एवढे प्रयत्न करून वजन कमी केल्यानंतर आयुष्यात नक्की काय फायदे होतात हे तुम्हाला माहीत आहे का?

Advertisements

आपण वजन कमी करण्याबाबत अनेक वेळा ऐकतो. वजन कमी केल्याने नक्की काय फायदे होतात. वजन कमी केल्यानंतरच आयुष्य कसं असतं याबाबत या लेखात आपण माहिती घेऊ. अलीकडेच गणेश आचार्य यांनी ९८ किलोपर्यंत वजन कमी केले आहे आणि वजन कमी करण्याचा प्रवास लोकांसोबत शेअर केला आहे. इतकं वजन कमी करण्याचे काय फायदे आहेत माहित आहे का?

कोरिओग्राफर गणेश म्हणतो, “सुरुवातीचे दोन महिने माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. मला पोहायला शिकायला १५ दिवस लागले. हळूहळू माझा ट्रेनर अजय नायडू यांनी मला पाण्यात क्रंच करायला शिकवले. याशिवाय, मी सुमारे 75 मिनिटे 11 व्यायाम करायचो. अशा प्रकारे दीड वर्षात माझे वजन ८५ किलो कमी झालं आहे.

जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा अनेक प्रयत्न करून तुमच्या शरीरातील फॅट्स कमी केल्याने तुमच्या शारीरिक आरोग्याच्याअनेक पैलूंमध्ये सुधारणा होऊ शकते. वजन कमी केल्याने तुमचे वैयक्तिक जीवन, मानसिक आरोग्य, तुमच्या संवेदना आणि बरच काही बदलू शकतं.

जर तुम्हाला थोडं वजन कमी करायचं असेल किंवा भरपूर वजन कमी करायचं असेल किंवा काही किलोपर्यंत वजन कमी करून शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल, तर तुम्हाला आत्मविश्वासासोबत शरीरातील इतर बदलांचाही विचार करावा लागेल. एवढी मेहनत केल्यानंतर वजन कमी करण्याचे काय फायदे आहेत माहित आहेत का?

वजन कमी करण्याचे फायदे

तुमचे बरेचसे आजार कमी होतात

लठ्ठपणामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. वाढलेलं वजन कमी केल्याने त्या आरोग्य समस्या दूर करण्यात किंवा त्यांच्यासाठी तुमची शक्यता कमी करण्यात मदत होऊ शकते. वजन कमी केल्याने तुमचा रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. डायबिटीस हृदयविकार, स्ट्रोक, पित्ताशयाचे आजार आणि ऑस्टियोआर्थराइटिसचा धोक वजन कमी झाल्यानंतर कमी होतो.

चांगली झोप

वाढलेलं वजन कमी केल्याने तुम्हाला रात्री चांगली झोप येऊ शकते. जास्त वजन असलेल्या अनेकांना झोपेचा त्रास होतो. हे बहुतेकदा स्लीप एपनियामुळे होते, झोपेच्या दरम्यान श्वास घेण्यास त्रास होतो.

Advertisements

जास्त वजन असलेल्या लोकांना हा त्रास होतो. वजन कमी केल्याने श्वासोच्छवासाचा त्रास कमी होऊ शकतो. तुम्हाला रात्री झोप लागण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही दिवसभर अधिक सतर्क राहून चांगली विश्रांती घेऊ शकता.

मूड चांगला राहतो

वजन कमी केल्याने तुमचे शरीर आणि तुमची मनःस्थिती म्हणजेच मानसिक आरोग्य देखील सुधारतं. वजन कमी झाल्यानंतर 3 महिन्यांनंतर ताण, नैराश्य, राग आणि थकवा यांचं प्रमाण कमी होतं. वजन कमी ठेवल्याने नैराश्य, चिंता आणि इतर मानसिक आरोग्य समस्यांचा धोका कमी होतो. चांगला मूड आणि योग्य वजन ह्या गोष्टी एकत्रच येतात.

जेवणात वेगळीच चव येते

जास्त वजनामुळे तुमच्या जिभेची चव कमी होऊ शकते. याचं एक कारण असं असू शकतं की आपण खरोखर टेस्ट बड्स गमावल्या आहेत. जे लोक खूप वजन कमी करतात, विशेषत: वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या जिभेची चव बदलते.

गोड आणि चमचमीत पदार्थ त्यांना जास्त चवीने खायला आवडत नाहीत. त्यामुळे ते नैसर्गिकरित्या पौष्टीक पदार्थ खायला सुरुवात करतात आणि कमी कॅलरीज घेण्यावर भर देतात. हे वजन कमी करण्याच्या रूटीनमुळे अंगवळणी पडतं.

मेंदूची क्षमता वाढते

विचार कौशल्य आणि एकूणच मेंदूच्या सगळ्या क्षमतांमध्ये वजन जास्त असेल तर अडथळे येऊ शकतात 20 जास्त वजन असलेल्या महिलांच्या अभ्यासानुसार असं दिसून आलं आहे की ते इतर मार्गाने देखील कार्य करते.

हा एक छोटासा अभ्यास असला तरी वजन कमी केल्यानंतर स्त्रिया स्मृती चाचण्यांमध्ये अधिक चांगली कामगिरी करतात असं आढळून आलं. वजन कमी केल्यानंतर मेंदूचे काही भागही अधिक सक्रिय झाले.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories