उन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी !

मकर संक्रांतीनंतर जसजसा दिवस वाढू लागतो, तसतसा उन्हाळ्याचा व ऊन्हाचा त्रास देखील वाढू लागतो. (Summer Health Care Tips In Marathi) विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये या काळात सूर्य अगदी माथ्यावर येवुन प्रकर्षाने आपली आग जमिनीकडे ओकतो की काय अशाप्रकारे उन्हाळ्यात ऊन्हाचा त्रास होऊ लागतो.

उन्हाळा सुरू झाला की काही आजार  व विकार हळूहळू डोके वर काढु लागतात. सनस्ट्रोक होणे, अंगाची लाहीलाही होणे, गरमीमुळे जीव घाबरुन येणे, त्वचारोग होणे, घामोळे येणे, उष्माघात होणे असे उन्हाशी संलग्न असलेले आजार मोठ्या प्रकर्षाने जाणवू लागतात.

दरवर्षी उन्हाळ्याच्या त्रासामुळे तसेच उष्माघातामुळे अनेक बळी जाण्याच्या बातम्या देखील आपण कायम वृत्तपत्रं व वृत्तवाहिनीच्या माध्यमातुन पाहत असतो. चालता-चालता  चक्कर येवुन उष्माघाताचा बळी गेलेली अनेक उदाहरणे आपण ऐकली व अनुभवली असलतील!

उन्हाळा व उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? (Summer Health Care Tips In Marathi)

उष्माघातापासुन संरक्षण कसे करता यावे याकरता काही उपाययोजना करता येवु शकता का तसेच ऊन्हाळ्यामुळे होणारे आजार कसे रोखता येतील याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

आज आम्ही यांबद्दल आपल्याला माहिती घेवुन आलो आहोत.उन्हापासुन वाचण्याकरता काय करावे हे पण या लेखात आपण जाणुन घेवु.

  • कलिंगड/टरबुज/ खरबुज
Summer Health Care Tips In Marathi

ऊन्हाळा सुरु झाला की रस्त्यावर जागोजागी आपल्याला कलिंगडाचे मोठमोठे ढिगच्या ढीग विक्रीस आलेली दिसतात. कलिंगड, टरबुज,खरबुज हे ऊन्हाळ्यातील पाण्याचे झरे म्हणावे तरी वावगे ठरणार नाही. ही फळे ९०% पाण्याने रसरशीत असतात. ऊन्हाळ्यात ही फळे आपल्या शरीराला आवश्यक पाणी देतात व हायड्रेट राहण्यास मदत करतात. याकरता आवर्जुन ही फळे ऊन्हाळ्यात खात जा.

  • ऊसाचा रस
2 5

ऊन वाढते तसे आपले पाय चौकाचौकात थाटलेल्या ऊसाच्या रसाच्या दुकानांकडे वळु लागतात. ऊसाचा रस हा ऊन्हापासुन आपले रक्षण करतोच शिवाय अंगाची लाहीलही थांबवतो. मात्र ऊसाचा रस बर्फ टाकुन कधीही पिऊ नये. ऊन्हाळ्यात बाहेर कामानिमित्त जावे लागत असेल तर रस्त्याने ऊसाचा रस प्यायल्यास एनर्जी व थंडावा दोन्ही मिळतो.

  • घनदाट झाडांची सावली
3 5

ऊन्हाळा सुरू झाला की आपल्या आजूबाजूचा परिसर व वातावरण सर्वच जास्त तापमान वाढीमुळे भकास वाटू लागते. ग्रामीण भागामध्ये झाडाखाली बसणार्‍यांची गर्दी वाढू लागते. अनेक ठिकाणी चिंचेचे, आंब्याचे, वडाचे,  पिंपळाचे पार बनवलेले असतात जे ऊन्हाळ्यात जास्त गजबजू लागतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्यावर लहान मुलांची पिलावळ अगदी त्या झाडांभोवती वेगवेगळे खेळ खेळताना पाहायला मिळतात.

गर्द व दाट सावली देणारी झाडे हे निसर्गाने दिलेले वरदानच आहे. एखाद्या गाळणी सारखी उष्णता गाळुन झाड आपल्याला थंडावा देते. घरात फॅन, पंखे कुलर लावुन हवा घेत बसण्यापेक्षा निसर्गाने दिलेली हे दाट सावलीची झाडे श्रेष्ठ असतात. ऊन्हाचा त्रास जाणवत असेल तर झाडाखाली काही वेळ बसावे,पाणी प्यावे नंतर पुढे जावे. झाडाखाली थंड हवेसोबत आल्हाददायी वातावरण असते जे जीवाची तगमग थांबवते.

  • कपडे
4 4

उष्णतेमुळे व तापमानवाढीमुळे अनेक नवनवे आजार डोके वर काढू लागतात ज्याचे खरे कारण आपण जे कपडे वापरतो त्यात आहे. उन्हाळ्यामध्ये जे कपडे आपण वापरतो ते वापरताना काही खबरदारी घ्यावी. उन्हाळ्यामध्ये शक्‍यतो पांढरे किंवा फिकट रंगाचेच कपडे परिधान करावे, ज्यामुळे आपल्याला सूर्याच्या उष्णतेपासून त्रास होत नाही. योग्य सैल सुती व उष्णता रोधक रंगाचे कपडे वापरल्याने घामाची निर्मिती देखील योग्य प्रमाणात होते.

काळे गडद रंगाचे कपडे परिधान केले असता सूर्याची उष्णता आपल्या शरीराकडे जास्त प्रमाणात आकर्षिली जाते, ज्यामुळे जास्त घाम येतो व त्या घामाचे बाष्पीभवन कपडे व आपल्या त्वचेच्या दरम्यानच्या भागात होते. त्यामुळे शरीरावर घामोळे व फंगल इन्फेक्शन यांसारखे त्वचारोग होतात.

याकरता घ्यावयाची काळजी म्हणजे सुती, सैल, उष्णतेचे परावर्तन होईल अशा हलक्या फिकट रंगाचे कपडे परिधान करावे.  घामोळे आल्यास साधी टॅल्कम पावडर किंवा प्रिकली हीट पावडर वापरु शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गडद रंगाचे कपडे घालने टाळावे. शक्य असेल तर केवळ पांढरे सुती कपडे परिधान करावे.

  • भरपूर पाणी प्यावे
5 4

सुर्याच्या ऊष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाणी देखील बाष्प होऊन संपुन जाते. यामुळेच उन्हाळ्यामध्ये जास्त तहान लागते व घसा कोरडा होतो तसेच ऊन्हाळी लागते ज्यामुळे वारंवार लघवीला लागते.  याकरता आपल्या सोबत नेहमी जास्तीचे पाणी सोबतच ठेवावे. प्रवासाला जाताना रस्त्याने कुठेतरी दुकान सापडेल व पाणी विकत घेवु या भरोशावर राहू नये.

उन्हाळ्यात जागोजागी पाणपोई लागलेली असते, ज्यामध्ये माठांमध्ये पाणी भरून ठेवलेले असते. नियमित साफ होणाऱ्या पाणपोईमधील पाणीच प्यावे.ऊन्हाळ्याच्या दिवसांत घराबाहेर जाण्याकरता खूपच महत्वाचे काम असेल तर आपल्या सोबत दोन ते तीन पाण्याच्या बाटल्या नियमित असाव्यात.

  • डोक्याचे संरक्षण
7 2

उष्माघाताचा त्रास बरेचदा उन्हामध्ये उघडे डोके ठेवुन चालल्यामुळे होतो. उष्माघातामध्ये  अगदी काही काळातच घशाला कोरड पडते व चक्कर येवुन व्यक्ती बेशुद्ध पडते. याकरता उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणुन डोके कायम जपले पाहिजे. डोक्यावर पांढऱ्या रंगाची टोपी, उपरणे किंवा रुमाल वापरावा. महिलांनी व मुलींनी पांढऱ्या रंगाची ओढणी, टोपी,कॅप,हॅट किंवा स्कार्फने आपले पूर्ण डोके झाकेल अशाप्रकारे सैलसर  पांघरून घ्यावे.

  • चप्पल-बुट्स
8 1

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील उष्ण तापमान व डांबरी सडकांचे तापमान प्रचंड वाढलेले असते. त्यामुळे आपण जे चप्पल बूट किंवा शूज वापरतो ते देखील अगदी थंडावा देणारे असायला हवे. रबरी, प्लास्टिकचे व कापडाचे शूज, चप्पल, बूट या काळात वापरू नयेत. हवा खेळती राहील अशा चामड्याच्या  चपला वापराव्या.

  • छत्रीचा वापर
9 1

उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून शक्यतोवर काम नसताना उन्हामध्ये हिंडु फिरु नये. घराबाहेर पडताना व पायी चालत असाल तर डोक्यावर छत्री घेऊन चालावे. छत्री देखील चांगल्या फिकट रंगाची वापरावी. काळ्या रंगाच्या छत्री वापरू नये.

  • रद्दी पेपरचा उपयोग

ऊन्हाळ्यात आपल्या सोबत कायम एखादा वर्तमानपत्र किंवा पुष्ठा असु द्यावा. गरम वातावरणामुळे हवा थांबते ज्यामुळे जीव घाबरुन येतो. ऊन्हाचा तडाखा याचमुळे बसतो. याचकरता आपल्या सोबत नेहमी एक हात पंखा किंवा एखादे वर्तमानपत्र, पुष्ठा ठेवा. ज्यामुळे आपण स्वतःला ऊष्ण तापमानापासून थंड करण्यास सक्षम होऊ शकतो.

  • बर्फ व आईसक्रीम टाळा
10 2

उन्हाळा सुरू झाला की अंगाची लाही लाही होते व गरम वातावरणामध्ये अर्थातच आईस्क्रीम खाण्याचा मोह प्रत्येकालाच होतो. आईस्क्रीम किंवा बर्फाच्या पदार्थ हे वर पाहता दिसायला थंड असले तरी त्याचा शरीरामध्ये गेल्यानंतर प्रभाव उष्ण तयार होतो. यामुळेच गोळा किंवा बर्फाची कुल्फी असे पदार्थ खाल्ल्यामुळे लहान मुलांना टॉन्सिल्स व घसा दुखी व घसा बसणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

बरेचदा मोठ्या माणसांना व लहान मुलांना देखील घशामध्ये मोठे फोड या काळामध्ये येताना दिसतात. आपण जे पदार्थ थंड म्हणून सेवन करतो त्या पदार्थांमध्ये वास्तविक पाहता उष्णता वाढवणारे गुण असतात. असे पदार्थ आपण सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामधील उष्णता जास्त प्रमाणामध्ये तोंडातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते व आपल्या तोंडामध्ये उष्णतेचे फोड निर्माण होतात. याकरता आईसक्रीम, बर्फगोळे, फ्रीजचे पाणी वर्ज्य करावे त्याऐवजी कलिंगड, काकडी, असे पाण्याने रसरशीत असलेली फळे खावी किंवा फळांचे ज्यूस प्यावे.

  • लिंबुपाणी
11

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला जागोजागी लिंबू सरबत किंवा लिंबू पाण्याचे गाडे लागलेले दिसतात. लिंबु सरबत ऊन्हाळ्याच्या दिवसात शरीरासाठी अगदी अमृत म्हणावे असे आहे. आंबट फळे व ज्युस उष्णतेपासुन बचाव करतात. 

लिंबु क जीवनसत्वयुक्त असते. लिंबामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणधर्म असतात तसेच लिंबू पाणी प्यायल्यामुळे इंस्टेट ऊर्जा निर्माण होते व उन्हाच्या तडाख्यापासून आपले संरक्षण होते. याकरता ऊन्हाळ्यात लिंबूपाणी अवश्य घ्यावे. मात्र हाइजीनची काळजी घेतली असेल अशा ठिकाणी असलेले लिंबुसरबत घराबाहेर असताना घ्यावे.

लिंबू पाणी घेण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का ?

  • ताक
12

ताक हे उन्हाळ्याकरताच काय पण सर्वकाळ उपयुक्त आहे. ताजे ताक प्यायल्याने शरीराला ऊष्णतेपासुन संरक्षण मिळते. ताकामुळे जेवन चांगले पचते. ताक हे शीतगुणी आहे. मात्र दही कधीही ऊन्हाळ्याच्या दिवसात खाऊ नये. दही हे ऊष्णगुणी आहे.

सारांश –

आपण या लेखामध्ये उन्हाळ्यात घ्यावयाच्या खबरदारीबद्दल माहिती घेतली. ऊन्हाळ्यात ऊन्हापासुन त्रास होऊन ईजा होवु नये याकरता काय खावे? कसे कपडे वापरावे? इतर कोणती काळजी घ्यावी ? याबद्दल माहिती घेतली.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होणाऱ्या त्रासांमध्ये मुख्य कारण म्हणजे आपली जीवनशैली व आपण नेहमीच जे पदार्थ वापरतो ते ऋतुंमानातील बदलांचा विचार करुन त्याबद्दल काळजी घेणे महत्त्वाचे असते.

हे हि वाचा :

जेष्ठमधाचे आयुर्वेदिक फायदे

मधुमेह म्हणजे काय? मधुमेह लक्षणे आणि आयुर्वेदिक उपचार !

चिया सीड्स किंवा सब्जाचे बी खाण्याचे फायदे !

मखाना (कमळाचे बी) खाण्याचे आरोग्याला होणारे 9 फायदे!

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories