आतडी निरोगी तर आपण निरोगी! आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत हे 6 पौष्टीक पदार्थ. आहारतज्ज्ञांकडून जाणून घ्या.

शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी सकस, संतुलित आणि पौष्टिक आहाराची नितांत गरज आहे. व्यायाम आणि योगाद्वारे तुम्ही तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवू शकता, पण जेव्हा संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा पौष्टिक आणि संतुलित आहाराचे महत्त्व फार आहे.

निरोगी आतड्यांसाठी सर्वोत्तम आंबवलेलं अन्न

3 20

पूर्वीच्या काळापासून एक म्हण आहे की, पोट ठीक असेल तर शरीरही चांगलं राहतं. पोटाचा संबंध पचनसंस्थेशी असतो.  तुमच्या शरीरातील अन्नाच्या पचनामध्ये आतडी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुमची आतडी निरोगी असतील तर तुम्हाला अनेक आजारांचा धोका नाही. आतड्यांमध्ये समस्या असल्यास तुमच्या शरीराची पचनक्रिया तर बिघडतेच पण त्यामुळे तुमच्या शरीराच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो.

म्हणून आंबलेले पदार्थ आतड्यांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. प्रसिद्ध पोषणतज्ञ, आहारतज्ज्ञ स्वाती बथवाल म्हणतात की काही आंबवलेले पदार्थ तुमच्या आतड्यांसाठी खूप फायदेशीर असतात. चला आहारतज्ञांकडून जाणून घेऊया अशा 8 आंबलेल्या पदार्थांविषयी जे आतड्याच्या आरोग्यासाठी महत्वाचे आणि फायदेशीर आहेत.

1. निरोगी आतड्यासाठी तांदूळ पाणी

4 18

तांदूळ जगभरातील जवळजवळ सर्व लोक वापरतात.  तांदळाचे पाणी देखील आतड्यांसाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक मानले जाते. पोटातील बॅक्टेरिया संतुलित करण्यापासून ते पचनसंस्था बळकट करण्यासाठी आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचे सेवन अत्यंत फायदेशीर मानलं जातं.

आंबलेले तांदूळ पाणी सर्वोत्तम प्रोबायोटिक्सपैकी एक मानले जाते. पोट निरोगी ठेवण्यासोबतच ह्याचं सेवन पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप चांगलं आहे. आंबवलेलं तांदूळ पाणी तयार करण्यासाठी, आपण प्रथम तांदूळ शिजवावे आणि नंतर शिजवलेले तांदूळ पाण्यात भिजवून मातीच्या भांड्यात ठेवावे. आता ते रात्रभर ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातलं पाणी काढून प्या.

2. निरोगी आतड्यासाठी कांजी

5 18

कांजी हे गाजर आणि बीटरूटपासून बनवलेले आंबवलेले पेय आहे. उत्तर भारतातील लोक भरपूर पितात. याची चवही चांगली असते आणि ती आतडे आणि पोटासाठी खूप फायदेशीर मानली जाते. गाजराची कांजी लोकांना अतिशय चविष्ट आणि पचण्याजोगी मानली जाते.

तुम्हालाही तुमची आतडी निरोगी ठेवायची असतील, तर तुम्ही गाजर कांजी खाऊ शकता. कांजी अनेक प्रकारात वापरली जात असली तरी बनवण्याची पद्धत सारखीच आहे. कांजी तयार करण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी गोळा करून गरम पाणी थंड करून त्यामध्ये सर्व गोष्टी मिसळल्या जातात आणि हे पाणी 4 ते 5 दिवस मोठ्या तोंडाच्या भांड्यात ठेवतात. अशा प्रकारे पेय आंबते. कांजी ही आपल्या आतड्यांसाठी एक उत्तम पेय आहे.

3. निरोगी आतड्यांसाठी किमची

6 17

किमची ही एक पारंपारिक कोरियन डिश आहे जी भाज्या इ. आंबवून बनवली जाते. यामध्ये कोबी, मीठ, कांदा, लसूण, आले, मिरची आणि साखर यांचा सर्रास वापर केला जातो.  याशिवाय मुळा, गाजर, काकडी, वांगी, पालक, बीट आणि बांबूच्या कोंबांसह इतर भाज्या देखील चवीनुसार किमचीमध्ये घालू शकतात.

हे सगळं बनवून काही आठवडे आंबायला ठेवले जाते. आंबल्यानंतर किमची खाल तर आतडे, पोट आणि पचनसंस्थेसाठी तसेच एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. किमची सेवन केल्याने प्रोबायोटिक्स मिळतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आतडी आणि पचनसंस्था निरोगी आणि उत्तम होण्यासाठी किमची अतिशय पौष्टिक आहे.

4. ढोकळा

7 14

ढोकळा हा एक पारंपारिक गुजराती पदार्थ आहे जो किण्वनानंतर तयार केला जातो. ढोकळा हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे जो आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. ढोकळा गुजरातमध्ये तसेच संपूर्ण देशात आवडीने खाल्ला जाते.  ढोकळा अनेक प्रकारे तयार केला जातो आणि तो आतड्यांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. बेसन आणि इतर गोष्टींपासून बनवलेला ढोकळा खालं तर आतड्यांसंबंधीच्या आजारांवरही फायदेशीर आहे.

5. निरोगी आतड्यासाठी उत्तपम आणि डोसे

8 9

उत्तपम हा दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आहे जो आपल्या देशभरात आवडीने खाल्ला जातो. उथप्पम अनेक प्रकारे तयार केला जाऊ शकतो आणि ते पचनशक्ती वाढवण्यासोबतच शरीराच्या अनेक भागांसाठी तो खूप फायदेशीर आहे. उत्तपमच्या सेवनाने शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन्स आणि कार्ब्स मिळतात. उत्तपम किंवा डोसा जरी खाल तरी तुमच्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

6. निरोगी आतड्यासाठी ताक

9 6

भारतात पूर्वीपासून जेवणानंतर ताक प्यायले जाते. ताक पिणे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. दह्यापासून तूप काढल्यानंतर ताक तयार केले जाते. यामध्ये शरीरासाठी आणि पचनासाठी फायदेशीर अनेक पोषक घटक असतात.  ताक प्यायल्याने तुमच्या पोटातील आणि आतड्यांमधील बॅक्टेरिया संतुलित राहतो.

तर तुम्हाला आतड्यांसाठी फायदेशीर आंबलेल्या पदार्थांबद्दल दिलेली ही माहिती आवडली असेल. अधिक तथ्यपूर्ण आणि अचूक आरोग्यविषयक माहितीसाठी मराठी हेल्थ ब्लॉग वरील लेख वाचत जा.

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories