सांधेदुखी, पोटदुखीवर आल्याचं लोणचं खायला हवं! बऱ्याच आजारांवर हे गुणकारी लोणचं असं बनवा.

आल्याचं लोणचं  खाण्याचे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, जाणून घ्या त्याचे फायदे आणि ते कसे बनवावे. तुम्ही आतापर्यंत आंब्याचं मिरचीचं लिंबाचं लोणचं सुद्धा खाल्लं असेल. पण कधी आल्याचं लोणचं खाल्लं आहे का? होय आल्याचं लोणचं भारतात जुन्या काळापासून केला जातो कारण हे औषधी लोणचं रोज जर जेवणात असेल तर बरेच आजार दूर पळतात. तर आपण आल्याचे लोणचं याविषयी सविस्तर वाचूया.

आल्याचं लोणचं खाल्ल्याने मिळतात हे आरोग्य फायदे, जाणून घ्या कसं बनवतात हे लोणचं. आल्याचं सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आल्याचा उपयोग आयुर्वेदात औषध म्हणूनही केला जातो. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्यांमध्ये आल्याचा रस पिणे खूप फायदेशीर आहे. आल्याचा वापर चहापासून ते भाजी मसाल्यापर्यंत दररोज केला जातो. शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही आले खूप फायदेशीर आहे. आले फक्त मसाला म्हणून नाही तर लोणचे म्हणूनही खाल्ले जाते.

आयुर्वेदातही अनेक रोगांच्या उपचारात आल्याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या पचनक्रिया सुधारण्यापासून अनेक समस्यांमध्ये आल्याचं लोणचं ही खूप फायदेशीर मानले जाते.

आल्याचं लोणचं खाण्याचे फायदे

आल्यामध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्म देखील असतात. आल्याचं लोणचं  खायला खूप चविष्ट असते आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी देखील ते खूप फायदेशीर मानले जाते. पोट निरोगी ठेवण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. लंच किंवा डिनर करताना जेवणासोबत आल्याचं लोणचं  खाऊ शकता.

पोटाच्या समस्यांव्यतिरिक्त, मळमळ आणि उलटीच्या समस्येमध्ये देखील याचे सेवन खूप फायदेशीर आहे. आल्याचं लोणचं  खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे भरपूर आहेत.

  • आल्याचं लोणचं खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • आल्याचं लोणचं  खाल्ल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते.
  • आल्याचं लोणचं  रोज खाणे डायबिटिसवर फायदेशीर आहे.
  • हाडांचे दुखणे आणि सांधेदुखीच्या त्रासामध्ये आल्याचं लोणचं  खाणे फायदेशीर ठरते.
  • आल्याचं लोणचं  खाणे खाल्ल्याने रक्ताभिसरण योग्य राहिल.
  • फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठीही आल्याचं लोणचं  खाणे फायदेशीर आहे.
  • आल्याचं लोणचं  शरीरातील वाढलेले बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
  • आतडे स्वच्छ ठेवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आल्याचं लोणचं  खाणे देखील फायदेशीर आहे.

आल्याचं लोणचं कसं बनवायचं?

आल्याचं लोणचं  बनवण्यासाठी अर्धा किलो आले, अर्धा किलो लसूण, मोहरी, बडीशेप, हळद, बडीशेप, मीठ, लाल तिखट घ्या. लसूण आणि आले चांगले सोलून घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा. त्यानंतर त्यांना उन्हात ठेवून चांगले वाळवावे. यानंतर मोहरीच्या तेलात बडीशेप चांगली भाजून घ्या आणि त्यात सर्व गोष्टी मिसळा आणि चवीनुसार मीठ घाला. आता काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा. काही दिवस 2 ते 3 तास उन्हात ठेवा. आठवडाभरानंतर हे लोणचं खायला तयार आहे.

आलं हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले तरी कोणत्याही आजारात किंवा समस्येमध्ये याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. डायबिटिस, पोटाशी संबंधित आजारामध्ये आल्याचं लोणचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ञांचे मत घेणे आवश्यक आहे.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories