उपवास करूनही वजन कमी होत नाही तर ह्या गोष्टी करा. नक्की वजन कमी होईल.

मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्याही उपवास फायदेशीर मानला गेला आहे. कारण ह्या काळात आपल्या शरीराला रिपेअर होण्याची संधी मिळते. जसा एखाद्या मशिनला आराम द्यावा अगदी तसचं परीपूर्ण उपवास काम करतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही उपवासातही वजन कमी करू शकाल.

बहुतेक लोक धार्मिक कारणांसाठी उपवास करतात. पण काही लोक असे आहेत जे वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी उपवास ठेवतात. उपवास दरम्यान वजन कमी होणे हे आपल्या आहार आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. म्हणजेच, जर तुम्ही दिवसभर काहीही खाल्लच नाही, कडक उपवास आणि रात्री एकाच वेळी भरपूर खात असाल तर असा उपवास करून वजन वाढू शकतं.

उपवासाच्या वेळी आपण वेळापत्रकात केलेल्या बदलांचा आपल्या शरीरावरही परिणाम होतो. भूक न लागण्यासाठी तुम्ही खूप झोपल्यास, त्यामुळे तुमच्या कॅलरीज बर्न होणार नाहीत. जर तुम्ही उपवासात गरजेपेक्षा जास्त झोपलात, तर तुमचे भूकेचे हार्मोन्स सक्रिय होतात आणि तुम्हाला जास्त भूक लागते. त्यामुळे अशा काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं वजन वाढू शकतं आणि तुम्ही आजारी पडू शकता.

उपवासात किती खाणार काय खाणार हे आधीच ठरवा

आहारतज्ञांच्या मते, जर तुम्ही तुमच्या उपवासात काय खाणार आहेत ह्याचं आधीच नियोजन केलं तर तुम्ही जास्त खाणे आणि त्याने वाढणारं वजन टाळू शकाल. उपवास करताना तुम्हाला तुमच्या संपूर्ण दिवसाच्या खाण्याचा विचार करावा लागेल. यासाठी तुम्ही कमी-कॅलरी असलेले खाद्यपदार्थ अगोदरच तयार करू शकता. अशी जय्य्त तयारी  केल्याने तुम्ही पौष्टिक डायट असलेला उपवास करत राहाल आणि पौष्टिक खाऊन पोट भरलेलं असल्याने तुमच्या उपवासावरही लक्ष केंद्रित करू शकाल.

साखर नका खाऊ. त्याऐवजी लोह घ्या

बहुतेक लोक उपवासात फक्त गोड खाणं पसंत करतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर वर्ज्य करण्याचा प्रयत्न करा. कारण जास्त साखर खाल्ल्याने तुमचे अस्वास्थ्यकर वजन वाढेल. त्याऐवजी, आपल्या आहारात अधिक लोह ठेवा. उपवासात आयर्न घेतल्याने तुम्हाला अधिक एनर्जी  मिळते. उपवासात गोड खावंसं वाटत असेल तर खजूर खाऊ शकता त्यामध्ये आयर्न आणि साखर दोन्ही असतं.

स्वतःला व्यस्त ठेवा

उपवास असेल तर लोकांना जास्त खाणं सुचतं. बऱ्याच लोकांना उपवास करून आपण अशक्त होऊ अशी भीती वाटून ते जास्त खातात. स्वतःला व्यस्त ठेवायचं असेल तर  एखाद्या कामात मग्न राहा. म्हणजे तुमच लक्ष निरर्थक विचारांमध्ये जाणार नाही. उपवास करताना ही पद्धत तुम्हाला खूप मदत करू शकते. उपवासात तुम्हाला तुमच्या आवडत्या कामात व्यस्त राहा. बुडून जा.  त्यामुळे तुमचं लक्ष अन्न किंवा वजनाशी संबंधित गोष्टींवर जाऊ शकत नाही.

भरपूर पाणी प्या

उपवासाच्या वेळी लोक अनेकदा पाणी  कमी पितात. पण असं केल्याने शरीरात अधिक अशक्तपणा येण्यासोबतच डिहायड्रेशनचा त्रासही होऊ शकतो. यासाठी तुम्ही तुमच्या जेवणात पातळ पदार्थ खाऊ शकता. जेणेकरुन आहाराचे पालन करण्यासोबतच तुम्ही तुमच्या उपवासात उत्साही राहाल. आयुर्वेदानुसार जर तुम्ही उपवासाच्या वेळी गरम पाणी किंवा गरम दूध प्याल तर तुमच्या संपूर्ण शरीराला फायदा होतो.

तुमचं मन शांत ठेवा

उपवास करताना मन शांत असणं सर्वात महत्त्वाचं असतं. कारण उपवासाच्या वेळी तुमच्या शरीरातील ऊर्जा थोडी कमी असते, अशा स्थितीत तुम्हाला जास्त राग येतो  किंवा निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष जातं. त्यामुळे ही तुमची उरलेली उर्जा बर्न होते. ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा किंवा अति थकवा येण्याचा त्रास होऊ शकतो.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories