लसूण खाण्याचे फायदे माहित आहेत का ?

लसूण खाण्याचे फायदे, चमचमीत जेवन म्हटले की त्यात लसणाचा समावेश आलाच म्हणुन समजावा! साधे पिठले असो किंवा मिलमिळीत पालक ग्रेव्ही भाजी किंवा असो कोणतेही वरण!

लसणाचा खमंग तडका त्यावर ओतला की जो सुगंध घरभर दरवळतो त्याला कसलीच उपमा देवू शकत नाही! पटपट बनवलेला पदार्थ चाटुन- पुसुन भांडे रिकामे होते!

शेतकरी असो किंवा अगदी आलिशान कार मध्ये फिरणारे लोक असो, लसणाची चटणी भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आणते. कोणत्याही जेवनाची रुचि वाढवणारी लसणाची चटणी आपल्या अंतरआत्म्याला तृप्त करुन सोडते.

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील आवर्जुन पंगतीत येणारी चटणी म्हणजे लसणाची चटणी, तोंडाची चव गेली किंवा काहीच खावस वाटत नसलं की आई, आजी गरगर पाट्यावर लाल मिरच्या आणि बचकभर लसुण ठेचून किंवा खलब्यात ओबड धोबाड कुटुन लसणाची चटणी किंवा लाल गोळा काही वेळात आपल्या पानात वाढायची!मन तृप्त व्हायचे!

हॉटेल संस्कृती वाढीस लागली असली तरी लसणाच्यस चटणीची सर कोणत्याच भाजीला येणार नाही! लसूण खाण्याचे फायदे आयुर्वेदामध्ये तर लसणाला अमृत म्हटले जाते, स्वयंपाकातील वापरा बरोबरच लसणाचा वापर पारंपरिक रित्या घरगुती औषध म्हणुन आजीबाईचा बटवा आणि आयुर्वेदात अनेक आजारांवर उपाय म्हणुन  केला जातो!

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

कारण चवीला तिखट व तीव्र स्वरूपाचा असलेला लसणामध्ये मुक्त सल्फर आढळते, ज्यामुळे अनेक आजारांवर लसुण प्रभावीपणे काम करतो. आपण अनेक प्रकारे लसणाचा अंतर्भाव आपल्या आहारात करू शकतो. लसुन खाण्यामुळे शरीराला अनेक आरोग्यकारक व आरोग्यवर्धक फायदे मिळत असतात.

लसणाचा आजरांवर घरगुती उपयोग व लसूण खाण्याचे फायदे

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

लसणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम आणि आयर्न असते आणि विटामिन ए, बी, सी, चा अंशही लसणामध्ये आहे, त्यामुळे सर्दी सारख्या लहान आजारापासून कॅन्सर सारख्या गंभीर आजारात पर्यंत आजारांवरील उपचार करण्यासाठी व आजारांवर प्रभावीपणे उपचार करून आजार बरे करण्यासाठी लसणाचा उपयोग केला जातो.

सर्दी खोकला दमा ब्रोंकाइटिस वर उपाय –

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

सर्दी,खोकला,दमा अशा अनेक प्रकारच्या श्वसनसंबंधित विकारांमध्ये लसणाचा उपयोग प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. श्वसनासंबंधी सर्व प्रकारच्या आजारांमध्ये लसणाचा वापर केल्यामुळे लवकर आराम मिळतो. कायम असणारी सर्दी, अॅलर्जीची सर्दी तसेच जुनाट खोकला असेल तर यावर उपाय म्हणुन एक कप दुधामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून चांगले उकळून घ्यावे हे दूध प्यायल्यामुळे जुनाट खोकला व सर्व प्रकारची सर्दी बरी होते व त्याची लक्षणे देखील कमी होतात.

लहान मुलांचा खोकला –

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

लहान बालकांमध्ये होणारा डांग्या खोकला म्हणजेच इंग्रजी भाषेतील हुफिंग कफ यामध्ये लसणाचा वापर केला जातो. या करता आपल्याला लसणाच्या दोन-तीन पाकळ्या ठेचून त्यांचा रस घ्यावा त्यात थोडे ऑलिव ऑइल मिसळु या तेलाने लहान मुलांच्या छातीला व पाठीला मालिश करावी, यामुळे लहान मुलांमधली डांग्या खोकला बरा होतो.

सायनसवर उपचार –

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

बर्‍याच लोकांना कायमच सायनस चा त्रास जाणवत असतो. ज्यामुळे श्वास घेताना धाप लागते व वेदना होतात. याकरता उपाय म्हणजे नियमित लसूण होय. सायनसच्या त्रासात लसुण नियमित खावा. यामुळे आपल्या नाकाच्या सायनसच्या पोकळीमध्ये अडकलेला व कडक झालेला कफ विरघळून जातो व त्यामुळे नाक मोकळे होते व सायनसमध्ये आराम मिळतो.

लठ्ठपणा व वजन कमी करण्याकरता लसूण खाण्याचे फायदे –

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

शरीरावरील चरबी ज्यात मुख्यत: पोट व कमरेवरील चरबी, गळा, दंड मांड्या यांवर चरबी जमा झाल्यामुळे शरीर बेढब व अोंगाळवाणे दिसु लागते. वाढत्या वजनामुळे अनेक आजरांना निमंत्रण मिळते. हाय कोलेस्ट्रॉल, हाय बी.पी, वंध्यत्व, डायबेटिस यासारखे आजार पाठीमागे लागतात. शरीरामध्ये वाढलेली चरबी म्हणजेच फॅट्स कमी करण्यासाठी लसणाचा उपयोग होतो. दोन-तीन लसणाच्या पाकळ्या, आवळा, सैंधवमीठ आणि खाण्याचा हिंग हे सगळे पदार्थ एकत्र भाजून घ्यावे व नियमितपणे जेवनानंतर सेवन करावे. यामुळे शरीरातील चरबी वितळू लागते तसेच वजन कमी होण्यासाठी लवकर उपयोग होतो. हा उपाय केल्यामुळे चरबी वितळते व वजन कमी होण्यास मदत होते.

पोटाचे आजार-  लसूण पोटाच्या विकारांमध्ये अतिशय गुणकारी असते. पोट दुखी, गॅस, अपचन, ऍसिडिटी बद्धकोष्ठता, मूळव्याध यांवर लसून प्रभावीपणे काम करते.

डायबेटिस साठी लसूण खाण्याचे फायदे – 

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

ज्यांना डायबेटीसचा त्रास आहे त्यांनी लसून नियमित खावा. लसणामध्ये ऍलिसीन नावाचा एक घटक असतो, जो अँटीव्हायरस, अँटीबॅक्टरियल,अंँटीफंगल आहे, त्यामुळे शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण वाढते आणि डायबेटीस कंट्रोलमध्ये राहतो.

अर्थराइटीस किंवा सांधेवात साठी लसूण खाण्याचे फायदे – 

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

ज्या लोकांना अर्थराइटिसचा त्रास आहे म्हणजेच आमवात किंवा संधिवात आहे, त्या लोकांनी गायीच्या तुपामध्ये लसणाच्या पाकळ्या तळून रोज खाल्ल्यामुळे संधिवातामध्ये आराम मिळतो. तसेच कंबरदुखीचा त्रास होत असेल तर तो देखील बरा होतो.

हात/पाय मुरगळणे किंवा दुखणे-  शरीराच्या कोणत्याही भागाचे दुखणे असेल तर त्यावर प्रभावी उपाय म्हणजे लसुन ठेचून त्याचा रस त्या भागावर लावुन चोळल्यामुळे दुखणे थांबते.

पॅरालिसिस व लकवासाठी लसूण खाण्याचे फायदे

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

पॅरालीसीस किंवा लकवा मारला असेल तर लसणाच्या पाकळ्या तिळाच्या तेलामध्ये तळून खाल्ल्यामुळे त्याचा शरीराला फायदा होतो, तसेच लकव्यामध्ये तोंड वाकडे झाले असेल तर तोंड चांगले व नॉर्मल होते.

ह्रदयरोग व ब्लडप्रेशर नियंत्रनासाठी लसूण खाण्याचे फायदे

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

नियमित लसूण खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. लसणाच्या सेवनामुळे हृदयरोगाचा धोका टळतो, कारण लसनामधील औषधी गुणांमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते व रक्त पातळ होते. रक्तवाहिन्या कडक होत नाही त्यामुळे ब्लडप्रेशर  देखील नॉर्मल राहतो. ज्या लोकांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्या लोकांनी रोज लसणाच्या पाकळ्या दुधामध्ये उकळून ते दूध प्यावे किंवा दोन तीन लसणाच्या पाकळ्या सकाळी तशाच कच्चा खाव्यात त्यामुळे ब्लडप्रेशरच्या त्रासांमध्ये आराम मिळतो.

लसणाची चटणी – लसणाच्या चटणीचा रोजच्या आहारात समावेश करावा. लसुन, धने, जिरेपूड, मिरे, सैंधव आणि हिंग टाकून ही चटणी बनवतात. या चटणीमुळे सर्व इंद्रियांचे आरोग्य सुधारते.

मायग्रेनवर उपचारसाठी लसूण खाण्याचे फायदे

जर मायग्रेनचा त्रास होत असेल तर लसुन ठेचुन लसणच्या रसाचे दोन थेंब नाकात घातल्यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो.

मायग्रेनसंबंधित अधिक माहिती साठी इथे क्लिक करा : तुम्हाला आहे का डोकेदुखी? मायग्रेनवर नवीन उपचारांचा शोध

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

मानसिक रोगांवर उपाय –

आपल्या घरामध्ये डिप्रेशनचा रुग्ण असेल तर त्याच्या आहारामध्ये लसणाचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. त्यामुळे स्ट्रेस, चिंता व मानसिक ताण -तणाव दूर होतो.

रजोनिवृत्तीच्या समस्या साठी लसूण खाण्याचे फायदे

मासिक पाळी थांबल्यानंतर महिलांच्या शरीरातमध्ये बदल होतात, त्यामुळे हाडे ठिसूळ होतात. अशा वेळी अशा महिलांनी दररोज आहारामध्ये लसनाचे प्रमाण वाढवावे, त्यामुळे हाडे मजबूत राहतात.

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

फ्रॅक्चर करता उपयोगी –

लसणामध्ये मोडलेले हाड जोडण्याचे प्राकृतिक गुणधर्म असतात त्यामुळे ज्यांना फ्रॅक्चर झाले आहे किंवा हाडे मोडली आहेत, त्यांनी आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लसुन खाल्ला पाहिजे.

फुफ्फुसाचा टी.बी किंवा निमोनियासाठी लसूण खाण्याचे फायदे

फुप्फुसांचा टी.बी किंवा निमोनिया झाला असेल तर लसणाचा आहारामध्ये समावेश करावा त्याने फायदा मिळतो.

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

एक लिटर पाणी आणि पाव लिटर दूध एकत्र करून त्यामध्ये लसूण घालून हे पाणी चांगले उकळून दिवसातून 3 वेळा हे पाणी घेतल्याने टी.बी सारखा आजारही बरा होतो.

कॅन्सरवर उपाय –

कॅन्सरमध्ये आलेली गाठ देखील कमी करण्यास लसूण गुणकारी ठरतो असे आता अभ्यासावरून सिद्ध झाले आहे.

त्वचारोगासाठी लसूण खाण्याचे फायदे –

कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार असेल तर तो देखील लसणाने बरा होतो. लसून रक्त शुद्ध करतो त्यामुळे एक्झिमा, पिंपल्स, गळवे, यांसारखे त्वचारोग लसुन खाल्ल्याने व त्यावर लसुन चोळल्याने बरे होतात.

the-benefits-of-eating-garlic-in-marathi

लसुन त्वचा, हाडे, ग्रंथी, अंतर्गतव बाह्यउपचारांकरता अनंत काळापासुन वापरला जातो. आजारपणामुळे शरीराची झालेली झीज लसुन भरून काढते, लसुन आतड्यातील स्त्रावदेखील सुरळीत करते. एकंदरितच लसुन आपल्याला पुन्हा तारूण्य प्राप्त करून देते. लसनाचा प्रामुख्याने थंडीत आणि पावसाळ्यात जास्त वापर करावा. उन्हाळ्यात लसुन कमी खावा. लसुन एक सर्वगुणसंपन्न औषध म्हणून काम करते म्हणून चांगल्या आरोग्यदायी जीवनाकरता रोज किमान दोन तीन पाकळ्या लसणाच्या सेवन कराव्यातच!

आमचे आरोग्यासंबंधित अधिक लेख इथे वाचू शकता :

शरीरस्वास्थ्याकरता काही महत्वाच्या टिप्स

केस गळतीवर घरगुती उपाय

दात दुखीवर घरगुती उपाय

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories