कुळीथ भिजवून त्याचं पाणी प्याल तर ह्या आजारांवर दुसऱ्या कोणत्या औषधाची गरज नाही.

लिव्हरचे आजार आणि किडनी स्टोनची समस्या असल्यास कुळीथाचं पाणी प्यायला सांगितलं जातं. पण ते शरीरासाठी इतरही अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

कुळीथ भिजवून त्याच्या पाण्याचे फायदे

3 112

कुळीथ आपल्या आरोग्यासाठी आधीच्या पिढ्यांपासून फायदेशीर मानले गेला आहे. कुळीथ इतका पौष्टिक मानला जाई की कष्टाचं काम करणाऱ्या घोडे आणि गुरेढोरे यांना खायला दिला जायचा. शेतकरी आणि ग्रामीण भागातले कष्टकरी लोकसुद्धा जास्त प्रमाणात कुळीथ खायचे.

मात्र आता कुळीथ ही शहरातील लोकांचीही पसंती बनली आहे. त्यातून विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात जसं की पिठलं, सूप आणि स्प्राउट घालून सॅलड इ. पण आयुर्वेदात कुळीथ धान्य भिजवून त्याचं पाणी पिण्याचे वेगवेगळे फायदे सांगितले आहेत. .

1. कोलेस्ट्रॉलवर रामबाण औषध

4 110

हाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कुळीथ भिजवून त्याचं पाणी प्याल तर उपयुक्त आहे. कोलेस्टेरॉल आपल्या पोटातल्या पाचक अग्नीच्या असंतुलनामुळे वाढतं. जेव्हा पचन बिघडतं तेव्हा शरीरात विषारी पदार्थांची निर्मिती होते. त्यामुळे खराब कोलेस्टेरॉल जमा होऊन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

कुळीथ पाणी तुमच्या मेटॅबॉलिझमला गती देते आणि कोलेस्टेरॉल जमा होण्यापासून रोखते. ज्यांना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे ते हे पाणी पितील तर उष्णतेने कोलेस्ट्रॉल वितळायला आणि नियंत्रणात ठेवायला मदत होते.

2. डायबिटिसवर फायदेशीर

5 109

आयुर्वेदानुसार वात-कफ दोषाचे असंतुलन आणि खराब पचन यांमुळे डायबिटिस होतं. बिघडलेलं पचन स्वादुपिंडाच्या पेशींच्या इन्सुलिनच्या कामात व्यत्यय आणते.

कुळीथ पाणी वात-कफ संतुलित ठेवेल आणि पाचक एंडझाइम्स वाढवेल. ह्यामुळे इन्सुलिनचं प्रोडक्शन वाढून आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते.

3. अंगावर पांढरे पाणी जाणे

6 96

स्त्रियांना प्रमेह किंवा अंगावर पांढरे पाणी जाणे. ह्या समस्येवर कुळीथ पाणी चांगला उपाय आहे. त्यात भरपूर लोह असतं आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य राखता येते. याशिवाय, मासिक पाळीचे त्रास कमी होतात.

ल्युकोरिया (अंगावर पांढरे पाणी जाणे) हा त्रास असल्यास हा पांढरा स्त्राव जायचा कमी होतो. यासाठी मूठभर कुळीथ एका भांड्यात रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी उकळून ठेवा आणि दिवसातून तीन वेळा प्या. ह्या उपायाने स्त्रियांना अंगावर जाणारा पांढरा स्त्राव कमी होतो.

4. वजन कमी करेल

7 85

कुळीथामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असते ज्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. त्यात नैसर्गिक गुणधर्म आहेत जे फॅट बर्नर म्हणून कार्य करतात आणि एलडीएल (खराब कोलेस्ट्रॉल) कमी करू शकतात आणि एचडीएल (चांगलं कोलेस्ट्रॉल) वाढवू शकतात.

बियांमध्ये भरपूर फायबर असतं जे तुमची पचनसंस्था सक्रिय ठेवते. यासोबतच कुळीथात प्रोटीनचं प्रमाणही जास्त असतं जे भुकेशी संबंधित हार्मोन्स शांत करायला मदत करते आणि वजन कमी करायला मदत करते.

5. त्वचेचे त्रास कमी होतात

8 48

त्वचेवर डाग खाज आणि त्वचेचे आजार असतील तर कुळीथ यावर एक उत्तम उपाय आहे. कुळीथ त्वचेच्या समस्या कमी करते. त्यात अँटीबॅक्टेरियल पदार्थ आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत जे आपल्या त्वचेचं पोषण करतात आणि त्वचेचं इन्फेक्शन कमी करतात.

यासाठी कुळीथ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी कुळीथाचं पाणी प्या आणि उरलेले कुळीथ बारीक पेस्ट करून चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर थंड पाण्याने धुवा. ही पेस्ट त्वचेला एक्सफोलिएट करते आणि त्वचेच्या मृत पेशी देखील काढून टाकते.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories