20 लाख रुपये किलोने विकली जाते ही जडीबुटी, जाणून घ्या चीनला भारताकडून चोरायचे आहे त्यात काय?

अरुणाचल प्रदेशात चीन गेल्या अनेक दिवसांपासून घुसखोरी करत आहे. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की किडा जडी नावाच्या औषधी वनस्पतीसाठी हे सगळं चालू आहे.

20 लाख रुपये किलोने विकली जाते ही जडीबुटी, जाणून घ्या चीनला भारताकडून चोरायचे आहे त्यात काय? 

अरुणाचल प्रदेशात चीन अनेक वर्षांपासून घुसखोरी करत आहे. यामागे इतर कारणं असतीलही, पण ह्याचं एक कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कीडा जाडी नावाची वनौषधी चोरण्यासाठी चीन अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करत आहे. 

हिमालयीन वियाग्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कीडा जडीचा वापर आयुर्वेद आणि चिनी औषधांमध्ये अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. याशिवाय याचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे ती जगभरात सोन्यापेक्षा महाग विकली जाते. का? सविस्तर जाणून घ्या.

ही औषधी वनस्पती सोन्यापेक्षा महाग का आहे?

3 19

किडा जडी किंवा हिमालयीन व्हायग्रा ही खरं तर सोन्यापेक्षा महाग आहे. मग किंमत काय, असं लोक विचारतात. तर, त्याची किंमत 20 लाख रुपये प्रति किलोपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. ह्या औषधाची ही किंमत त्याच्या गुणामुळे आहे. कारण कॅटरपिलर फंगस ही एक सुरवंट बुरशी आहे जी भारतीय हिमालयात आणि नैऋत्य चीनमधील किंघाई-तिबेट पठाराच्या उंचीवर आढळते.

कॅटरपिलर फंगस जडीबुटी जगामध्ये कशी प्रसिद्ध झाली 

4 18

कॅटरपिलर फंगस तिच्या एनर्जी वाढविण्याच्या क्षमतेसाठी लोकप्रिय होती. खरं तर, 1993 मध्ये चायनीज नॅशनल गेम्समध्ये नऊ जागतिक विक्रम मोडणाऱ्या महिलांनी त्यांच्या उत्कृष्ट विजयाचे आणि स्टॅमिना वाढवण्याचं श्रेय ह्या औषधी वनस्पतीला दिले. ह्या महिलांनी खुलासा केला की त्या नियमितपणे कॉर्डीसेप्स घेत होत्या ज्यात कॅटरपिलर फंगस आहे.

Leave a Comment