फक्त या बिया लिंबू पाण्यात टाकून सेवन करा… काही दिवसात वजन कमी होईल….!

आजकालच्या बदलत्या जीवशैलीमुळे निर्माण होणारा ताण तणाव आणि वाढत्या वजनामुळे तुम्ही चिंतेत आहात का? चला तर मग आज आम्ही तुम्हाला एक रेसिपी सांगतो. या रेसिपी चा वापर करून पाहिल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होईल.

वजन वाढणे ही आजच्या जीवनातील एक सामान्य समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी कोणते उपाय केले जातात हे लोकांना माहिती नाही अश्यातला भाग नाही, परंतु तरीही अनेक वेळा कितीही प्रयत्न केले तरीही यश मिळत नाही आणि उलट त्यांना त्यामुळे अशक्तपणाचा सामना करावा लागतो.

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने चरबी कमी करायची असेल, तर काही नैसर्गिक घटक तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. लिंबू अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक ऍसिडने परिपूर्ण आहे, म्हणून ते फॅट कटर म्हणून काम करते. यासोबत चिया बियांचे सेवन केल्याने दुहेरी फायदे होतात.

शरीर डिटॉक्सिफिकेशन

जर तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस, अपचन किंवा इतर पाचन समस्या असतील तर तुम्ही लिंबू पाण्यासोबत चिया बियांचे सेवन करू शकता. चिया बियांमध्ये भरपूर फायबर असते जे पचनाशी संबंधित त्रास दूर करण्यास मदत करते. चिया बिया शरीरातील चरबी काढून टाकण्यास मदत करतात आणि लिंबू शरीराला डिटॉक्सिफाय करते.

- Advertisement -

मेटाबॉलीझम दर वाढवते

चिया बिया शरीरातील चयापचय दर वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.  त्याचबरोबर लिंबू फॅट कटरचेही काम करते, दोन्ही एकत्र घेतल्यास वजन कमी करण्यात यश मिळू शकते.

निरोगी आणि तंदुरुस्त ठेवते

लिंबूमध्ये एक-दोन नव्हे तर अनेक गुणधर्म आहेत. व्हिटॅमिन सी सोबतच यामध्ये सायट्रिक ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक असतात.  लिंबूमध्ये अँटीव्हायरस आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे व्हायरस इत्यादीपासून संरक्षण करतात आणि संसर्गाचा धोका कमी करतात. लिंबू पाणी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. चिया बिया सोबत घेतल्यास फायदे आणखीनच वाढतात. जर तुमचे शरीर रोगांपासून संरक्षित असेल तर ते अधिक मजबूत होते.

लिंबूपाणी आणि चिया बियांचे सेवन कसे करावे-

यासाठी प्रथम एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात लिंबू पिळून घ्या, आता त्यात चिया बिया टाका आणि काही वेळ त्या बीया फुगण्यासाठी सोडा. आता त्यामधे चवीप्रमाणे मध मिक्स करून या पाण्याचे सेवन करा.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories