हे खाल्यानेच तुम्हाला गुडघेदुखी होते आणि सूज येते. ह्या गोष्टी बंद करा.

आपण दररोज खातो त्यापैकीच काही पदार्थ गुडघेदुखी आणि सूज वाढवू शकतात. चला जाणून घेऊया या पदार्थांबद्दल सविस्तर.

ह्या पदार्थांमुळे गुडघेदुखी आणि सूज वाढू शकते

सांधेदुखीच्या रुग्णांनी सगळेच पदार्थ खाऊन कसं चालेल. मग नक्की काय खाऊ नये ज्याने सांधे दुखायला लागणार नाहीत. चुकीचा आहार, सतत कॉम्प्युटरसमोर बसणे, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित जीवनशैली यामुळे अनेक वेळा गुडघेदुखी आणि सूज येण्याची समस्या उद्भवते, जी खूप त्रासदायक असते.

याआधी गुडघेदुखी आणि सूज येण्याची समस्या वृद्धांमध्ये दिसून येत होती. मात्र आजकाल तरुणांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. गुडघेदुखी आणि सूज दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकते. त्यामुळे या समस्येवर वेळीच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. चला अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे गुडघेदुखी आणि सूज कमी करायला मदत करू शकतात.

हे खाल तर दुखतील सांधे आणि गुडघे

साखर जास्त खाताय

जास्त साखर खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. कँडी, आइस्क्रीम, बिस्किटे आणि पेस्ट्री शरीरासाठी खूप त्रासदायक असतात. त्यांच्या सेवनाने गुडघ्यात सूज आणि वेदना वाढते. या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे मधुमेह आणि रक्तदाबाचा धोकाही वाढू शकतो. त्यांच्या सेवनाने लठ्ठपणाही वाढतो, ज्यामुळे गुडघ्यात वेदना आणि सूज वाढते.

प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ

प्रक्रिया केलेले पदार्थ शरीरासाठी अत्यंत अपायकारक असतात. ते सतत खाल्ल्याने गुडघ्याला सूज येण्याबरोबरच वेदनाही होतात. प्रक्रिया केलेले पदार्थही वजन वाढवतात. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ किंवा Processed Food खाल्ल्याने अपचन, गॅस आणि पोटात ॲसिडिटी होण्याची शक्यता वाढते. त्यांचा आहारात नियमित समावेश केल्याने पोट साफ होत नाही.

लाल मांस नका खाऊ

लाल मांसामध्ये फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आढळतो, ज्यामुळे गुडघ्याची सूज आणि वेदना वाढते. रेड मीटमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते, जे शरीरासाठी अत्यंत नुकसानकारक असते. असं मांस खाल्ल्याने वजनही झपाट्याने वाढतं. लाल मांसाचे नियमित खात असाल तर पचनक्रियाही बिघडते. स्किनवर परीणाम होईल..

जास्त मीठ नको

जास्त मीठ आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. जास्त मीठ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो. जास्त मीठ खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रासही वाढतो.

अशा परिस्थितीत, बाहेरचे जास्त मीठ असलेले पदार्थ टाळा, ज्यामध्ये बर्गर, पिझ्झा, छोले भटुरे, पॅक केलेले नमकीन, नूडल्स आणि फ्रेंच फ्राईज यांसारखे मीठ जास्त प्रमाणात वापरले गेलेले पदार्थ आहेत. ते खाल्ल्याने गुडघ्याची सूज आणि वेदना वाढू शकते.

टोमॅटो

जरी टोमॅटो शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु जर तुम्हाला गुडघेदुखी आणि सूजने त्रास होत असेल तर ते खाणे टाळा. टोमॅटोमध्ये युरिक ॲसिड जास्त प्रमाणात असतं. ज्यामुळे गुडघ्याची सूज आणि वेदना वाढते.

जर तुम्ही वर नमूद केलेले पदार्थ रोज खाल्ले तर ते तुमचे गुडघेदुखी आणि सूज वाढवू शकतात. जर तुम्ही संधिवाताचे रुग्ण असाल तर त्यांचे सेवन अजिबात खाऊ नका.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories