हृदयविकार, मधुमेह तसेच हिमोग्लोबिन, कॅल्शियमच्या योग्य प्रमाणासाठी वापरा शेवगा…

भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आर्द्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते होतो. शेवग्याच्या शेंगाही वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवगा अनेक कारणांस्तव आरोग्याकरिता अतिशय लाभदायक ठरत आहे.

त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक व्याधी नाहीश्या करण्यास समर्थ असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने शेवग्याला चमत्कारी वृक्ष असे म्हटलेले आहे.

तसेच शेवग्याची पानं किंवा कोवळ्या फांद्या तसंच शेवग्याच्या बिया यांच्यामध्ये सुद्धा अनेक औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. एकूण 300 प्रकारचे आजार बरा करण्याची क्षमता या शेवग्यामध्ये असते. कारण या आयुर्वेदिक शेवग्यामध्ये तब्बल 90 प्रकारचे पोषक घटक आणि 46 प्रकारचे रोगप्रतिकारक घटक असतात.

या शेवग्यामध्ये अ, ब, क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असतात.तसेच यामध्ये लोह आणि सल्फर हे घटक असतात.त्यामुळे शेवगा  पानांची भाजी खाणे आवश्यक असते.तूम्ही शेवग्याची हिरवे पाने घेऊन ती वाळवावी आणि त्यापासून विविध प्रकारच्या अन्न घटक तयार करावे. 

कारण या हिरव्या पानांमध्ये दुधाच्या तुलनेत 17 पट जास्त कॅल्शियम असतं तसेच  क जीवनसत्वसाठी अनेकजण संत्र्या खाणे पसंत करतात पण या शेवग्याच्या पानांमध्ये संत्र्यापेक्षा 7 पट जास्त  जीवनसत्व क असते असे एका रिसर्चमध्ये दिसुन आहे आहे.

केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असतात त्यामुळे आपल्या मेंदूत योग्य विकास होण्यासाठी मदत होते. पण या केली पेक्षा 15 जास्त पोटॅशियम य शेवग्याच्या हिरव्या पानापासून मिळत असते.

पालकांपेक्षा 25% जास्त लोह या शेवग्याच्या पानांमध्ये आढळतात तसेच आपल्याला गाजरापेक्षा दहापट जास्त जीवनसत्त्वे अ या पानामध्ये मिळत असते. आणि आपण प्रोटीनसाठी दही खात असतो पण या दहीपेक्षा 9 पट जास्त प्रथिने या शेवग्याच्या पानात असतो.यामुळे हा शेवगा हा खूप बहुगुणी आणि आयुर्वेदिक मानला जातो.

तसेच या शेवग्याच्या पानांची भाजी नियमितपणे खाली तर आपल्याला भविष्यामध्ये कधीच  हार्ट अटॅकचा त्रास होत नाही. तसेच जर बराच जणांच्या रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढलेलं असतं तर त्यासाठी हा शेवगा खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास योग्य मदत करते.

तसंच वय वाढत होत त्यामध्ये केस पांढरे होणे किंवा डोळ्यात सुरकुत्या पडणे ही सर्व लक्षणे फ्रीरॅडिकल्स मुळे आपल्या शरीरात निर्माण होतात तर या फ्रीरॅडिकल्सना नष्ट करण्याचे काम करतो हा शेवगा करतो.

ज्या लोकांना रक्तामध्ये हिमोग्लोबिन त्रास होऊ सतत होत असतो तसेच त्यांच्यामध्ये खुप महिलांना रक्ताची कमतरता असते या शेवग्याच्या सेवन केल्यास  रक्ततील हिमोग्लोबिन तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढते  आणि डोळ्यांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत होते. 

तसेच आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. तसेच हाडांची मजबूत करण्यासाठी सुद्धा अतिशय चांगला आहे.ज्या  कुपोषित व्यक्ती आहेत किंवा अशक्तपणा त्रास असेल तर या शेवग्याच्या शेंगाचा वापर करू शकता. बऱ्याच महिलांना सतत नैराश्य येतं असेल तर अशा महिला सुद्धा या शेवग्याचा वापर करू शकतात.

आपल्या स्कीन प्रोब्लेम असल्यास त्वचा हा शेवगा अतिशय गुणकारी वनस्पती मानला जातो. असेही शेवग्याचे अनेक उपयोग आहेत.त्यामुळे या बहुउपयोगी शेवग्याचे वापर तुमच्या आहारा नक्की करत जावा त्याने अनेक प्रकारच्या शरीरातील समस्या दूर होतात. पण हा शेवगा हा प्रकृतीने उष्ण पदार्थ असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेवग्याचे सेवन हे जरासं कमी प्रमाणात करावे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories