वाढलेल्या पोटाने कंटाळला असाल तर वजन कमी करण्यासाठी सकाळी हे मॉर्निंग रूटीन फॉलो करा.

मंडळी, सध्या वजन वाढल्यामुळे तुम्हाला तणाव आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या सकाळच्या रुटीनमध्ये या 6 गोष्टींचा समावेश करा.

वजन कमी करण्यासाठी सकाळी हा रूटीन फॉलो करा.

3 47

जर तुम्ही देखील वाढलेल्या पोटाने कंटाळला असाल किंवा कपडे घालताना तुमचं पोट दिसत असेल तर तुम्ही या गोष्टी तुमच्या सकाळच्या दिनचर्येत समाविष्ट करू शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

 वाढत्या वजनामुळे आपण मंद गतीने काम करू लागतो, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे आळशीपणाने करता. मग यामुळे तणाव आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. तुम्ही वजन कसं कमी करू शकता? वजन कमी करण्यासाठी मॉर्निंग रूटीन आहे उत्तम उपाय.

वजन कमी करण्यासाठी उपाय : मॉर्निंग रूटीन

1. सकाळी लवकर उठा

4 48

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वजन कमी करण्यासाठी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. यासाठी, रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला थकवा न येता सकाळी उठता येईल. सकाळी स्वतःसाठी वेळ काढा आणि मोबाईल फोनपासून अंतर ठेवा.

2. कोमट पाणी प्या

5 46

सकाळी लवकर उठल्यानंतर कोमट पाणी प्या. हे तुमचे शरीर डिटॉक्स करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. आरामात पाणी प्या. यामुळे तुमचं पोट साफ होईल.

3. एरोबिक

6 40

वजन कमी करण्यासाठी तुम्ही एरोबिक करू शकता. हा व्यायाम केल्याने तुमच्या संपूर्ण शरीरात हालचाल होते आणि तुम्ही मानसिकदृष्ट्याही आरामात राहता. तुम्ही तुमच्या सकाळच्या दिनचर्येत वेगवान चालण्याचाही समावेश करू शकता. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होते. तुमच्या शरीराला घाम फुटेल असा व्यायाम निवडण्याचा प्रयत्न करा.

4. भुकेची वाट पहा

7 35

जर तुम्हाला सकाळी भूक लागत नसेल तर स्वत:वर जबरदस्ती करू नका. यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. भूक लागेपर्यंत थांबा, मग नाश्ता करा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही अन्नात गहू आणि बार्ली मिक्स करून ताज्या पिठाच्या रोट्या खाऊ शकता. यामध्ये फायबर, प्रोटीन, लॅक्टिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड, फॉस्फोरिक ॲसिड, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप पोषक असतात. अन्न पुन्हा पुन्हा खाऊ नका आणि जेवणामध्ये ४ ते ५ तासांचे अंतर ठेवा.

5. फळं खा

8 28

तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये फळांचाही समावेश करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला फायबर मिळतं, ज्यामुळे तुमची पचनसंस्था सुरळीतपणे काम करू शकते आणि त्यात असणारे जीवनसत्त्वे आणि खनिजं तुमचा ताण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. आम्ही तुम्हाला सांगतो की जास्त ताणामुळे तुमचे वजन वाढू शकते. नेहमी ऋतूनुसार फळं खावीत. कारण ती जास्त पौष्टीक असतात.

6. दिवसाच्या तुलनेत रात्रीचं जेवण अर्धं घ्या

9 16

रात्रीचे जेवण हलके ठेवावे असे डॉक्टर सांगतात. तुमचे रात्रीचे जेवण दिवसाच्या तुलनेत अर्धे असावे. वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारात कर्बोदकांऐवजी प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश करा.

वजन कमी करण्यासाठी लक्षात ठेवा

10 8
  • रेफ्रिजरेटरच्या पाण्याऐवजी माठातील पाणी प्या, हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे.
  • तुम्ही ज्यूससाठी पॅकेज केलेला रस वापरू नये, त्याऐवजी तुम्ही घरीच ताजा रस बनवा.
  • ७ ते ८ तास पुरेशी झोप घ्या. यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहील.
  • वजन कमी करण्यासाठी दिवसभर आनंदी राहा आणि एकाच जागी जास्त वेळ बसू नये.

प्रत्येक व्यक्तीचा शारीरिक स्वभाव वेगळा असतो. म्हणून, ही दिनचर्या पाळण्याआधी, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आरोग्यासंबंधी माहिती वाचत राहा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories