कोहाळ्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोहाळ्याला इंग्रजीत व्हाईट पम्पकिन म्हणतात. ज्यामध्ये व्हिटॅमिन, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं आणि बरेचसे आजार कमी होतात. हा रस शरीरातील साचलेली घाण काढून टाकण्यासाठी सर्वात फायदेशीर मानला जातो. लिव्हरच्या आरोग्यासाठी अनेक लोक नियमितपणे हा रस पितात. तर आजच्या लेखात आपण लिव्हरसाठी कोहाळ्याचे फायदे कोणते ते पाहूया.
आपल्या लिव्हरसाठी कोहळ्याचा रस पिण्याचे फायदे

कोहाळ्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. याशिवाय यामध्ये अँटी-इंफ्लेमेशनरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात. कोहाळ्याचा रस नियमित प्यायल्याने यकृताला अनेक प्रकारे फायदा होतो.
लिव्हरला सूज आली असेल तर फायदेशीर

उन्हाळ्यामध्ये सूज कमी करणारे अँटीइन्फ्लमेशनरी गुणधर्म असतात. रस प्यायल्याने जळजळ कमी होते. तुमच्या यकृतात जळजळ होत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कोहाळ्याचा रस पिऊ शकता.
पित्त बाहेर काढण्यासाठी उपयुक्त

कोहाळ्याचा रस प्यायल्याने पित्त बाहेर पडण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार शरीरात पित्त वाढल्यास अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. अशावेळी कोहाळ्याचा रस पित्त बाहेर टाकायला मदत करतो.
लिव्हरची उष्णता कमी करा

यकृतातील उष्णता वाढली की त्वचेत जळजळ, पोटात जळजळ आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्वचेवर पुरळ येणे, फोड येणे, पिंपल्स होऊ शकतात. अशा वेळी कोहळा फायदेशीर ठरू शकतो. कोहाळ्याचा थंड प्रभाव असल्यामुळे ते यकृतातून उष्णता बाहेर टाकतो.
लिव्हर डिटॉक्स करा

कोहाळ्याचा रस पिऊन यकृत/ लिव्हर डिटॉक्स होतं. अस्वास्थ्यकर आहारामुळे आपल्या लिव्हरमध्ये घाण जमा होते. त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येतो. म्हणूनच तज्ञ वेळोवेळी लिव्हर डिटॉक्स करण्याची शिफारस करतात. कोहाळ्याचा रस पिऊन लिव्हर सहज डिटॉक्स करता येते.
कोहळा रस कसा प्यावा?

कोहाळ्याचा लिव्हरसह एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण त्याचे सर्व फायदे घेण्यासाठी कोहाळ्याचा रस योग्य प्रकारे पिणे खूप गरजेचे आहे. यासाठी प्रथम कोहळा चांगला सोलून घ्या. त्याच्या सर्व बिया काढा. त्यानंतर त्याचा रस काढून प्या. पण त्याचा रस साधारणपणे प्या. त्यात मीठ, लिंबू किंवा पुदिना घालू नका. फक्त रस प्या.
कोहळा रस पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

कोहळ्याचा रस नेहमी रिकाम्या पोटी प्यावा. तरच त्याचे सर्व पोषक तत्व शरीराद्वारे सहज शोषले जातात. कोहाळ्याचा रस सकाळी रिकाम्या पोटी पिणे चांगले. सकाळी रिकाम्या पोटी कोहाळ्याचा रस प्यायल्याने शरीर त्यामधील जीवनसत्त्वे आणि खनिजे सहजपणे शोषून घेते.
तुमचं लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कोहाळ्याचा रस नियमितपणे पिऊ शकता. परंतु जर तुम्हाला यकृताशी संबंधित कोणताही गंभीर आजार होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ह्या रसाचे सेवन करा.