मस्क्युलर बॉडी कमावण्यासाठी जिमला जाण्यासोबतच हे पौष्टिक पदार्थ खायला विसरू नका.

Advertisements

तुम्हाला मस्क्यूलर बॉडी कमवायची असेल तर नुसतं जिम मध्ये जाऊन व्यायाम करून बॉडी बनत नाही तर त्यासाठी तुम्हाला पौष्टीक पदार्थसुद्धा खावे सुद्धा लागतात. म्हणूनच जिमला जाणारे अनेक लोक कोणत्या पौष्टीक गोष्टी खातात. असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या लेखात अशा काही गोष्टी आम्ही सांगत आहोत.

तुम्ही काय खात आहात याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. जिम सोबत तुमचा आहार योग्य असायला हवा. जिम केल्यानंतर या 5 गोष्टी खाव्यात, नाहीतर वजन कधीच कमी होणार नाही, शरीर तयार होणार नाही. तुमचं वजन दिवसेंदिवस वाढत असेल तर ही एक गंभीर समस्या आहे.

ज्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये भरपूर घाम गाळतात, पण त्यानंतरही काही लोकांचे वजन कमी होत नाही आणि शरीराला आकारही येत नाही. वजन कमी करणे म्हणजे जिममध्ये जाऊन तासाभर व्यायाम करणे नव्हे, तर आहाराचीही काळजी घ्यावी लागते.

वजन कमी करण्याच्या तुमच्या दृढ निश्चयासोबतच दररोजच्या वर्कआऊटसोबतच तुम्ही काय खात आहात हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. केवळ जिममध्ये जाऊन घाम गाळून वजन कमी करता येत नाही. जिमसोबतच तुमचा आहारही योग्य ठेवावा लागतो..जर तुमच्या जेवणात आवश्यक पोषक तत्वे नसतील तर तुम्ही जिमला जाऊन कितीही व्यायाम केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.

जर तुम्हाला हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचे असेल आणि मस्क्यूलर बॉडी बनवायची असेल, तर वर्कआउट केल्यानंतर या गोष्टींचा समावेश तुमच्या आहारात करावा.

जिमला जाऊन व्यायाम करण्यासोबत हे पौष्टीक पदार्थसुद्धा खा

ड्राय फ्रूट्स

3 88

भरपूर जीवनसत्त्व असलेले सुक्‍यामेव्याचे पदार्थ, फळे आणि पालेभाज्या खाव्यात. तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी भरपूर असलेल्या फळांचा समावेश करा. जसं की लिंबू, पेरू, संत्री आणि पपई अशा लोकांसाठी फायदेशीर आहेत.

Advertisements

त्याच वेळी, वर्कआउटनंतर लगेचच बदाम, मनुका इत्यादी ड्राय फ्रूट्स खाऊन व्यायाम करून शरीराची झालेली झीज भरून निघायला मदत होईल आणि तुम्हाला थकवा येणार नाही.

अंडी खा

4 86

तुम्ही दिवसाची सुरुवात अंड्याने करू शकता. अंडा मध्ये प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असतं. प्रोटीन मसल तयार होण्यासाठी आवश्यक आहेत. अंडी चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही अंडी वेगळ्या प्रकारे खाऊ शकता. ऑम्लेट करू शकता किंवा बिर्याणी करू शकता.

ब्राऊन राइस खा

5 85

जिममध्ये वर्कआऊट करण्यासाठीही भरपूर ऊर्जा लागते, यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कॉम्प्लेक्स कार्ब्सचा समावेश करू शकता. ब्राउन राइस हा अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, तसेच ह्यात फायबरचे प्रमाण जास्त आहे. आपल्या दररोजच्या पांढऱ्या भातापेक्षा ब्राऊन राइस पौष्टीक आहे. मेटाबॉलिजम सुधारून वजन कमी करण्यात ब्राउन राइस मदत करतो.

जीम नंतर प्रोटीन घ्या

6 75

जर तुम्ही जिम किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल करत असाल तर त्यानंतर अर्ध्या तासाच्या आत तुम्ही प्रोटीनचे सेवन केले पाहिजे. हे स्नायूंच्या दुरुस्ती आणि बांधकामास मदत करते. प्रथिनांचे सेवन केल्याने आपल्या शरीराला आवश्यक अमीनो ऍसिड मिळतात. हे तुम्हाला नवीन स्नायू ऊतक तयार करण्यासाठी आवश्यक ऊर्जा देते.

व्यायामानंतर पुरेसं पाणी प्या

7 67

जिम मध्ये जाऊन आल्यानंतर दिवसभर भरपूर पाणी प्यायल्यास पोट भरतं आणि कॅलरीज वाढत नाहीत. यासोबतच व्यायामादरम्यान भरपूर घाम शरिरातून जात असल्याने शरीर हायड्रेट राहतं आणि यादरम्यान आपण कोणतेही अपौष्टिक पदार्थ न खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories