जिमला न जाता, डायट न करता घरच्या घरी वजननियंत्रित करू शकता. त्यासाठी तुम्हाला एवढंच करावं लागेल!

घरच्या घरी नैसर्गिकरित्या वजन कसं कमी करावं? जेव्हा जेव्हा वजन कमी करण्याचा विचार येतो तेव्हा आपण प्रथम विचार करू लागतो की आपल्याला जिममध्ये जावं लागेल, डायटीशियन कडून डायट प्लान बनवून घ्यावा लागेल. याचाच विचार करून काही लोक टेंशन घेतात आणि त्यांचा वजन कमी करण्याचा प्रवास कधीच सुरू होत नाही. पण सुरुवात कुठून तरी करावी लागेल. त्यामुळे तुमच्या घरापासून सुरुवात करणे चांगले.

तुम्हाला कुठेही न जाता घरी राहूनही वजन कमी करता येईल. काळजी करू नका, हे करणे कठीण नाही, तुम्हाला फक्त काही मूलभूत गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर घरीच सुरुवात करा, जिमला जायची घाई करू नका. बघा घरी ह्या लेखात सांगितलेल्या प्रकारे तुम्ही तुमचं वजन वेगाने कमी करू शकाल.

तुम्ही घरबसल्या सहज वजन कमी करू शकता त्यासाठी फक्त एवढच करा.

जंक फूड खाऊ नका

3 93

आपल्या सर्वांना माहित आहे की जंक फूड आरोग्यासाठी चांगलं नाही आणि कुणा डायटीशियनने सांगण्याआधी आपणच स्वतःहून जंकफूड खाणे बंद केले पाहिजे. बाहेरचे अन्न, कोणत्याही प्रकारचे स्नॅक्स किंवा चिप्स, पॅकेज केलेले नूडल्स, फास्ट फूड हे सर्व जंक फूडच्या श्रेणीत येतात. घाबरू नका, तुम्हाला लगेच काहीही सोडण्याची गरज नाही, फक्त एक एक करून सुरुवात करा.

ताजी फळे आणि भाज्या खा

4 91

ताजी फळे आणि भाज्या प्रत्येक आहाराचा भाग आहेत आणि फायदेशीर देखील आहेत. त्यामुळे न्याहारीनंतर आणि जेवणापूर्वी ताजी फळे खावीत. दुपारच्या जेवणात सॅलडचा समावेश जरूर करा. तसेच, हिरव्या पालेभाज्या आपल्या आहाराचा एक भाग बनवण्याची खात्री करा, जेणेकरून आपल्या शरीराला सर्व पोषक घटक मिळतील.

दररोज व्यायाम करायचाच

5 90

व्यायामाला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा. वजन कमी करण्यासाठी आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे रोज फिरायला जा, काही मूलभूत व्यायाम करा. धावणे, खेळणे, दोरीवर उडी मारणे आणि स्वतःला ॲक्टीव्ह ठेवा.

जेवणातलं प्रोटीन वाढवा

6 79

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, वजन कमी करण्यासाठी प्रोटीन्स योग्य प्रमाणात मिळणे खूप महत्वाचं आहे. प्रोटीन हाडे आणि स्नायूंसाठी आवश्यक आहे. त्यामुळे नाश्त्यात अंडी खा. प्रोटीन्स घेण्यासाठी सत्तू, पालक, राजमा, सोया, पनीर असे शाकाहारी पदार्थ सुद्धा खाऊ शकता.

पुरेसं पाणी प्या

7 71

वजन कमी करण्यासाठी, पाणी पिणे खूप महत्वाचे आहे, कारण योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने डीहायड्रेशन चा त्रास होत नाही. तसेच पुरेसं पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व घाण बाहेर पडत राहते. पुरेसं पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील 30-40 टक्के कॅलरीज बर्न होऊ शकतात.

कुठलाही पदार्थ खाताना कॅलरी मोजण्याकडे लक्ष आहे ना?

8 40

वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कॅलरीच्या संख्येकडे लक्ष देणे. यावर उत्तम उपाय म्हणजे जास्त खाणे टाळणे, बाहेरचे अन्न कमी खाणे, तळलेले पदार्थ नका खाऊ. एका पुरुषासाठी सरासरी दैनंदिन कॅलरी 2,500 आणि स्त्रीसाठी 2,000 कॅलरीज पुरेशा आहेत.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories