बरेचसे बॉलिवूड सेलिब्रिटीज आपल्या फिटनेसकरता प्रसिद्ध आहेत.(Best Body Fitness Tips In Marathi) फिटनेस जपण्याकरता जागरूक असलेले आपले आवडते कलाकार आपण टी.व्हीवर पहात असतो. अगदी वयाची पन्नाशी उलटलेले अभिनेते व अभिनेत्री तासंतास जिममध्ये घाम गाळून आपला फिटनेस जपण्यासाठी किती कष्ट घेत असतात? हे आपण रोजच टीव्हीवर व न्यूज पेपर ला पाहत असतो!
वयाची पंचेचाळीस ही क्रॉस केलेली शिल्पा शेट्टी आजही योगासनांच्या जोरावर अगदी तरूणीला लाजवेल अशी लवचिक व फिट आहे! पन्नाशीमध्ये असलेली मलाएका अरोरा देखील आपल्या चुस्त तंदुरुस्त तब्येतीमुळे आपल्या फिटनेस व फिगरकरता एक सुपर मॉडेल म्हणून आजही बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपले नाव टिकवून आहे. आपल्या सर्वांचा आवडता अभिनेता मिस्टर खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार आज वयाच्या 55 वर्षानंतर देखील अगदी 20 वर्षाच्या मुलाला लाजवेल इतका फिटनेस जगण्याकरता जिममध्ये काबाडकष्ट करतो.
साठ वर्षाचा अमीर खान व सलमान खान आजही आपल्या फिटनेसमुळे बॉलिवूडमध्ये राज्य करत आहेत. या सर्वांच्या सक्सेसचा राज त्यांची शारीरिक तंदुरुस्ती आहे. शरीर फिट असेल तर सक्सेस मिळतोच! कोणत्याही कामासाठी व ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्या मनाची व शरीराची तयारी आवश्यक असते. एक वेळी मनाची तयारी असली तरी कधीकधी आपल्या शरीराची क्षमता कमी पडते व आपण अयशस्वी होतो अशी अनेक उदाहरणे आपण स्वतः देखील अनुभवली असतील.
अक्षय कुमार च्या काही फिटनेस टिप्स : 5 Fitness Secrets You Can Steal From The 53-Year-Old
खेळाचे विश्व असो किंवा मनोरंजन विश्व असो फिटनेस सगळ्याच ठिकाणी महत्त्वाचा असतो. फिटनेस नसेल तर चालून येणाऱ्या संधीदेखील हातातून निघून जाता. आपण बरेचदा टीव्हीवर बघितले असेल की स्पोर्ट्समनला आपला फिटनेस जपावा लागतो. हेल्दी वजन आणि उंची मेंटेन ठेवावी लागते, म्हणूनच आपल्या क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपला शारीरिक फिटनेस व मानसिक फिटनेस जपण्याची आवश्यकता असते.
शारीरिक फिटनेस बाबत बरेच लोक आजही जागरूक नाहीत याच कारणांमुळे अगदी पस्तीस-चाळीशीमध्ये लोकांना हार्ट अटॅक, डायबेटिस, ब्लडप्रेशर यासारखे आजार होत आहेत व अगदी तरुण वयामध्ये कायमस्वरूपी औषधे व गोळ्या खाण्याचे दुष्टचक्र मागे लागते. जर योग्य व्यायाम व कसरत केली तर आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा व्यवस्थितपणे व सुरळीत काम करतात, ज्यामुळे आपल्या इंद्रियांना व्यायामाची सवय लागते व सर्व संप्रेरक ग्रंथी व्यवस्थित काम करतात.
मानवी शरीरामध्ये हार्मोनल ग्लँड म्हणजेच संप्रेरक ग्रंथी असतात, या ग्रंथी ऍक्टिव्हेट होण्यासाठी व या ग्रंथीतून निघणारा ग्रंथी स्त्राव म्हणजेच हार्मोन्स आपल्या शरीराच्या मेटाबोलिजमवर व अवयवांच्या कार्यपद्धतीवर परिणाम करत असतात. ज्यामुळे संप्रेरके आपली कामे इंद्रियांकडुन व्यवस्थितपणे करून घेत असतात. ही संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स! जर हार्मोन्स योग्य प्रमाणामध्ये व योग्य वेळी स्त्रवले गेले नाही तर अनेक शारीरिक व मानसिक आजार उत्पन्न होतात. हार्मोनल इम्बॅलन्समुळे महिला आणि पुरुषांमध्ये अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते.

हार्मोन्सची पातळी योग्य राहण्यासाठी तसेच आपल्या अवयवांचा योग्य ताळमेळ राहण्याकरता शरीरातून विषारी पदार्थ बाहेर निघणे आवश्यक असते. आज -कालची लाईफस्टाईल व खादाड वृत्तीमुळे अनेक लोक मिळेल ते खातात ज्यामुळे शरीरातील अवयवांवर अतिरिक्त चरबी जमा होते. त्या चरबीमुळे शरीरातील नाजूक अवयवांवर भार येतो आणि इथेच आपल्या हार्मोन्स मध्ये गडबड होते. महिलांच्या ओव्हरीजमध्ये स्त्रवणारे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोनचे कार्य सुरळीत चालले नाही तर महिलांमध्ये वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होतात. तसेच मासिक पाळी संबंधी गंभीर आजार देखील निर्माण होतात. पुरुषांच्या बाबतीत देखील अतिरिक्त चरबी साचल्यामुळे टेस्टोस्टेरॉन या हार्मोनच्या पातळीमध्ये कमतरता येते व पुरुषांना देखील वंध्यत्वाच्या व इंद्रिय शिथिलक्षम होण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो!
अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे आज काल सगळ्यात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे प्रजनन संस्थेची समस्या आहे. अनेक महिला पुरुष या समस्यांनी त्रस्त आहेत. तीस-पस्तीशीली तरुण मुलं हार्ट अटॅक ने मरत आहेत. वयाच्या पंचविसाव्या वर्षी काही लोकांना ब्लड प्रेशरची गोळी सुरू झाली आहे. वीस- बावीस वर्षाच्या मुलांचे मानसिक संतुलन बिघडून त्यांना डिप्रेशन, नैराश्य अशा आजारांचा सामना करावा लागत आहे?
शरीरस्वास्थ्याचे महत्व – Benefits Of Exercise In Marathi

सुदृढ शरीर व प्रसन्न मन असेल तर व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आपली सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्षम होते. सुंदर काया, निरोगी मन हीच खरी जीवनाची संपत्ती आहे. ज्याचे शरीर स्वस्थ व मन निकोप राहते त्या व्यक्तीला कुठल्याही संकटांना सामना करताना चिंता करण्याची गरज पडत नाही. आपण आपल्या शरीराचा फिटनेस जपण्याकरता अनेक मार्ग अवलंबु शकतो.
ज्यामध्ये बरेच लोक पारंपरिक कसरती, जोर बैठका, कुस्ती-तालिम, उठाबशा, सकाळी उठून सूर्यनमस्कार करणे असे व्यायाम करतात. काही लोक योगासने करतात. आधुनिक काळात फिटनेससाठी जिम जॉईन करुन व्यायाम व कसरत करवून घेतली जाते. तर काही लोक केवळ सकाळी जॉगिंग करणे हा उत्तम आरोग्याचा मूलमंत्र जपताना आपण पाहिले असेल! तर काही लोक सायकलिंग करुन व्यायाम करतात! आजकाल संगीताच्या तालावर झुंबा व ऍरोबिक्स याप्रकारचे व्यायामाचे नवे प्रकार सुद्धा रुढ होताना दिसत आहेत. पद्धत कोणती का असेना मात्र शरीराचा व्यायाम होणे आवश्यक असते!

व्यायाम केल्यामुळे शरीरातील हाडे व स्नायू मजबूत होतात. व्यायामामुळे शरीरांतील विषारी टाकाऊ पदार्थ घामावाटे बाहेर टाकले जातात तसेच पचन क्रिया व एकुणच इंद्रियसंस्था, अवयव, ऊती आणि पेशींचे कार्य व्यायामामुळे सुधारते. व्यायाम केल्याने कोणत्याही प्रकारच्या आजारांना थारा मिळत नाही.
रोग प्रतिकारक शक्ती वाढण्याबरोबरच व्यक्तिमध्ये खिलाडू वृत्ती, जिद्द आणि संयमाची सवय लागते. व्यायामामुळे स्नायुंची ताकद वाढुन शारीरिक बळ देखील वाढते. व्यायाम केल्यामुळे व्यक्तीची उंची व वजनाचा ताळमेळ व्यवस्थित बसतो आणि प्रकृती स्वास्थ्य व्यवस्थित राहते. मानसिक शक्ती व मानसिक आरोग्य सुधारण्याकरता रोज नियमाने ध्यान धारणा केली पाहिजे. ताणतणाव मुक्त जीवनाकरता ध्यान हा उत्तम मार्ग आहे! सौम्य संगीत किंवा ॐ काराचा जप केल्याने मानसिक शांती लाभते व चिंता मिटुन मन प्रसन्न होते.
व्यायाम करताना काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत!
शरीरस्वास्थ्याकरता काही महत्वाच्या टिप्स – Body Fitness Tips In Marathi

- व्यायाम कोणताही का असेना पण व्यायाम करण्याअगोदर वार्म करणे आवश्यक असते. वार्म- अप केल्यामुळे शरीरातील सर्व अवयव हे व्यायाम करण्यासाठी तयार होतात.जखडलेले स्नायू, अशक्त हाडे ही व्यायम केल्याने मजबूत व मोकळी होतात व व्यायाम करताना सुलभता येते.
- व्यायाम करून घाम गाळल्यामुळे आपण आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी घटवण्याचे काम करत असतो, अशामध्ये जिममध्ये व्यायाम करताना वारंवार पाणी पिऊ नये.
- जिममध्ये व्यायाम करताना आपल्याला माहीत नसलेली उपकरणे जिम् इंस्ट्रक्टरला विचारल्याशिवाय हाताळू नये. जिम ट्रेनर व इंस्ट्रक्टरच्या सूचनांचे पालन व्यवस्थित केल्यास आपल्याला फिटनेस सोबत सुडौल व स्वस्त शरीर मिळेल.
- योगासने करताना सुरुवातीपासून हळूहळू सोप्या पासून अवघडाकडे वाटचाल करत योगासने करावीत. जर आपण नवीन असाल तर योगासने करताना श्वासाच्या अभ्यासाबद्दल संपूर्ण माहिती घ्यावी व हळूहळू एकेक योगासन शिकावे. श्वासावर नियंत्रण करत श्वासावर ध्यान ठेवत योगासनं केल्यामुळे शरीराला त्याचा लाभ मिळतो.
- सूर्यनमस्कार करताना देखील अतिघाईमध्ये सूर्यनमस्कार करू नये. किमान पंधरा ते वीस सेकंद एका सुर्य नमस्काराच्या कृती व आसनाकरता दिले पाहिजे. तसेच सुर्यनमस्कार करताना श्वासाच्या गतीकडे लक्ष दिले पाहिजे. श्वास आत घेणे व श्वास बाहेर सोडणे याचा निश्चित क्रम अभ्यायामुळे शिकता व अंगीकारता येतो.
- कोणताही व्यायाम केल्यानंतर लगेचच जेवन करु नये तसेच ज्युस ,फळे खाऊ नये. तसेच कोणताही व्यायाम केल्यानंतर शारीरिक थकवा जाण्याकरता स्ट्रेचिंग करावी.ज्यामुळे अवयांमध्ये लवचिकता येते.
चांगल्या आरोग्याकरता हेल्थ टिप्स – Good Health Tips In Marathi

- आरोग्याबाबत काळजी घेत असताना आपण एक लक्षात ठेवले पाहिजे व्हायरल संसर्गजन्य व संपर्कजन्य आजार व साथीचे आजार यातील फरक समजून घेतला पाहिजे! तसेच आजारपणात व इतर वेळी देखील वेळेवर जेवन सकस आहार व योग्य डॉक्टरांकडून उपचार करून निदान केले पाहिजे व आजारातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी पथ्यपाणी व्यवस्थित सांभाळले पाहिजे.
