आतड्याला आलेली सूज उपाय, आतडी कमकुवत होण्याची ही आठ लक्षणें आहेत. हे उपाय करून बघा.

- Advertisement -

आतड्याला आलेली सूज उपाय – तुम्ही भलेही पंच पक्वान्ने खात असाल पण जर तुमची आतडी कमजोर असतील तर तुम्ही फार काळ हे सगळं खाऊ शकणार नाही. कधी कधी पोटात जोरात दुखू लागतं आणि कितीही उपाय केले तरी पोटदुखी काही कमी होत नाही. आणि आपण विचारात पडतो की सतत मळमळ का होते, उलटी झाल्यासारखी वाटते आणि पोटात दुखत असतं. ही सगळी लक्षणं आहेत तुमची पोटातील आतडी कमकुवत झाल्याची.

पोटातील आतडे मानवी शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण खाल्लेली प्रत्येक गोष्ट पचनानंतर आपल्या आतड्यांमधून जाते. आपल्या पचलेल्या अन्नाचा शेवटचा भाग कचरा जोपर्यंत तो आपल्या शरीराबाहेर मल होऊन पडत नाही तोपर्यंत आतड्यात राहतो म्हणजेच आतड्यांमध्ये तोवर ताण आलेला असतो. हेच कारण आहे की निरोगी आतडे असणे मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे आणि ते आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे.

म्हणून, आतडी कमकुवत असण्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आजकाल बहुतेक लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी खूप वाईट आहेत आणि जीवनशैलीही खूप वाईट बनत चालली आहे. आजच्या ह्या आरोग्य विषयक लेखात आपण आतड्याला सूज येणे, आतडी अशक्त होणे ह्यासंबंधी वाचूय

आतड्याला आलेली सूज लक्षणे

आतड्याला आलेली सूज उपाय

वास्तविक, जेव्हा आपले आतडे योग्यप्रकारे काम करत नाही, याचा अर्थ असा होतो की आपण पूर्णपणे निरोगी नाही आहोत. आणि त्यालाच आतड्यांचा अशक्तपणा किंवा आतड्यांना सुजे आली आहे असं सुध्दा म्हणतात. ही एक अतिशय सामान्य समस्या आहे जी आजच्या काळात बर्‍याच लोकांना त्रास देत आहे. आपल्याला ह्या आजाराच्या लक्षणांबद्दल जागरूक असले पाहिजे:

- Advertisement -
  • वारंवार अतिसार होणे
  • पोटात जंत होणे
  • वेदना आणि कधी कधी उलट्या
  • ओटीपोटात पेटके आणि सौम्य वेदना
  • दिवसभर सुस्त वाटते
  • शरीरात पाण्याची कमतरता
  • अचानक वजन कमी होते
  • रोग प्रतिकारशक्ती कमी होते

आतड्यांचा अशक्तपणा हा असा आजार आहे की जो कोणत्याही व्यक्तीवर दीर्घकाळासाठी परिणाम करतो. हा प्रकार बराच काळ कायम राहिल्यास आपण ह्या लेखात सांगितलेले सोपे उपाय करून त्यावर मात करू शकता. काही बाबतीत आपल्याला वैद्यकीय सल्ला आणि औषधे सुध्दा आवश्यक असू शकतात.

1. पौष्टिक आहार घ्या पण सतत काहीही खाऊ नका

आतड्याला आलेली सूज उपाय

सतत खाण्याच्या सवयी आतड्याच्या आरोग्यासाठी खराब असतात. कारण आतडे जीवाणू आणि कचरा स्वच्छ करताना पचन करण्याचं काम थांबवते. जे लोक सतत खातात, ते बर्‍याचदा लवकर आजारी पडतात. कारण आतडी सतत पचन कामात व्यस्त राहतात.

आपण काही तासांच्या अंतराने खाल्ल्यास ते आतड्यांना सुध्दा विश्रांती देते आणि अन्न पचते. आतडे निरोगी ठेवण्यासाठी, आपण हे केलं पाहिजे, हे आपल्याला निरोगी ठेवेल.

2. दररोज व्यायाम करा

आतड्याला आलेली सूज उपाय

सर्वात पहिला आतड्याला आलेली सूज उपाय म्हणजे दररोज व्यायाम करणे. व्यायामाने आपल्या शरीरातून आळस दूर होईल आणि आपले संपूर्ण शरीर निरोगी होईल. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात नियमितपणे योग आणि व्यायाम केला तर तुमच्या पाचन तंत्राची समस्या दूर राहते याशिवाय तुम्ही नेहमी निरोगी राहता.संध्याकाळी आणि सकाळी काही काळ चालणे खूप फायदेशीर आहे. आतडे निरोगी राहण्यासाठी, व्यायामाची एक चांगली सवय स्वतःला लावा आणि दररोज किमान 20 मिनिटे व्यायाम करा.

- Advertisement -

3. पौष्टिक भाज्या खा

आतड्याला आलेली सूज उपाय

बहुतेक लोकांना पोटादुखीची समस्या असते. कारण त्यांचा आहार योग्य नसतो, पौष्टिक आहार घेण्याऐवजी ते फास्ट फूड खाणे पसंत करतात. पण ह्या प्रकारच्या पदार्थांमुळे बद्धकोष्ठता आणि इतर समस्या वाढू शकतात.

जर तुम्हाला अशा समस्या टाळायच्या असतील तर तुम्ही आहारात जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थ खावेत. फायबर ने समृद्ध असलेले पदार्थ म्हणजे अधिक हिरव्या भाज्या, ताजी आणि हंगामी फळे, खात जा. ह्या प्रकारचा आहार घेतल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि परिणामी पचन चांगले होते.

4. आतड्यांचे आरोग्य दही खाऊन सुधारेल

5 6

दही खाण्याचे फायदे तसे अनेक आहेत. हे सिद्ध झालेलं आहे की दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि आतड्यांसंबंधीच्या रोगांवर उपचार करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. आपल्या पोटात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. पण आतड्यांमधील खराब बॅक्टेरिया प्रमाणा बाहेर वाढल्याने आतड्यांचे नुकसान होऊ शकते.

अशा परिस्थितीत प्रोबायोटिक्स आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाची पातळी वाढविण्यात मदत करतात. हे चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांना संतुलित करते. याशिवाय प्रोबायोटिक्समध्ये असणारे चांगले बॅक्टेरिया पाचन समस्यांवर सुध्दा सहज मात करू शकतात. जर आतडे कमकुवत होणे किंवा आतडी चिकटून पाचन बिघडणे यासारख्या समस्येमुळे त्रस्त असाल तर दह्यासारख्या प्रोबियोटिक-आधारित पदार्थांचे सेवन करा.

- Advertisement -

जर तुम्हाला हा लेख माहितीपूर्ण वाटला असेल तर हि माहिती आपल्या प्रियजनांसोबत शेयर करायला विसरू नका आणि आरोग्यविषयक माहितीसाठी आमचे फेसबुक पेज मराठी हेल्थ ब्लॉग ला लाईक करायला विसरू नका !

- Advertisement -

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Recent Stories