पुरुषांचं वजन वेगाने वाढत असल्यास त्यांनी त्यांची थायरॉईड टेस्ट करून घ्यावी. कारण हे थायरॉइडच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे जे चयापचय नियंत्रित करणार्या थायरॉईड हार्मोन्सच्या कमी जास्त प्रमाणामुळे होऊ शकतं.
पुरुषांमध्ये दिसतात ही थायरॉईडची लक्षणे

थायरॉईड वाढतंय कारण लोकांच्या मनाला वाटेल तसं जगण्याचा वेग झपाट्याने वाढत आहे. म्हणूनच थायरॉईड कोणत्याही पुरुष, स्त्री किंवा मुलाला होऊ शकतं. अशा परिस्थितीत, जर आपण फक्त पुरुषांबद्दल बोललो, तर आजकाल पुरुषांमध्ये थायरॉईडचे सर्वात मोठे कारण म्हणजे झोपेचा अभाव, तणाव, धूम्रपान आणि खराब आहार.
थायरॉईड ही मानेच्या आत आणि कॉलरबोनच्या अगदी वरची फुलपाखरासारखी ग्रंथी आहे. विज्ञानाच्या भाषेत त्याला अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात. ही ग्रंथी शरीरात ट्रायओडोथायरोनिन आणि थायरॉक्सिन नावाची दोन हार्मोन्स बनवते. या हार्मोन्सचं काम चयापचय योग्य ठेवणे आहे. परंतु जेव्हा या ग्रंथीच्या कार्यात अडथळा येतो आणि त्यामुळे पुरुषांच्या शरीरात अनेक लक्षणे दिसू लागतात.
पुरुषांमध्ये थायरॉईडची दिसतात ही लक्षणे
तोंड आणि अंगाला सूज येणे

हायपोथायरॉईडीझम असलेल्या पुरुषांचं वजन वाढतं आणि ते वेगाने वाढत जातं. कारण थायरॉईड हार्मोन्सच उत्पादन कमी झाल्यामुळे, चयापचय बिघडतं आणि तुम्ही जे खाता ते नीट पचत नाही आणि वजन वाढू लागतं. त्यामुळे अशा लोकांच्या तोंडाला आणि अंगाला जास्त सूज येऊ शकते.
लैंगिक आरोग्य आणि इरेक्टाइल डिसफंक्शन

टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये लैंगिक आरोग्य बिघडतं आणि इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. या प्रकारच्या थायरॉईडची लक्षणे सहज समजू शकत नाहीत परंतु अंतर्गत भागांशी संबंधित आहेत.
उदाहरणार्थ, हायपरथायरॉईडीझममुळे लैंगिक संबंधात रस कमी होऊ शकतो तसेच इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका होऊ शकतो. याशिवाय पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.
मूड स्विंग

हायपोथायरॉईडीझम ज्यामध्ये थायरॉईड हार्मोन्स चे उत्पादन कमी होते. या स्थितीत स्त्रियांप्रमाणेच पुरुषांमध्येही मूड स्विंग होऊ लागतो. अशा स्थितीत पुरुषांची कधीकधी विनाकारण चिडचिड होते तर कधी लगेच राग येतो. हे सर्व टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या कमी पातळीमुळे आहे आणि म्हणूनच पुरुषांमध्ये चिंता आणि नैराश्यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
पाय दुखणे

अनेकदा लोक पाय दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. हे काही गंभीर परिस्थितींचे लक्षण असू शकते. खरं तर, जेव्हा थायरॉईड ग्रंथी शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त थायरॉईड हार्मोन्स तयार करू लागते तेव्हा ते स्नायू कमकुवत होते आणि स्नायूंवर ताण येतो. यामुळे पायात सूज आणि वेदना होतात.
टक्कल पडणे

गंभीर आणि दीर्घकाळापर्यंत हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझममुळे केस गळू शकतात. खरं तर, टेस्टोस्टेरॉन हार्मोनशी संबंधित त्रासामुळे पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या वाढते. त्यामुळे जर तुमचे केस झपाट्याने गळत असतील तर तुम्हाला थायरॉईड आहे का ते तपासून घ्या.
हाडं कमकुवत

थायरॉईड हार्मोनचा शरीरावर गंभीर परिणाम होतो. वास्तविक, जेव्हा हा हार्मोन जास्त बनू लागतो तेव्हा ते पुरुषांची हाडे कमकुवत करू शकतात. यामुळे सांधेदुखी, बराच वेळ बसल्यानंतर उभे राहण्याची समस्या आणि हाडे कमकुवत वाटणे यासारख्या गोष्टी वाढू शकतात. कधीकधी हाडे इतकी पोकळ होतात की लोकांना ऑस्टियोपोरोसिसचा आजार होतो.
हृदयाचा ठोका कमी होतो

हायपोथायरॉईडीझमचा काहीवेळा तुमच्या हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत, लोकांमध्ये सतत तणावाची भावना असते आणि ते झोपू शकत नाहीत. या दरम्यान, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि हृदयाचे ठोके कमी होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे व्यक्तीला त्रास होतो. तुम्हालाही वरील सगळी लक्षणे दिसत असतील तर लगेचच थायरॉईड टेस्ट करून डॉक्टरांचा सल्ला घ्या.