रित राहते, ज्यामुळे तुम्हाला पुढील जेवणात कमी कॅलरीज वापरता येतील. हे सिद्ध झालंय की, जे लोक काळी मिरी खातात त्यांची भूक नैसर्गिकरित्या कमी होते. त्यामुळे कॅलरीज कमी खाल्ल्या जातात.

पोटाच्या आजारांमध्ये फायदेशीर

जर तुमची आतडी निरोगी असतील तर तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहील. आपल्या आतड्यातील जीवाणू थेट आपल्या शारीरिक आरोग्याशी तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झालं आहे की काळी मिरी खाल्ल्याने तुमच्या आतड्यातील चांगला बॅक्टेरिया  वाढायला मदत होते. यामुळे तुमचे पोटाचे आजार कमी होतात.

वेदना आणि दुखापतीपासून आराम मिळतो

हिवाळ्यात अनेकदा हात-पाय दुखण्याची समस्या उद्भवते. तसेच, हिवाळ्यात झालेल्या जखमाही बऱ्या होण्यास बराच वेळ लागतो. अशा वेळी काळी मिरी तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते.

काळी मिरीमध्ये आढळणारे कंपाऊंड पाइपरिन नैसर्गिकरित्या वेदना कमी करण्यास मदत करते. यामुळे तुम्हाला दुखापतीपासून लवकर आराम मिळतो.

- Advertisement -

शरीराची सूज कमी करा

हिवाळ्यात अनेकांना हात-पाय सुजायला सुरुवात होते. पण काळ्या मिरी खाऊन शरीराची सूज लवकर कमी व्हायला मदत होते. काळ्या मिरीमध्ये अँटिऑक्सिडेंट असण्यासोबतच दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. त्याचे नियमित खाऊन अंगाची सूज कमी करायला उपयुक्त ठरू शकते.

काळ्या मिरीतील दाहक-विरोधी आणि पाइपरिन गुणधर्म दाह कमी करण्यासोबत दमा आणि हंगामी ॲलर्जी कमी करायला मदत करतात.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories