लहान मुलांचं वजन जास्त असेल तर त्यांना भविष्यात हे आजार होऊ शकतात.

लहान मुलांना आपण प्रेमाने खाऊ घालतो तर काही मुलांचे वजन जन्मताच अनुवंशिकतेने जास्त असते. मुलांचा लठ्ठपणावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर नंतर काही गंभीर आजार होऊ शकतात. मुलं जर वजनाने धष्टपुष्ट असतील तर मुलाच्या वाढत्या वजनामुळे कोणते आजार होतात ते जाणून घ्या. वजन वाढलेल्या लठ्ठ मुलांना होऊ शकतात हे आजार!

तुमच्या आजूबाजूला अशी अनेक मुलं असतील, ज्यांचं वजन जास्त असल्याने आपल्याला गुटगुटीत आणि थोडेसे ‘क्यूट’ दिसत असले तरी भविष्यात अनेक समस्या निर्माण करू शकतात. मुलांमधील लठ्ठपणा हा शरीरातील उच्च चरबीचा आणि बॉडी मास इंडेक्सच्या उच्च पातळीचा एक प्रकार आहे, जो उच्च मृत्युदराशी संबंधित आहे.

खराब जीवनशैली, आहारातील उच्च उष्मांक, आनुवंशिक जीन्स, मंद झालेलं चयापचय, झोप न लागणे, तणाव, जंक फूड अति खाणे अंतःस्रावी विकार, प्रक्रिया केलेले अन्न आणि कॅनफूड जास्त खाल्ल्याने मुलांचं वजन वाढायला लागतं.

लहान मुलांमधील लठ्ठपणावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर नंतर शरीरात काही गंभीर आजार होऊ शकतात. तुमच्या मुलाच्या वाढत्या वजनामुळे कोणते आजार होतात ते जाणून घ्या.

मुलांच्या वाढलेल्या वजनामुळे हे आजार होऊ शकतात

1. सांधेदुखी

लठ्ठपणामुळे सांधेदुखी होऊ शकते. लठ्ठपणामुळे तुमच्या गुडघ्यांवर परिणाम होतो आणि चालताना किंवा इतर कोणतीही क्रिया करताना तुम्हाला सांधेदुखी होऊ शकते. इतकेच नाही तर यामुळे एखाद्या व्यक्तीला ऑस्टियोआर्थराइटिसचाही बळी जाऊ शकतो.

2. डायबिटिस

लठ्ठपणा टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढवण्याचे काम करतो. यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार होऊ शकतो. इन्सुलिन हा एकच हार्मोन आहे जो रक्तातील साखर नियंत्रित करतो. जेव्हा लठ्ठपणामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सची स्थिती निर्माण होते, तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त राहू लागते आणि तुम्ही मधुमेहाचे बळी ठरू शकता.

3. हायबीपी आणि कोलेस्ट्रॉल

जी मुलं लठ्ठ असतात, म्हणजेच ज्यांच्या शरीरात चरबी जमा होते, त्यांनाही उच्च रक्तदाब/ हाय बीपी आणि हाय कोलेस्टेरॉलचा त्रास होऊ शकतो. या दोन्ही गोष्टींमुळे पुढे हृदयाच्या समस्या निर्माण होतात. लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे कारण वाढलेलं वजन हेच असतं यासाठी लहानपणापासूनच मुलांना व्यायामाची सवय लावा.

4. स्लीप एपनिया

जे लोक लठ्ठ आहेत त्यांनाही स्लीप एपनियाची तक्रार असते, जो एक गंभीर झोप विकार आहे ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. या स्थितीमुळे रात्री झोपणे कठीण होते आणि दिवसा झोप येऊ लागते. यामुळे अशी वजन वाढलेली मुलं घोरायलाही सुरुवात होते. जास्त वजनाच्या मुलांना दम्यासारख्या श्वसनाचे आजार होण्याचा धोका असतो. या सगळ्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे व्यायाम.

5. उदासीनता वाढते

मुलं जर वजनाने जास्त असतील तर अशा मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. लठ्ठपणामुळे इतरांशी तुलना केल्याने मुलांना नैराश्य, चिंता, तणाव जाणवतात आणि चीड येऊन त्यांचा आत्मविश्वास कमी होत असतो.

वाढलेल्या वजनामुळे लोकांच्या नजरेत आपण वेगळे आहोत ह्याने चिडचिड, चिंताग्रस्त आणि एकटेपणा जाणवतो. यामुळे सामाजिक संबंध कमकुवत होऊ लागतात आणि लठ्ठपणामुळे काही मुलं घरीच राहायला सुरुवात करतात. यामुळेच लठ्ठ मुलांना शाळेत जायची आणि इतर मुलांमध्ये मिसळण्याची लाज वाटते.

मुलांना वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहित करा. सध्या अनेक डायटीशियन आहेत जे जास्त वजन असलेल्या लठ्ठ मुलांना एक सुदृढ आकार देऊ शकतात.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories