स्त्रियांची एनर्जी वाढवेल,मूड सुधारेल हा उपाय!  रात्री दुधात हे मिसळून प्या! 

महिलांनी रात्री दुधात हे मिसळून प्यायल्याने शरीराला मिळेल जबरदस्त फायदा. चला वाचूया काय आहे तो सहज सोपा पदार्थ ज्याने तुमची एनर्जी आणि मूड दोन्ही कधीच डाऊन होणार नाही. 

तुम्ही आजवर हळद, वेलचीचे दूध प्यायला असाल, पण तुम्ही कधी लवंगाचं दूध प्यायला आहात का? लवंगा मिसळलेलं दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे नियमित प्यायल्याने विशेषत: महिलांना आश्चर्यकारक फायदे मिळतात. आयुर्वेदानुसार, दूध आणि लवंगा प्यायल्याने शरीराला फायदा होतो, परंतु जर तुम्ही हे दोन्ही एकत्र घेतलं तर तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकता.

दुधातील चरबी आणि प्रोटिन्स पुरुष हार्मोन सक्रिय करतात. विशेषत: महिलांनी रात्री लवंग आणि दुध घेतल्याने शरीराला अनेक आजारांपासून स्वतःच रक्षण करता येतं. महिलांसाठी रात्री लवंग आणि दूध पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

तणाव आणि चिंता पळेल 

आज सगळ्यांनाच सतावणारी तणाव आणि चिंता नॉर्मल बनली आहे. पण ताण कमी होण्यासाठी हे सोपं औषध तुम्ही दररोज घेऊ शकता. तणाव आणि चिंतेपासून आराम मिळविण्यासाठी, रात्री लवंग आणि दूध प्यायला सांगितलं जातं. रात्री लवंग आणि दूध प्यायल्यानेही मूड सुधारतो.

लवंगात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे ई, सी, के आणि ए तसेच फोलेट, प्रथिने, आहारातील फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. लवंग वजन कमी करण्यासाठी चांगला उपाय आहे. कारण ती आपल्या गुणांमुळे मेटाबॉलीझम वाढवते.

तसच लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फोलेट, फायबर, जीवनसत्त्वे, जस्त, तांबे, सेलेनियम, थायामिन, सोडियम, मॅंगनीज, पोटॅशियम इत्यादी अनेक प्रकारचे पोषक घटक लवंगामध्ये असतात. तसेच त्यात अँटी मायक्रोब असते. 

लवंग आणि दूध देईल एनर्जी 

जर तुम्हाला तुमच्या शरीरात उर्जेची कमतरता जाणवत असेल तर तुम्ही दुधासोबत लवंगा खा. लवंग खाल्ल्याने शरीरातील अपायकारक घटक शरीरातून बाहेर पडतात, दुधामध्ये कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियमचे प्रमाण असतं, ज्यामुळे शरीराला भरपूर एनर्जी मिळते.

वंध्यत्वाची समस्या दूर होते

आजकाल विवाहित लोकांमध्ये वंध्यत्वाची समस्या खूप वाढली आहे. काही प्रकरणांमध्ये, पुरुषांच्या शुक्राणू पेशी कमकुवत असतात, ज्यामुळे स्त्रियांची  अंडी फलित होतात. दुसरीकडे, महिलांच्या अनियमित ओव्हुलेशनमुळे, प्रजनन कालावधी निश्चित होत नाही. वंध्यत्वाची समस्या अनेक लोकांच्या वजनाशी सुद्धा  संबंधित असते. 

लवंगाचं दूध कसं बनवायचं ?

  • लवंगीचे दूध बनवायला सोपं आहे.यासाठी प्रथम दूध गरम करा.
  • आता लवंग बारीक करून ठेवा.
  • पावडर होईपर्यंत लवंग बारीक करा.
  • आता लवंग पावडर गरम दुधात मिसळा.
  • हे लवंगाचं दूध थोडा गूळ घालून पिऊ शकता.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories