नमस्कार मित्रांनो आज आपण चांगल्या सवयी लावून घेऊन आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे ते बघणार आहोत, कसे आजकालच्या धावपळीच्या जीवनात खूप लोकांच्या तक्रारी येत आहेत की मला असा आजार झाला आहे किंवा मी सारखा आजरी पडत आहे तर याची कारणे अगदी शुल्लक आहेत जे की तुम्ही केली तर कधीच आजरी पडू शकत नाही.
माणसाकडे पैसा तर खूप आहे पण आरोग्य नीट नाही तर मग पैशाचा काय उपयोग. तो एक सुविचार सुद्धा आहे जो की आपण खूप वेळा ऐकला आहे “आरोग्य ही धनसंपदा”. याचा अर्थ असा की तुमचे जर आरोग्य चांगले असेल तर तुमच्याकडे खूप पैसा आहे पण जर आरोग्य नीट नसेल तर त्या धनाचा काय उपयोग आहे.
आजकालचे हे धावपळीचे हे जीवन यामध्ये आपला आपल्या आहारावर आपले कसलेच लक्ष नाही, प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत आहे त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात आहे असं वाटत नाही का?
तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहत असाल की कोणाला हदय विकाराने झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला तर कधी अगदी कमी वयात रक्तदाब कमी झाला जास्त झाला, किंवा कधी कमी वयात चक्कर येणे, किडनी खराब होणे अशा अनेक समस्या आपल्याला आढळतात.

आपण आपला आहार नीट घेतला नाही तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा ताणतणाव येतो या ताणतणावाला आपण कारणीभूत आहोत तसेच लघवीचा त्रास आपल्याला जाणवायला लागतो त्याला आपण पाणी कमी पितो त्यामुळे हा त्रास चालू होतो. तुम्हाला माहीत आहे का आपले जर अपचन होत असेल तर पोटाचे आजार होतात, पोटापासून आपल्याला ९० टक्के आजार होतात.
त्यामुळे आपला आहार नीट असावा तेच पचनक्रिया नीट असली पाहिजे. आज आपण आशा काही आरोग्याविषयी टिप्स बघणार आहोत ज्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजर होऊ शकत नाही तुम्ही पूर्णपणे निरोगी राहू शकत.
यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जायचे नाही किंवा तुम्हाला पैसे सुद्धा घालवायचे नाही अगदी घरात सरळ साधा उपाय आहे जो तुम्ही रोज केल्याने तुमचे आरोग्य चांगल्या प्रकारे राहील.
जास्तीत जास्त पाणी पिणे –
पाणी हा शरीराला लागणारा अत्यांत महत्वाचा घटक आहे, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण पाण्याशिवाय जगूच शकत नाही. एकवेळ अन्न न खाता काही दिवस जगू शकतो पण एक दिवस जरी पाणी नाही पिलो तर आपल्याला चक्कर येणे तसेच थकवा येणे अशा समस्या उदभवू शकतात.

दिवसातून कमीत कमी चार लिटर पाणी आपल्या शरीराला आवश्यक आहे जर या पेक्षा जर तुम्ही पाणी पीत असाल तर तुम्हाला लघवीच्या समस्या जाणवू शकतात कारण जर तुमच्या पोटात पाणीच नसेल तर लघवी लागणार नाही आणि लघवी च्या जागी तुम्हाला जळजळ होऊ शकते.
तुमच्या शरीरात जर पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला लघवीचा त्रास जाणवत नाही तुमची लघवी पांढरी म्हणजेच पाण्यासारखी होत असेल तर तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण व्यवस्तीत आहे पण तुमच्या शरीरात जर पाणी कमी असेल तर तुमची पिवळी लघवी होते.
तसेच जास्त पाणी पीत असाल तर तुम्हाला किडनीचे समस्या उदभवु शकत नाही. कारण पाणी जर तुम्ही जास्त पिट असाल तर तुमच्या किडन्या चांगल्या राहू शकतात पण पाणी जर पिट नसाल तर किडनीच्या ठिकाणी तुम्हाला दुखल्यासारखे जाणवत असेल.
त्यामुळे तुम्ही दिवसाला जास्तीत जास्त पाण्याचा मारा ठेवा तसेच जेवण झाल्यानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका कारण आपण जे जेवण केलेले असते ते कुजूम जाते त्यामुळे जेवण झालं की एक घोट खूप झाला आणि नंतर अर्ध्या तासाने तुम्ही वाटेल तेवढे पाणी पिऊ शकता, आणि झोपताना जर तुम्ही एक ग्लास पाणी घेतले तर हदयविकाराच्या झटक्यापासून वाचू शकता.
टेन्शन किंवा ताणतणाव येणे –
रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला कोणत्या न कोणत्या प्रकारचा ताणतणाव येत असतो त्यासाठी तुम्हाला जे गरजेचे आहे ते म्हणजे पाणी तसेच झोप आणि व्यवस्थित आहार. तुम्ही जास्तीत जास्त जी लोक पोजिटिव्ही विचार करतात जे की त्यांच्याकडे कोणत्या न कोणत्या कल्पना नक्की असतात आणि जे संकट समोर आले आहे त्यावरती मात करतात त्यांच्या सहवासात तुम्ही जास्तीत जास्त राहावा.

तुम्ही रोज उठल्या उठल्या योगा केला पाहिजे त्यामुळे आपला दिवस फ्रेश जातो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. योग केल्याने आपले मन स्थिर राहते वाईट विचार म्हणजेच नकारात्मक विचार आपल्या डोक्यात येत नाहीत, त्यामुळे तुम्ही योग केला पाहिजे आणि टेन्शन पासून जेवढे दूर राहाल तेवढे तुमच्या शरीराला चांगले आहे.
आहार चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित असणे –
या धावपळीच्या जीवनात तुम्ही तुमच्या आहारावर कसलेच लक्ष देत नाही त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते, तसेच तुम्हाला ह्दयविकाराची लक्षणे खूप आढळतात.

तुमच्या आहारात जर तुम्ही मसालेदार पदार्थांचा तसेच तेलकट पदार्थांचा समावेश करत असाल तर तुमच्या शरीराला नक्की त्रास जाणवू शकतो. तुम्ही जर आहारामध्ये पालेभाज्या घेतल्या तसेच फळभाज्या चा समावेअह केला तर तुम्हाला आरोग्याची कसलीच समस्या येणार नाही तसेच जर फळांचा समावेश जर असेल तुमच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटिन्स तसेच फायबर, व्हिटॅमिन्स चे चांगले प्रमाण असते त्यामुळे तुमच्या शरीराला जे घटक लागणार आहेत ते यामधून मिळतात त्यामुळे तुम्ही आहारावर खूप लक्ष ठेवले पाहिजे. कारण आहारामुळे तुमचे आरोग्य जास्तीत जास्त बिघडू शकते.
स्वछता राखणे –
घरात सगळे आहे पण स्वछता नसेल तर काहीच उपयोग नाही कारण शरीराला स्वछता खूप महत्त्वाची आहे, जर तुमचे नखे वाढले तर त्या नखातून कोणत्याही प्रकारची घाण पोटात जाते आणि पोटापासून आपल्या ९० टक्के आजार होतात. त्यामुळे वेळच्या वेळी नखे कापली पाहिजेत कारण शरीर जर स्वछ असेल तर तुमचे शरीर निरोगी राहू शकते तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार उदभवु शकत नाहीत.

बाहेरून फिरून आले की पाण्याने हातपाय स्वछ धुतले पाहिजेत, तसेच जेवणाआधी हात धुणे. घरामध्ये जर स्वछता असेल तर तुम्ही सुद्धा स्वछ राहता असे असते, त्यामुळे घरात स्वछता असली पाहिजे. स्वछ घर सुंदर घर यामुळे तर म्हणले जाते.
चांगल्या प्रकारे झोप घेणे –
झोप जर चांगली होत नसेल तर आपली चिडचिड खूप होते तसेच डोके दुखणे, पित्त होणे अशा समस्या चालू होतात, पुरेशी झोप म्हणजे कमीत कमीत ८ तास झोप आपल्या शरीराला पाहिजेच कारण तेवढी जर झोप भेटली नाही तर आपले आरोग्य लगेच बिघडते.

झोप जर चांगल्या प्रकारे नाही झाली तर आपल्याला चक्कर येणे तसेच डोक जड येणे, मळमळ होणे अशा समस्या जाणवतात, त्यामुळे तुम्ही पुरेशी झोप घेतली पाहिजे हे तुमच्या आरोग्यास खूप चांगले आहे. दिवसातून फक्त आठ तास झोप कारण जर तुम्ही जास्त झोप घेत असाल तर कावीळ सुद्धा उदभवू शकते.
चांगली झोप येण्यासाठी घरगुती उपाय, वाचा या लेखात
व्यायाम –

आपल्या शरीरातही व्यायाम खूप गरजेचा आहे कारण व्यायाम जर तुम्ही करत असाल तर तुमची हाडे सुद्धा नीट राहतात तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शरीराचा त्रास जाणवत नाही, स्टॅमिना मध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते त्यामुळे थकवा येत असेल तर त्यापासून सुटका करू शकता. व्यायामामुळे आपल्या शरीरातील जे ब्लड सरकुलेशन आहे ते चांगल्या प्रकारे होते.
व्यसनापासून दूर राहणे –

आजकालची सर्रास लोक व्यसनाच्या आहारी गेली आहेत, ज्यामुळे दिवसंदिवस तुमचे आयुष्य कमी होत चालले आहे त्यामुळे व्यसन जर पूर्णपने सोडले तर तुम्ही कधीच आजरी पडू शकत नाही कारण व्यसना एवढा हानिकारक घटक आपल्या शरीराला दुसरा कोणताच नाही त्यामुळे व्यसनाच्या आहारी कधीच जाऊ नका.
हे हि वाचा :
आरोग्यविषयक चांगल्या सवयी लावून घेण्याचे 10 मार्ग
शरीरस्वास्थ्याकरता काही महत्वाच्या टिप्स