- जे पदार्थ आपल्याला खाण्यासाठी वर्ज्य केेले आहे असे पदार्थ कटाक्षाने टाळलेच पाहिजे! गर्दीच्या ठिकाणी जाताना कधीही आपल्या तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधला पाहिजे, यामुळे संसर्गाने होणार्या आजारांपासून आपले रक्षण होते.
चांगल्या आरोग्याकरता दैनंदिन जीवनासंबंधी महत्वाच्या टिप्स – Fitness Tips For Daily Routine

- चालू चालू रस्त्यावर मिळणारे पदार्थ, चायनिज असो अथवा भारतीय स्नॅक्स कोणत्याही प्रकारचे फास्ट फूड, जंक फूड अगदी रस्त्यावर मिळणारे साधे ज्युस देखील पिऊ नये. आपल्यासोबत आपल्या घरचे ताजे ज्युस व पाणी कायम असावे.
- बर्याच लोकांना वारंवार चहा पिण्याची सवय असते किंवा सकाळी उठल्यावर पहिल्यांदा चहा प्यायला लागतो, त्यांनी उपाशीपोटी कधीही चहा पिऊ नये. तसे पाहिले तर चहा हा आरोग्यासाठी अतिशय घातक असतो. मात्र उपाशी पोटी चहा प्यायला मुळे पोटातील आतड्यांना दाह होतो व त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होत असतो
- विषम आहार वर्ज्य केला पाहिजे.फळांसोबत दुधाचे सेवन कधीही करु नये.पारंपारिक असला तरी शिकरण हा प्रकार विषम आहार असल्याने शरीराकरता घातक आहे.
रोजच्या आहारामध्ये काय असावे ? बदाम व दूधाचे महत्व –

- सकाळी उठल्यानंतर नियमितपणे रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सोलुन खावे आणि सोबतच एक ग्लास गरम दूध प्यायले पाहिजे.
- बदामामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते फायबरयुक्त आहार घेतल्यामुळे आपल्या शरीराला व पचन क्रियेला त्याचा लाभ होतो.
- बदामामध्ये विटामिन ई असल्याने बदाम आपल्या आरोग्यासाठी हितकारक असतात. रोज सकाळी दूध प्यायल्यामुळे आपल्याला शक्ती व बळ मिळते. कारण आहारशास्त्रानुसार दूध हे एक संपूर्ण जेवण मानले जाते.
- दुधामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स व प्रोटीन असते. तसेच रात्री झोपताना देखील दूध प्यायले पाहिजे. झोपण्याअगोदर एक तास अगोदर नियमित दूध प्यायले पाहिजे.
आजारांमध्ये काय काळजी घ्यावी (Precautionary Disease Regarding Health Tips in Marathi)

- वायरल आजारांची साथ चालु असेल तसेच आपण व्हायरल इन्फेक्शनने आजारी असल्यास आपण आपल्यामुळे इतरांना आजार पसरू नये याची दक्षता घेतली पाहिजे.
- हसताना, खोकताना हातरुमाल वापरावा. हँड सॅनिटायजरचा नियमित वापर केला पाहिजे.
- साथीच्या रोगांच्या काळात सार्वजनिक शौचालयांचा वापर करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.
- शौचालयातून जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ साबणाने किंवा हँड वॉशने धुतले पाहिजे.
- घरातील व्यक्तींनी वेगवेगळे टॉवेल, साबण वापरले पाहिजे.
- आपले दात घासण्याचे ब्रश देखील शेअर करु नये. ब्रश एका जागेवर ठेवू नये.
- वारंवार एकच बूट वापरू नये. आलटून पालटून शुज, बुट्स व चप्पल वापरावे!
- आपण वापरलेले हातमोजे व पायमोजे नियमित स्वच्छ धुवावे.
- रोग्याच्या चांगल्या सवयी लावाव्या. जसे वेळेवर नखे कापणे, केस कापणे, पुरुषांनी डोक्याचे व दाढीचे केस कापणे हे नियमितपणे केले पाहिजे.
- महिला व पुरुषांनी आपापल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे.
- हात नेहमी स्वच्छ असावेत. हात वेळोवेळी नेहमी स्वच्छ धुतले पाहिजे.
- हाताच्या नखांमधील साचलेली घाण पोटामध्ये जाऊन आपल्याला पोटाचे इन्फेक्शन होते,याकरता नखे नेहमी कापली पाहिजे व नकाशामधील घाण व धुळ स्वच्छ केली पाहिजे.
- पुरुषांनी रोज केस धुतले पाहिजे. तसेच स्त्रियांनी आठवड्यातून किमान तीन वेळेस तरी केस धुतले पाहिजे.
- केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधने व साबण याऐवजी नैसर्गिक व हर्बल प्रसाधनांचा वापर करावा.
आहाराबाबतचे नियम व टिप्स (Dieting Tips In Marathi)

- जेवणामध्ये बाजारातील असो घरी बनवलेली असो लोणची, पापड, खारवलेले, आंबवलेले पदार्थ कमीत कमी खावे.याऐवजी निसर्गातील आंबट चवीची फळे खावीत ज्यातुन भरपूर प्रमाणात विटामिन सी मिळते.
- जेवण करताना बोलू नये.जेवताना बोलण्यामुळे अन्न नीट चालले जात नाही.कधी कधी जेवताना ठसका लागतो.अन्ननलिकेतुन अन्नकण श्वसननलिकेत जातात ज्यामुळे जीवाला धोका पोहचु शकतो. श्वास घेता येत नाही. याकरता जेवताना शांतपणे जेवनाकडेच लक्ष द्यावे.
- जेवण करताना हळूवारपणे प्रत्येक घास नीट चावून मग जेवण करावे.प्रत्यके घास ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे म्हणजे घास अगदी बारीक दळुन लाळेसोबत पोटात गेल्यास अन्नाचे ऑक्सिडेशन लवकर होते व शरीराला त्यातुन ऊर्जा देखील लवकर उपलब्ध होते.
- जेवताना मध्ये-मध्ये पाणी पिऊ नये. जेवन करताना घासाच्य आत पाणी प्यायल्याने पाणी व घास यांच्या दरम्यान पोकळी निर्माण होते ज्यामुळे गॅस, अपचन व अॅसिडीटीच्या व्याधी उत्पन्न होतात.
- जेवण करत असताना शांतचित्ताने व आनंदी मनाने जीवन करावे.शांतचित्ताने व आनंदाने जेवन केल्यास पचनशक्तीवर सकारात्मक परिणाम होतात व अन्न पचण्यास त्रास होत नाही. आनंदी मनाने जेवन केल्यास जेवन करणार्या व्यक्तीला जेवनाच्या पदार्थातील सर्व पोषण तत्व व गुणांचा लाभ मिळतो.
- जेवण करताना मनात राग,चिडचिड किंवा चिंता असता कामा नये, चिडचिड किंवा रागात जेवन केल्याने अन्नपचनावर त्याचा प्रभाव वाईट पडतो. ज्यामुळे शरीरावर दीर्घकाळ त्याचे दुष्परिणाम होत असतात. रागाच्या भावनांचा जेवणाचा पचनावर प्रतिकूल परिणाम होतो.
- रोजच्या जेवनामध्ये सलाड भाज्या खाल्ल्या पाहिजे. सलाड मध्ये भरपूर प्रमाणात फायबर व पाणी असते, कॅलरी फॅट्स सलाड मध्ये नसते याचमुळे पोट भरते मात्र त्याचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत.
- काकडी, गाजर, बीट, कांदा, लिंबू,अशा पदार्थांचा सलाडमध्ये समावेश करावा. या पदार्थामध्ये भरपुर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे आतडी स्वच्छ होतात. बद्धकोष्ठता असणार्यांनी फायबर युक्त हे पदार्थ खाणे उत्तम असते.
- जास्त काळ उपाशी राहू नये किंवा दोन जेवनांमध्ये तीन-चार तासांपेक्षा जास्त अंतर असता कामा नये.पोटातील जठराग्नी जास्त काळ उपाशी राहिल्याने मंद होतो ज्यामुळे अन्न पचनाचा वेग मंदावतो व गंभीर स्वरुपाच्या पोटाच्या अपचनाच्या व्याधी मागे लागतात.
- शरीरातील सर्व क्रिया पाण्याद्बारेच पूर्ण होतात. दिवसातून कमीत कमी ३ लिटर पाणी प्यायले पाहिजे. दिवसाला अन्न पचण्यासाठी व शरीराला इंद्रियसंस्थाच्या कार्यक्षमतेसाठी पाणी आवश्यक असते म्हणुन दिवसातून भरपूर पाणी पाण्याची गरज असते.
- सकाळची सुरुवात दुधापासून किंवा एखाद्या फळाच्या ताज्या ज्युसपासून केली पाहिजे. दूध हे पूर्ण अन्न म्हटले जाते. दुधात विटामिन, कॅल्शिअम,स्निग्ध पदार्थ, सगळे गुण असतात. ज्यामुळे भुक भागतेच शिवाय शरीरयष्टी सुधारण्यास दुध प्रभावीपणे काम करते.
- जेवणामध्ये रोज दुपारी ताक प्यायले पाहिजे.घरचे ताजे ताक पिणे उत्तम असते.ताक गुणांनी शितल असते. ताकामुळे शरीरशुद्धी होते. वात,कफ,पित्त यांचा होणारा असमतोल अनेक आजार निर्माण करत असतो. ताक हे या सर्व प्रकृतींना समपातळीवर आणुन स्थिर करते! म्हणुनच पित्त,गॅस या समस्याध्ये ताक प्यायले जाते.
- ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे, त्यांनी दही खाऊ नये.दही उष्मे निर्माण करते,पित्त खवळण्याचे काम दह्याच्या सेवनामुळे जास्त प्रमाणात होते. म्हणुन पित्त प्रकृती असलेल्या लोकांनी दही वर्ज्य करावे!
- रोज सकाळच्या न्याहारीमध्ये एका फळाचा समावेश करावा.ऋतुमानानुसार उपलब्ध असलेली फळे नियमित खाल्ल्याने आरोग्यक्षमता व रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी करावे तसेच साखरेच्या पदार्थांचे देखील सेवन कमी करावे. मीठ व साखर यांना पांढरे विष म्हटले जाते.कारण हे दोन्ही पदार्थ हळुहळु शरीराच्या इंद्रियाच्या कार्यपद्धती व कार्यक्षमतेवर प्रतिकूल प्रभाव करतात ज्यामुळे शरीराचे संतुलन ढासळते व व्यक्ती आजारी पडतो.
- बेकरीच्या पदार्थांचा वापर शक्यतो टाळावा. मैद्यापासून बनलेले पदार्थ खाऊ नये. मैद्यामधील सर्व पोषणतत्वे निघुन गेलेली असतात. मैदा केवळ शरीरातील चरबी वाढवण्याचे काम करतो. मैद्यामुळे लठ्ठपणा वाढतो व अनेक आजारांना निमंत्रक मैद्याचे सेवन करणे असते.
- संपूर्ण धान्य असलेल्या म्हणजेच होल ग्रेन मिलचा समावेश आहारात करावा. होलग्रेनमध्ये निसर्गातील तत्व जे शरीराला आवश्यक असतात ते जसेच्या तसे मिळतात! अनप्रोसेस्ड किंवा होल ग्रेन शरीराला आवश्यक विटामिन, प्रोटीन नैसर्गिकरित्या देतात.
- सहा महिन्यातून एकदा कान नाक घसा तज्ञ व डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन आपल्या ज्ञानेंद्रियांची तपासणी करावी.डोळे,कान,नाक,त्वचा व जीभ हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत. इन्फेक्शन्स व आजारांपासुन बचावाकरता वर्षातून २ वेळा तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी.
- वारंवार चहा पिण्याची सवयी सोडावी.वारंवार चहा प्यायल्याने पोटात अल्सर होऊन आतड्यंना गंभीर इजा होते.ज्यामुळे कोलोन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. चहामुळे अॅसिडीटीची समस्या बळावते.
- जेवणामध्ये चौरस आहार घ्यावा.जेवनामध्ये सर्व चवींच्या पदार्थाचा समावेश असावा.यामुळे जेवनातून सर्व शरीराकरता आवश्यक असलेली जीवनसत्वे,खनिजे शरीराला मिळतात.ज्यामुळे शरीर सदृढ व निरोगी राहते.
- रोजच्या जेवनामध्ये वरण -भात, आमटी,गायीचे तूप,कडधान्यांच्या उसळी, पालेभाज्या आणि कच्चे सलाड असावे. हे पदार्थ विटामिन, कार्बोहायड्रेट, प्रोटीन,फायबर,स्निग्ध पदार्थ यांचे उत्तम स्त्रोत असतात जे शरीरबांधणीकरता आवश्यक असतात.
- पॅकेज फुड्सचा वापर शक्यतो करू नये. बाजारात मिळणारे पॅकेट बंद वेफर चिप्स असे पदार्थ फाईंड ऑइल मध्ये तळलेले असतात व त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह व मिठाचे प्रमाण टाकलेले असते हे पदार्थ कधीही खाऊ नये .
- बाजारात मिळणारे लोणचे,जॅम, पापड असे साठवणुकीचे पदार्थ कधीही आणून खाऊ नये. या पदार्थांमध्ये सोडियम बेंजोएट हे प्रिझर्वेटीव वापरलेले असते.
- रेडीमेड आटा किंवा रेडिमेड पदार्थातील पोषक तत्व काढून घेतलेले असतात.असे पदार्थ घेवू नये.गव्हाच्या कोंड्यात विटामिन बी 6 व विटामिन बी 12 असते.मैदा बनवताना गव्हातील हे पोषक तत्व काढुन टाकतात.५-६ चाळण्यांमधुन गहू व कोंडा बाजुला केला जातो यामुळे मैदा निकृष्ट,पोषकतत्व विरहीत बनतो. मैद्यामध्ये कोणतेही जीवनावश्यक जीवनसत्त्व घटक नसतात म्हणुन मैद्याला पांढरे विष देखीप म्हटले जाते.
- सकाळच्या न्याहारीमध्ये किमान एक पपईची खाप खाल्ली पाहिजे.ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.पपई मध्ये विटामिनA भरपूर प्रमाणात असते त्यामुळे शरिराला आवश्यक असलेल्या विटामीन A ची पूर्तता पपईतून पूर्ण होते.गाजरामध्ये देखील विटामिन A मिळते. गाजराचा देखील समावेश दैनंदिन आहारामध्ये करावा.
- हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा,हिरव्या पालेभाज्यांमध्ये आवळा,गुळ, बीट्स, शेंगदाणे, चणे,हे पदार्थ आयर्न म्हणजेच लोहाचे उत्तम स्त्रोत असतात.जे रक्तवाढीसाठी आवश्यक असतात.
- सकाळच्या कोवळ्या ऊन्हातुन विटामिन D हे जीवनासत्व मिळते ज्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते, हाडांच्या मजबुतीकरता आहारामध्ये नियमित दुध,अंडी,तीळ अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
भारतीय आहार तक्त्यावरील संपूर्ण लेख वाचा इथे : वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता
सारांश :
या लेखातून आपण जीवनोपयोगी सकस आहाराचे महत्व,व्यायामचे महत्व, अन्नतील पोषकघटकांचे महत्व,शारीरिक तंदुरुस्ती करता कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळल्या पाहिजे याबाबतचे विस्तृत विवरण केले आहे. व्यायामाचे प्रकार,व्यायाम करताना व्यायाम करण्यापूर्वी व व्यायामानंतर घेण्याची खबरदारी यावर आपण या लेखातून चर्चा केली. पोषणतत्व कोणत्या पदार्थांमध्ये अधिक असते याबद्दलची माहिती मिळवली. आपले काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा.