वजन कमी करायचंय! काय खावं? रात्रीच्या जेवणात ही 5 प्रकारची सॅलड खा, पोटाची चरबी हमखास कमी होईल.

- Advertisement -

तुम्हालाही वजन झपाट्याने कमी करायचं असेल तर रात्रीच्या जेवणाऐवजी तुम्ही ही सॅलड खाऊ शकता. यामुळे मेटाबॉलजम वाढतो आणि पचन चांगलं होईल.

आजच्या धावपळीच्या लाईफस्टाल मध्ये तंदुरुस्त राहणे हे मोठे आव्हान आहे. विशेषत: गेल्या दोन वर्षांपासून लोक त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक झाले आहेत. मग अशा परिस्थितीत, सर्वात आधी तुम्हाला तुमचा आहार सुधारण्याची गरज आहे. तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणात भात, पोळी, भाजी, गोड असं खाऊन वजन आणखी वाढवण्यापेक्षा फक्त हेल्दी आणि चविष्ट सॅलड खाऊ शकता. 

यासोबतच हिवाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळेही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी त्यांचा वापर करू शकता. हे केवळ वजन कमी करायलाच मदत करत नाही तर अनेक पोषक घटक आणि जीवनसत्त्वे देखील देतात.

ह्या  सॅलड च्या मदतीने तुम्ही अगदी योग्य पद्धतीने आरामात  वजन कमी करू शकता. यासोबतच शरीराचं आरोग्यही राखता येतं. चला जाणून घेऊया अशाच काही आरोग्यवर्धक सॅलड्सबद्दल.

- Advertisement -

1. कोबी आणि टोमॅटो कोशिंबीर

3 68

कोबी आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात आढळते. याशिवाय, त्यात मॅग्नेशियम, लोह, सल्फर आणि कॅल्शियम देखील मुबलक प्रमाणात आहे.  ह्याने वजन कमी करण्यासोबतच दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्तीही चांगली राहते. हे सलाड खाल  तुम्हाला रात्री जेवण्याची गरज नाही. त्यात लिंबू, आलं, काकडी घालू शकता.

कोबी आणि टोमॅटोचं सॅलड कसं  बनवायचं

 कोबी आणि टोमॅटोने समृद्ध सॅलड बनवण्यासाठी कोबीचा एक चतुर्थांश भाग आणि दोन टोमॅटो बारीक चिरून घ्या.  त्यातही काकडी कापून घ्या.  यानंतर त्यात लिंबू पिळून, बारीक किसून आलं, तुळशीची पानं सुध्दा घाला.  ते चांगलं मिसळण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल सुध्दा घालू शकता.  याशिवाय त्यात जिरे पावडर, धणे पावडर आणि काळे मीठ घालून चांगले मिसळा. नीट मिसळल्यानंतर वजन कमी करण्यासाठी आरोग्यवर्धक सॅलड. तयार आहे.

2. किवी सॅलड

4 65

 किवी आणि स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि खूप कमी कॅलरीज असतात. पोटॅशियम सुध्दा त्यांच्यामध्ये  आहे.  वजन कमी करण्यासोबतच उच्च रक्तदाबही कमी होण्यास मदत होते.  याशिवाय फ्रूट सॅलडमुळे मानसिक ताणही कमी होतो.  यासाठी तुम्ही त्यात खरबूज, पपई, द्राक्षे, केळी आणि ब्लूबेरीही टाकू शकता.

किवी सलाड कसं बनवायचं?

फ्रूट सॅलड बनवण्यासाठी सर्व फळं नीट धुवावीत. यानंतर, एका भांड्यात किवी आणि स्ट्रॉबेरी बारीक चिरून घ्या.  नंतर या मिश्रणात केळी, पपई, द्राक्षे आणि ब्लूबेरी घाला.  एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवताना फक्त सॅलडमध्ये खरबूज कापून टाका कारण खरबूज कापल्यावर भरपूर पाणी बाहेर पडू लागतं  नको असल्यास आपण खरबूज नका घालू. हे सर्व नीट मिसळून झाल्यावर त्यावर काळे मीठ आणि थोडी जिरेपूड टाकून खाऊ शकता.  येथे काळे मीठ आणि जिरे पूड अपचन आणि वजन कमी करण्यासाठी खूप उत्तम उपाय आहेत.

- Advertisement -

3. कॉर्न सॅलड

5 67

वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम तुमची पचनसंस्था चांगली असायला हवी.  अशा परिस्थितीत, कॉर्नमध्ये असलेलं फायबर तुमची पचनसंस्था ठीक करेल. वजन कमी होतं.   यासाठी तुम्ही त्यात ब्रोकोली, हिरवी शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, टोमॅटो, फरसबी आणि गाजर इत्यादी घालू शकता.  यामुळे तुमचं वजन कमी होण्यासोबतच पोटही भरेल.

कॉर्न सॅलड रेसिपी

कॉर्न सॅलड बनवण्यासाठी प्रथम ब्रोकोली गरम पाण्यात काही वेळ उकळा आणि बाकीच्या सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.  सॅलड बनवण्यासाठी पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करा किंवा तुम्ही मोहरीचे तेलही घालू शकता.  आता त्यात बेबी कॉर्न घाला आणि उरलेल्या चिरलेल्या भाज्या देखील घाला.  यानंतर या मिश्रणात थोडे पाणी घालून मंद आचेवर शिजू द्या.  पण सॅलड जास्त शिजवल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात.  त्यामुळे फक्त ५ मिनिटे शिजवा.  त्यानंतर चवीनुसार मीठ घालून खाऊ शकता.

 4. स्प्राउट सॅलड

6 63

वजन कमी करण्यासाठी आणि चांगल्या पचनासाठी स्प्राउट्स खूप महत्वाचे मानले जातात.  तुम्ही सकाळी न्याहारीमध्ये स्प्राउट्सचे सेवन देखील करू शकता, परंतु रात्रीच्या जेवणात स्प्राउट सॅलडचे सेवन केल्याने तुमचं वजन लवकर कमी व्हायला खूप मदत होईल. यासाठी स्प्राउट सॅलडमध्ये मुग, हरभरा, टोमॅटो, आले, मुळा, मेथी, कोथिंबीर यांचा वापर करू शकता.  त्यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासापासूनही आराम मिळतो.

 स्प्राउट सॅलड कसं बनवायचं?

स्प्राउट सॅलड बनवण्यासाठी मूग आणि चणे भिजवून घ्या. त्यानंतर कोथिंबीर, मुळा, टोमॅटो, मेथी आणि कांदा बारीक चिरून घ्या.  त्यानंतर एका कढईत किंचित ऑलिव्ह ऑइल किंवा घरचं तूप गरम करून त्यात हिरवी मिरची व हिंग टाकून सर्व चिरलेली कोशिंबीर व मूग टाका.  सर्व मंद आचेवर शिजवा.  त्यावर तुम्ही ओवा सुध्दा पावडर टाकू शकता.

- Advertisement -

5. बीन्स आणि कॅप्सिकम सॅलड

7 53

 बीन्स आणि सिमला मिरचीमध्ये फायबर आणि कॅलरीज खूप कमी असतात.  वजन कमी करण्यासाठी हा एक परिपूर्ण सॅलड घटक आहे.  यासाठी तुम्ही अर्धा कप बीन्स, सिमला मिरची, स्प्राउट्स, बीटरूट, कोथिंबीर आणि टोमॅटो वापरू शकता.  तुमच्या चवीनुसार तुम्ही इतर गोष्टीही घालू शकता.  यामुळे तुमचे शरीर हलकं जाणवेल.

 बीन्स आणि कॅप्सिकम सॅलड रेसिपी

 बीन आणि सिमला मिरची सॅलड बनवण्यासाठी बीन्स, सिमला मिरची, बीट, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.  नंतर एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करून त्यात हे मिश्रण टाकून मंद आचेवर शिजवा. जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही.  तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एका पॅनमध्ये स्प्राउट्स शिजवू शकता किंवा तुम्ही त्यांना वर देखील ठेवू शकता.  त्यानंतर त्यात लिंबू आणि जिरेपूड घाला.  सॅलडच्या वरती ताजी कोथिंबीरही टाकू शकता.

सॅलड बनवताना ही काळजी घ्या.

रात्रीच्या वेळी अशी अनेक फळे आणि भाज्या असतात, ज्यांचा थंडीचा प्रभाव असतो, त्यामुळे सर्दी झाल्यावर ती फळे किंवा भाज्या खाऊ नका. तसेच, खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असेल तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories