जिम जॉईन करणाऱ्या सर्वांसाठी महत्वाच्या अशा 10 टिप्स – 10 Gym Tips In Marathi

विशेषतः तरुण आणि मध्यम वयाच्या लोकांमधे जिम ला जाण्याची इच्छा निर्माण होते. व्यायम करून आपलं शरीर सुंदर, पिळदार, आकर्षक, योग्य वजनाचे बनवणे ही चांगली गोष्ट आहे. पण काही लोक हे स्वप्न पूर्ण करु शकत नाहीत.

आजच्या लेखात जिमला जाणाऱ्या सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी अशा काही टिप्स पाहूया.

1 : मनात एक ध्येय ठेवा

जिम

तुम्ही अशी चूक कधीही करु नका जी बऱ्याच नुकतीच जिम जॉईन केलेले लोक करतात. स्वतःला कसे बनायचे आहे ह्याचे चित्र आपल्या डोळ्यासमोर असायला हवे. उगाच कोणतेही उद्दिष्ट नसताना जिम लावू नका. तुम्ही थोड्याच दिवसात कंटाळा कराल.

2 : व्यायामासोबतच पौष्टिक आहार देखील महत्वाचा आहे (Gym Diet)

diet food

पौष्टिक आहार (Diet) हाच जिम मधल्या व्यायमाचा मुख्य भाग आहे. तुमचं उद्दिष्ट, पिळदार शरीरयष्टी बनवण्याचे असो अथवा वजन कमी किंवा जास्त करण्याचे असो योग्य आहार तक्ता (Diet Chart) आपल्याला फॉलो करायचाच आहे.
तुम्ही तुमच्या शरीराच्या गरजेनुसार आणि तुमच्या जिम मधल्या उद्दिष्टानुसार पौष्टिक आहार घ्या.

3 : योग्य सराव करा

gym fitness

योग्य तेवढेच वजन उचलण्याचा सराव करा. एका मुलाखती दरम्यान विराट कोहली म्हणाला होता की त्याच्या जिम मधल्या सुरूवातीच्या 45 दिवसांत तो फक्त 17 किलो वजन उचलण्याचा सराव करत असे. ह्याचा त्याला 3-4 दिवसांनी कंटाळा आला. पण त्याचा जिम प्रशिक्षक त्याला म्हणाला की सुरुवातीचे 45 दिवस फार महत्वाचे असतात. हे दिवस एवढेच वजन उचलणे ठीक आहे. 45 दिवसानंतर विराटने 20 किलो वजनावरून थेट 35 किलो वजन उचलण्याचा सराव सुरू केला. तर चांगले फळ मिळवायचे असेल तर थोडा संयम ठेवा.

4 : धीर धरा आणि सातत्य ठेवा

fitness

अगदी जिममध्ये गेल्यार गेल्या कुणीही पिळदार पोलादी शरीर कमावू शकत नाही. त्यासाठी मेहनत आणि सातत्य म्हणजेच नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवसागणिक आपली प्रगती होत आहे. हळूहळू शरीसौष्ठव दिसत आहे ह्या प्रवासाचा आनंद घ्या.

5 : चांगली झोप देखील महत्वाची

sleeping

जर आपण नियमित जिम ला जाऊन व्यायाम करत असाल तर आपल्यासाठी शरीर ताजेतवाने होण्यासाठी चांगली झोप गरजेची आहे. शरीरातील सगळे स्नायू झोपेने बलिष्ठ होतात. थोडीशीच असली तरीही सुस्त आणि गाढ झोप घ्या. रात्री प्रार्थना करा. मन शांत करा आणि एक चांगली झोप घ्या.

6 : जास्तीचा पूरक आहार (Health Supplement Food)

Protein

जिम मध्ये गेल्या गेल्या लगेच सप्लिमेंट फूड खाण्याच्या मागे लागू नका. किमान तीन महिने जाऊ दया.आपले शरीर एका पातळी पर्यंत जाऊ दया. त्यानंतर तुम्ही एका चांगल्या ब्रँड ची ज्यामध्ये स्टिरॉइड्स नाहीत अशी सप्लोमेंट घ्यायला सुरुवात करा.

7 : एका चांगल्या जिम पार्टनर ची निवड करा

fitness

जर शक्य असेल तर चांगला जिम पार्टनर शोधा. एखादा मित्र अथवा मैत्रीण असल्यास तुम्हाला जिम मध्ये मजा येईल आणि प्रोत्साहन, मदत मिळेल.

8 : अंडी खाण्यास सुरुवात करा

boiled eggs

अंडी ही तुलनेने स्वस्त असतात आणि शरीराला आवश्यक असलेल्या प्रोटीन ची गरज भागवतात. शक्य असल्यास अंड्यांचा ट्रे खरेदी करा. एका अंड्यातून अंदाजे 6 ग्रॅम प्रोटीन मिळते. तसेच 5 ग्रॅम फॅट/चरबी मिळते.

9 : अहंकार आणि नुकसान

gym

काही लोकांमध्ये आपल्या वजनाच्या आणि कुवतीच्या बाहेर वजन उचलण्याचा अहंकार चिकटला जातो. असे केल्याने कोणताही फायदा होत नाही झाले तर शरीराचे नुकसानच होईल. असा अहंकार (ego weight lifting) झटकून टाका आणि प्रशिक्षक सांगतील तेवढेच करा.

10 : शिस्तबद्ध राहा

gym

Arnold चे व्हिडिओ बघून किंवा सोशल मीडिया वरील फोटो बघून जर जिम जॉईन कराल तर तो प्रभाव आणि प्रेरणा फार तर महिनाभर टिकेल. पण हे तात्पुरते उत्तेजन टिकवून ठेवण्याची पद्धत म्हणजे स्वतःच स्वतःला कठोर शिस्त लावून घ्या.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories