पुन्हा पुन्हा पॅनीक अटॅक येतात तर एकदाच अनुभव घ्या ह्या उपायांचा!

जर तुम्ही वारंवार पॅनीक अटॅकमुळे घाबरून गेला असाल आणि त्यावर उपाय शोधत असाल. तर हे वाचा. सध्या टेन्शनसोबतच मानसिक आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. असं असूनही, बहुतेक लोक केवळ त्यांच्याकडे दुर्लक्षच करत नाहीत तर त्यांच्याबद्दल मोकळेपणाने बोलणही टाळतात. टेन्शन सहन करत करत निष्काळजीपणाची ही स्थिती पॅनीक अटॅकपर्यंत पोहोचते.

पॅनीक अटॅक ही अशी परिस्थिती आहे जिथे तणाव आणि चिंता तीव्रतेच्या मर्यादेपर्यंत वाढते. आणि त्याचा इतर मार्गांनीही आरोग्यावर परिणाम व्हायला सुरूवात होते. म्हणूनच वेळेत असे अटॅक ओळखणे आणि मदतीसाठी पुढे जाणे आवश्यक आहे.

पॅनीक अटॅक कसे थांबवायचे

पॅनीक अटॅक आणखी वाईट बनतात कारण त्याची लक्षणं असं सांगत नाहीत की हाच पॅनीक अटॅक आहे पण एखाद्याला श्वास लागणे, जास्त घाम येणे, जठरासंबंधी त्रास, थंडी वाजून येणे, श्वास घेण्यात त्रास होणे, बोलण्यात अडचण, हात-पाय थंड होणे असे अनुभव येऊ शकतात. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींपासून तुम्हाला अलिप्त वाटू शकतं.

म्हणूनच आपल्या हातात उपाय करणं एवढंच आहे. हे उपाय तुम्ही पॅनीक अटॅक आल्यावर करु शकता. पॅनिक अटॅक आणि चिंता सर्व वयोगटातील लोकांना त्रास देऊ शकतात. लाईफस्टाल मधल्या मोठया बदलांमुळे टेन्शन येऊ शकतं. विशेषतः धकाधकीच्या जीवनात शहरी भागात रोजच टेन्शन असतं. पण काही सोपे उपाय आहेत ज्याने पॅनिक अटॅक टाळता येऊ शकतात.

- Advertisement -

विश्रांती व्यायाम

प्रोग्रेसिव्ह स्नायुंचा आराम व्यायाम किंवा नियंत्रित श्वासोच्छवासाचे तंत्र हे पॅनीक अटॅक टाळण्यासाठी अविश्वसनीय मार्ग आहेत. एखादी व्यक्ती आराम करणे किंवा विशिष्ट श्वासोच्छवासाचे तंत्र निवडू शकते, ज्यामुळे गंभीर क्षणांमध्ये तणाव आणि चिंता दूर होऊ शकते. श्वास घेताना या गोष्टी लक्षात ठेवा.

  • डोळे बंद ठेवा.
  • तुम्हाला सांत्वन देऊ शकतील अशा इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
  • जवळच्या माणसांची किंवा आवडत्या मंदिराची चित्र डोळ्यासमोर आणा.
  • हळू आणि दीर्घ श्वास घ्या.
  • आपल्या नाकातून श्वास घेण्याचा सराव करा आणि 4-5 सेकंद धरून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर सोडा.

ध्यान

ध्यान हा तणाव कमी करण्याचा आणि तुम्हाला आराम करण्यास मदत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. डॉ. तिलवे म्हणतात, “आपलं मन शांत करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे तुम्हाला विनाकारण भिती वाटणार नाही. बॉडी-स्कॅन ध्यान एखाद्या व्यक्तीला पॅनीक अटॅक दरम्यान अनुभवलेल्या धक्क्याला कमी करते. ह्याने पुढचे अटॅक येत नाहीत.

माइंडफुलनेस मेडीटेशन

ध्यान करताना मेंदू स्थिर ठेवल्यास, तो दैनंदिन कामकाजातही पॅनीक अटॅक टाळू शकतो. माइंडफुलनेस करणे आणि शिकणे सोपे आहे असे नाही तर ग्राउंडिंग तंत्र, सजग खाणे, सजग ध्यान आणि सजग श्वास घेणे यासह अनेक पर्याय आहेत.

यासाठी तुम्ही हे करा.

- Advertisement -
  • तुमच्या आजूबाजूला काय घडत आहे ह्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा जेणेकरून तुम्ही सध्याच्या क्षणी स्वतःला स्थिर करू शकता.
  • तुम्ही ज्यातून जात आहात ते स्वीकारणे आवश्यक आहे जेणेकरुन तुम्ही समाधान शोधण्यासाठी स्वतःला समर्थन देऊ शकता. आहे ते मान्य करायला शिका.
  • स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा.

संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी

तुमचे विचार आणि वर्तन बदलणे हा CBT थेरपीचा एक प्रकार आहे जो तुम्हाला तुमच्या समस्या व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतो. हे विविध मानसिक आणि शारीरिक आरोग्य समस्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. परंतु त्याचा उपयोग चिंता आणि नैराश्यावर उपचार करण्यासाठी केला जातो.

निःसंशयपणे, तुमचे आंतरिक विचार, संज्ञानात्मक विकृती आणि प्रतिक्रिया पद्धती समजून घेतल्याने तुम्हाला पॅनीक अटॅक प्रभावीपणे टाळता येतील जास्तच पॅनिक होत असाल तर ह्या सगळ्या उपायांचा जास्त फायदा घेण्यासाठी मानसशास्त्रज्ञांसोबत काम बोलणं आवश्यक आहे.

ह्यावर औषधं आहेत का?

जर चिंता आणि मानसिक तणाव खूप जास्त त्रासदायक असतील तर ते तुमच्या वैयक्तिक-सामाजिक-व्यावसायिक जीवनावर परिणाम करू शकतात.. अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञ औषध देतात. औषधं पॅनीक अटॅक शी संबंधित त्रास कमी करण्यास मदत करू शकतात. तुमच्या रोजच्या जगण्यातही चांगला फरक पडतो. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही औषधं घेऊ नका.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories